गर्भ किती दिवसात तयार होतो?pregnancytips.in

Posted on Sat 25th Apr 2020 : 13:52

प्रेग्नेंसीच्या चौथ्या महिन्यात बाळाचा किती विकास होतो व या काळात काय काळजी घ्यावी?
Pratiksha More | Maharashtra TimesUpdated: 29 Aug 2020, 3:11 pm
179
Subscribe
प्रेग्नेंसीच्या चौथ्या महिन्यापर्यंत गर्भातील बाळाचा ब-यापैकी विकास झालेला असतो. या महिन्यात त्याचे चेह-यावर एक्सप्रेशन येण्यास सुरुवात होते. या महिन्यात प्रेग्नेंसीच्या सोळाव्या आठवड्याची सुरुवात होते. चला तर जाणून घेऊया या काळात बाळाचा किती विकास होतो आणि बाळाचा आकार कसा असतो?

anushka sharma is 4 month pregnant how baby gets develop till this period in marathi
प्रेग्नेंसीच्या चौथ्या महिन्यात बाळाचा किती विकास होतो व या काळात काय काळजी घ्यावी?

Adv: इलेक्ट्रॉनिक बजेट बाजार- हाय क्वालिटी आणि बजेटमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी एकच बाजार

विराट (virat) आणि अनुष्का (anushka) यांचे लग्न म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरली, त्यानंतर पुढील वर्षभर विरुष्का (virushka) आयुष्यात येणाऱ्या तिसऱ्या गोंडस जीवाची वाट पाहत होते. पण त्यांची घोर निराशा झाली. पुढे अजून एक वर्ष सरलं आणि असे करत करत तीन वर्षे झाली तरी कोणतीच गुड न्यूज येईना. मध्यंतरी ज्या प्रसिद्ध सेलिब्रेटींनी विराट आणि अनुष्काच्या मागाहून लग्न केली त्यांच्या आयुष्यात तिसऱ्या जीवाचा प्रवेश झाला. एवढंच काय तर कोहलीचा ज्युनियर असणारा पांड्या (hardik pandya) देखील बाबा झाला आणि तेव्हा मात्र नेटीझन्स उघडपणे विराट आणि अनुष्काला गुड न्यूजबद्दल विचारू लागले.


अखेर ती प्रतीक्षा संपली आणि विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अनुष्का आणि मी आई बाबा होणार असण्याची गोड न्यूज दिलीच. फोटोमधून अनुष्काचे बेबी बंप पाहून अनेक जाणकारांनी अनुष्का चार महिन्यांची गरोदर असल्याचा अंदाज लावला आहे. तर याच अनुषंगाने आपण आपल्या या विशेष लेखामधून जाणून घेऊया की चौथ्या महिन्यापर्यंत बाळाचा किती विकास झालेला असतो.
चौथ्या महिन्यात बाळाचा आकार

सोळाव्या आठवड्यामध्ये अर्थात चौथ्या महिन्यामध्ये बाळाचा आकार 5.3 इंचांपर्यंत असतो. या काळात बाळाचा आकार हा एखाद्या लिंबू इतका किंवा एवाकाडो फळाएवढा असतो. या काळात बाळाचे वजन 144 ग्रॅम पर्यंत असते. या महिन्यात बाळाचा विकास हा अतिशय वेगाने होत असतो आणि पुढील महिन्यापर्यंत त्याचा आकार हा दुप्पट होतो. या स्टेजमध्ये बाळ हालचाल करण्यास सुद्धा सुरुवात करते आणि अम्बिलिकल कॉर्डवर ग्रीप बनवण्यास सुद्धा सुरुवात करू शकते. या महिन्यातच तंत्रिका तंत्र सुद्धा विकसित होत असते.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर मजबूत शरीर व सुदृढ आरोग्य हवे असल्यास करा ‘या’ पदार्थांचे सेवन!)
फेशियल एक्‍सप्रेशन बनतात

या महिन्यात बाळाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बनण्यास सुरुवात होते. परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्यास शिकण्यास बाळाला वेळ लागतो. चौथ्या महिन्यापर्यंत बाळाचे डोळे आणि कान सुद्धा पूर्णपणे तयार झाले असतात . बाळाची लांबी 7 इंच इतकी असते. या काळात बाळाचे हृदय 150 ते 180 प्रती मिनिटच्या वेगाने धडकत असते आणि एका दिवसात जवळपास 24 लिटर रक्त पंप करते. सोळाव्या आठवड्यात बाळाचे टेस्ट बड विकसीत व्हायला सुरुवात होते. या काळात बाळ एम्निओटिक फ्लूइडने अन्नाची चव घेऊ शकतो. एम्निओटिक फ्लूइडमुळे पदार्थात चवीचा फ्लेवर येतो आणि यामुळेच गर्भात असतानाही बाळ चव ओळखू शकतो.

(वाचा :- सावधान! गर्भधारणेमध्ये अडथळा येण्यास असू शकतो ‘हा’ आजार कारणीभूत)
प्रमुख अवयवांचा विकास

गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यानंतर बाळ गर्भामध्ये आरामत राहू लागते. या महिन्यात बाळाचे शरीर पूर्णपणे तयार झालेले असते आणि त्याच्या सराव प्रमुख अवयवांचा विकास झालेला असतो. बाळाला प्‍लेसेंटामधून पोषण मिळत असते आणि स्नायू, हाडे, हात व पाय सुद्धा तयार झालेले असतात. एवढंच नाही तर या काळात बाळाचे लिंग सुद्धा विकसित झालेलले असते. एकप्रकारे हा तो महिना असतो ज्या महिन्यात बाळाच्या शरीराचे निर्माण पूर्ण झालेले असते आणि तुम्ही इतरांना गरोदरपणाची बातमी देऊ शकता.

(वाचा :- प्रेग्नेंसीच्या पहिल्या तिमाहीत चुकूनही करु नका ‘या’ पदार्थांचे सेवन!)
डोके आणि शरीराचा विकास

बाळाच्या अवयवाचा सांगाडा पूर्ण करण्यासाठी स्नायू आणि हाडे सतत विकसित होत असतात. या काळात बाळाचे डोके पहिल्यापेक्षा जास्त सरळ असते. भुवया, वरचा ओठ यांवर केस येण्यास सुरुवात होते. सोळावा आठवडा ते अठराव आठवडा या काळात बाळ पहिल्यांदा डोळ्यांची हालचाल करतो. पापण्या उघडझाप करतो. त्याची ऐकण्याची क्षमता विकसित होत असते. तरीही चौथ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाळाला काही आवाज ऐकू येत असतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीमधील लघुशंका समस्यांवर करिना कपूरच्या डाएटिशियनने सांगितले घरगुती उपाय!)
काय काळजी घ्यावी?

चौथा महिना हा गरोदरपणातील महत्त्वाचा काळ असतो. जस जसे महिने वाढत जातात तस तसे स्त्रीने स्वत:ची शक्य तितकी काळजी घेणे आवश्यक असते. ती जेवढी स्वत:ची काळजी घेईल तेवढेच बाळ सुद्धा सुरक्षित राहील. या काळात शक्य तितका आराम करणे, जड वस्तू न उचलणे, पौष्टिक आहार घेणे, व्यायाम करणे, योग करणे यांसारख्या गोष्टी स्त्रीने करणे अपेक्षित असते. जास्तीत जास्त घरातच वेळ घालवणे या काळात महत्त्वाचे असते कारण एखादे छोटे संक्रमण सुद्धा बाळाच्या जीवाला धोका निर्माण करू शकते.

solved 5
wordpress 4 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info