गरोदर असताना मासिक पाळी येते का?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 16:55

गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या काळात किंवा पहिल्या तीन महिन्यांत ब्लीडिंग किंवा स्पॉटिंग होणं चिंतेचं कारण असतं कारण या काळात मिसकॅरेज म्हणजेच गर्भपात होण्याचा धोका हा सर्वाधिक असतो. जाणून घ्या ब्लीडिंग होण्यामागची कारणे व उपचार!
गरोदरपणाचा काळ हा अत्यंत नाजूक असतो. या काळात स्त्री स्वतःची जेवढी काळजी घेईल तेवढी कमी असते. याच काळात शरीरात विविध बदल दिसुन येतात आणि त्या बदलांमुळे घाबरवून सोडणाऱ्या समस्या देखील उद्भवतात. अशाच काही समस्यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांत दिसून येणारी ब्लिडिंगची समस्या होय. ही समस्या बहुतांश स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न आणि अनामिक भीती देखील निर्माण करते. गरोदरपणात अशी ब्लीडिंग होणे म्हणजे मिसकॅरेज अर्थात गर्भपाताचे लक्षण मानले जाते. पण प्रत्येक वेळी ब्लीडिंग होणे म्हणजे काही गंभीर गोष्ट आहे असे समजण्याचे कारण नाही. अनेक प्रकरणात असे दिसून आले आहे की काही स्त्रियांना ब्लीडिंगचा त्रास जाणवला पण पुढे त्यांची डिलिव्हरी सुखरूपपणे झाली व बाळ सुद्धा निरोगी जन्माला आले. आज आपण या लेखातून जाणून घेऊया की या अशा ब्लीडिंगमुळे मागे काय कारणे असतील.
ब्लीडिंग वा स्पॉटिंगची कारणे

जर एक किंवा दोन दिवस ब्लीडिंग होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण काही वेळा अत्यंत गंभीर कारणांमुळे गरोदर स्त्रीला गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांत ब्लीडिंग वा स्पॉटिंगची समस्या उद्भवू शकते. या स्थितीत स्त्रियांना इंम्प्लांटेशन ब्लीडिंग, सर्विकल पोलिप, सेक्स, मिसकॅरेज, जुळी वा तिळी मुले, एक्टोपीक प्रेग्नेंसी, मोलर प्रेग्नेंसी या कारणांमुळे ब्लीडिंग वा स्पॉटिंग होऊ शकते. अजून अन्य काही कारणे ब्लीडिंगला कारणीभूत करू शकतात. पण ही प्रमुख आणि प्राथमिक कारणे आहेत.
ब्लीडिंगची लक्षणे

इंम्प्लांटेशन ब्लीडिंग मुळे हलकी ब्लीडिंग किंवा स्पॉटिंग होऊ शकते. यात इतर कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. अनेक वेळा स्त्रिया इंम्प्लांटेशन ब्लीडिंगला मासिक पाळी समजतात. जर तुम्हाला गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांत पोटात वेदना होण्यासह ब्लीडिंग होत असेल तर हा मिसकॅरेजचा संकेत असू शकतो. याशिवाय ब्लीडिंगसह प्रेग्नन्सीची लक्षणे जसे की उलटी वा मळमळ होत असेल तर ही गंभीर बाब आहे. जर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये इन्फेक्शनमुळे ब्लीडिंग होत असेल गर स्त्रीला ताप, लघुशंका करताना वेदना वा त्रास तसेच योनी जवळच्या भागात हात लावल्यास वेदना होऊ शकतात.
ब्लीडिंग व स्पॉटिंगवर उपाय

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये इंम्प्लांटेशन ब्लिडिंग झाल्यावर उपचार करण्याची गरज भासत नाही. यात कोणत्याही प्रकारचे कॉम्पलीकेशन्स होण्याचा धोका नसतो. जर एक्टोपीक प्रेग्नन्सी वा मोलर प्रेग्नन्सीमुळे ब्लिडिंग होत असेल तर डॉक्टरला जरूर दाखवावे आणि त्यांच्याकडून उपचार सुरू करावे. जर मिसकॅरेज मुळे ब्लिडिंग होत असेल तर औषधांच्या मदतीने ठीक करता येते. यात अर्भकाच्या मृत अवयवांना शरीरातून बाहेर काढले जाते.
मासिक पाळी की ब्लिडिंग?

गरोदरपणात स्त्रीला थोड्या फार ब्लीडिंगचा अनुभव येतो पण त्याला मासिक पाळी म्हणता येणार नाही. काही स्त्रियांना तर स्तनपान करताना सुद्धा मासिक पाळी येत नाही. पण अशा स्त्रीया डिलिव्हरी नंतर लगे ओव्युलेट करण्यास सुरुवात करतात. म्हणून डॉक्टर स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना जर गरोदर राहायचे नसेल तर कोणत्या ना कोणत्या गर्भ निरोधकाचा वापर करण्याचा सल्ला देऊ शकतात. मासिक पाळी ही गरोदरपणासाठीच असते आणि याचे चक्र पाळीच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू होते आणि पुढील पाळीच्या पहिल्या दिवशी संपते.
डॉक्टरांना कधी दाखवावे

गरोदर स्त्रीला सुरुवातीच्या दिवसांत ब्लीडिंग होत असेल तर एकदा डॉक्टरांच्या कानावर घालणे गरजेचे आहे. डॉक्टर हे ब्लड टेस्ट आणि योनीची तपासणी केल्यावर ब्लीडिंगचे कारण शोधू शकतात. प्रत्येक वेळी ब्लीडिंगचे कारण मिसकॅरेज नसते. जर डॉक्टरला कोणत्याही प्रकारची कॉम्पलीकेशन दिसत असतील तर योग्य उपचाराने ही समस्या ठीक करता येते. यात औषधे, सर्जरी आणि मॉनिटरिंग यांचा समावेश होतो. जर गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांत हलकी ब्लीडिंग होत असेल तर ती एक सामान्य गोष्ट आहे पण त्रास जास्त जाणवत असेल तर एकदा डॉक्टरांशी चर्चा करावी.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info