ओव्ह्युलेशन म्हणजे काय?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 16:48

आई व्हायची वाट पाहताय? Ovulation बद्दल जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी
स्त्री महिन्यातून ज्या दिवसांत सर्वाधिक प्रजननक्षम असते, त्या दिवसांना ovulation days असं म्हणतात. ओव्ह्युलेशनबद्दल अनेक गैरसमज, चुकीची किंवा कपोलकल्पित माहिती पसरलेली असते.

मुंबई, 27 फेब्रुवारी: प्रजनननाच्या आरोग्यामध्ये ओव्ह्युलेशन (Ovulation) हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. स्त्री महिन्यातून ज्या दिवसांत सर्वाधिक प्रजननक्षम असते, त्या दिवसांना (ovulation days) असं म्हणतात. या दिवसातच निरोगी गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक असते. ओव्ह्युलेशनबद्दल अनेक गैरसमज, चुकीची किंवा कपोलकल्पित माहिती पसरलेली असते. ओव्ह्युलेशनव्यतिरिक्त अन्यही अनेक घटक आहेत, की जे स्त्री गर्भवती होण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात; मात्र त्यामध्ये ओव्ह्युलेशनचं कार्य सर्वांत महत्त्वाचं आहे. ओव्ह्युलेशन म्हणजे म्हणजे स्त्रियांमधील बीजांडकोश फुटून स्त्री बीज बाहेर येण्याची क्रिया. स्त्री गर्भवती (Pregnant) होण्यासाठी तिचा जननकाळ (Fertile Period) नेमकेपणाने कळणं आवश्यक असतं. त्यासाठी ओव्ह्युलेशनचा कालावधी समजणं आवश्यक असतं.

प्रश्न : ओव्ह्युलेशन म्हणजे नेमकं काय?

उत्तर : ओव्ह्युलेशन हा स्त्रीच्या शरीरातल्या प्रजननाच्या चक्राचा (Reproductive Cycle) एक महत्त्वाचा भाग असतो. त्या वेळी अंडाशयातून (Ovary) बीजांड (Egg) बाहेर पडून ते फॅलोपियन ट्यूबमध्ये (Fallopian Tube) येतं. पुरुषाच्या वीर्यातून (Semen) आलेल्या शुक्राणूकडून (Sperm) त्या बीजांडाचं फलन होतं, तेव्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये भ्रूण (Embryo) तयार होतो. नंतर तो यूटेरसमध्ये जाऊन गर्भ (Foetus) म्हणून विकसित होत जातो. शुक्राणूंकडून बीजांडं फलित केलं गेलं नाही, तर अशी अफलित बीजांडं नंतर मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) वेळी होणऱ्या रक्तस्रावातून बाहेर पडतात.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info