गर्भपिशवीचे ऑपरेशन?pregnancytips.in

Posted on Wed 17th Jul 2019 : 02:36

गर्भपिशवी - समज आणि गैरसमज
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
Published on : 12 September 2019 at 8:01 am
sakal

वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्री रोगतज्ज्ञ
महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे. बीडमध्ये किती महिलांची गर्भाशये काढली गेली, याविषयीची माहिती प्रशासनामार्फत गोळा करणे सुरू झाले आहे. बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजूर महिला आजाराला कंटाळून गर्भाशय काढतात, यावर एका वृत्तवाहिनीने सविस्तर बातमी केली होती. तर पाहूयात नक्की ही शस्त्रक्रिया केव्हा आणि कोणासाठी योग्य आहे.

नॅशनल हेल्थ सर्व्हेनुसार गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया (हिस्टरेक्टोमी) ठरावीक परिस्थितीच करावी. म्हणजे पाळीदरम्यान अतिरक्तस्राव, ओटीपोटात सतत दुखणे, ओव्हरी कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर, फॅलोपियन ट्यूबचा कॅन्सर अशा परिस्थितीतच गर्भाशय काढणे योग्य ठरते. गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या निरीक्षणावरून असे आढळून आले आहे, की भारतात ग्रामीण महिलांमध्ये गर्भाशयाचे आजार अधिक प्रमाणात असून, पांढरे जाणे ही सर्वसाधारण समस्या पाहायला मिळते. केवळ कॅन्सरच्या भीतीपोटी कित्येक महिला पिशवी काढण्याचा चुकीचा निर्णय घेतात.
Recommended Articles

'त्या' विधानाबद्दल केसरकरांकडून शरद पवारांची जाहीर माफी; म्हणाले...
'त्या' विधानाबद्दल केसरकरांकडून शरद पवारांची जाहीर माफी; म्हणाले...राज्यातील सत्तांतराच्या काळात केसरकारांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेतील फूट आणि शरद पवारांचा उल्लेख केला होता. पण यातून त्यांनी पवारांबद्दल अनुद्गार काढल्याची चर्चा रंगली आहे. then I expresses public apology to Sharad Pawar says Deepak Kesarkar
23 hours ago

पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? ट्राय करा घरगुती स्प्रे, एकही माशी घरात येणार नाही
पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? ट्राय करा घरगुती स्प्रे, एकही माशी घरात येणार नाहीपावसाळ्यात माशा खुप त्रास देतात. जर तुमच्या घरात माशांचा त्रास वाढला असेल तर हे काही घरगुती उपाय ट्राय करा how to run away flies from home check these homemade spray
22 hours ago
''आजही मी शिवसेनेत; पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेच, शिंदे हे आमचे नेते''
''आजही मी शिवसेनेत; पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेच, शिंदे हे आमचे नेते'' आमचे नेते एकनाथ शिंदे असून उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख आहेत असे प्रतिपादन शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत केले. MLA vishwanath Bhoir statement about shivsena uddhav thackeray mumbai Latest maharashtra political news
19 hours ago
CM एकनाथ शिंदेंच्या कॉलमुळे MPSC च्या ४०० जागा वाढणार
CM एकनाथ शिंदेंच्या कॉलमुळे MPSC च्या ४०० जागा वाढणारपुण्यातील एका विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट मोबाईलवर केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली
10 hours ago
Video Viral: ...अन् जखमीच्या संतप्त पत्नीने माजी मुख्यमंत्र्याच्या 'तोंडावर फेकले पैसे'
Video Viral: ...अन् जखमीच्या संतप्त पत्नीने माजी मुख्यमंत्र्याच्या 'तोंडावर फेकले पैसे'छेडछाडीच्या वादातून झालेल्या हिंसाचारातील जखमींना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जखमींना दोन लाखांची मदत केली होती karnataka woment threw money former chief ministers face
12 hours ago
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच राज ठाकरेंच्या घरात औक्षण करून स्वागत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच राज ठाकरेंच्या घरात औक्षण करून स्वागतदेवेंद्र फडणवीस यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली deputy chief minister devendra fadnavis shivatirth meets raj thackeray Sharmila Thackeray
21 hours ago
चीनच्या घुसखोरीबाबत शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले, केंद्राने आम्हाला...
चीनच्या घुसखोरीबाबत शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले, केंद्राने आम्हाला...NCP Sharad Pawar On Chinese aggression says Centre informed some people about it
14 hours ago
केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीसांचा पोपट केलाय; राऊतांची टीका
केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीसांचा पोपट केलाय; राऊतांची टीका'शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तुंबळ युद्ध काही दिवसांत पहायला मिळेल.' : Vinayak Raut criticism of Devendra Fadnavis maharashtra politics
21 hours ago
गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या; घटनेनं खळबळ
गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या; घटनेनं खळबळअक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता. singer ketki mategaonkar cousin brother commits suicide in pune
14 hours ago
साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांचा अपघात : एकाचा जागीच मृत्यू, 1 गंभीर जखमी
साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांचा अपघात : एकाचा जागीच मृत्यू, 1 गंभीर जखमीदुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणाचा पाय मोडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. Tourist accident at Salher fort One killed on spot 1 seriously injured Nashik Latest Marathi News
14 hours ago

मायांगातील पिशवीच्या तोंडाचा व गर्भाशयाचा कॅन्सर, अंडकोश फायब्रॉइड आजार चोरपावलाने येतात. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणे गरजेचे असते. ते खूपच प्रभावीरीत्या करता येते, हे आपण या पूर्वीच्या लेखातून जाणून घेतले आहे. अनेकदा लैंगिक संबंधातील संसर्गामुळेही काही आजार वाढू शकतात. महिलांना घरामध्ये दुय्यम स्थान असल्याने त्या मोकळेपणाने बोलत नाहीत. त्या कोणताही आजार निमूटपणाने सहन करत राहतात.
You May Like
Make unlimited rewards a habit with Amazon Pay ICICI Bank Credit CardPay Amazon Se
कार विम्यावर 85% पर्यंत सूट! माहिती मिळविण्यासाठी फक्त कार क्रमांक प्रविष्ट करा.ACKO Car Insurance
Master's in Information Science: Machine LearningUniversity of Arizona

by Taboola
Sponsored Links

मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनातील अविभाज्य घटक! वयाच्या १३/१४व्या वर्षी सुरू झालेली ही क्रिया गरोदरपणाचा काळ सोडल्यास रजोनिवृत्तीपर्यंत दर महिन्याला अव्याहतपणे चालूच असते. इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या अंत:स्रावाच्या असमतोलतेमुळे कधी कधी गर्भाशयाच्या आतील स्तराची प्रमाणाबाहेर वाढ होऊन हा स्तर पाळीच्या वेळी बाहेर फेकला जातो, तेव्हा अनियमितपणे होणारा अतिरक्तस्राव व पोटात जास्त दुखणे, अशा प्रकारचा त्रास संभवतो. हा काळ स्त्रीला शारीरिक व मानसिकदृष्ट्या खूपच क्लेशदायक ठरतो. साधारणतः वयाच्या ३० ते ३५ वर्षांनंतर ही तक्रार आपले उग्र स्वरूप दाखवायला सुरवात करू शकते. परंतु गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे ही एक मोठी शस्त्रक्रिया असते. शारीरिक, आर्थिक व मानसिकदृष्ट्या रुग्ण अधू होतो. शिवाय सर्वसामान्य शस्त्रक्रियेत असणारे व त्यासाठी लागणाऱ्या भूल देण्यातील धोकेही वेगळेच! पिशवीबरोबर अंडाशयही काढून टाकल्यास पेशंटला मेनोपॉजल सिंड्रोम अधिक तीव्रतेने जाणवतो. यात अंगातून गरम वाफा येणे, घाम येणे, चिडचिडेपणा, कातडीचा रुक्षपणा, योनीमार्गाचा कोरडेपणा, हाडे ठिसूळ होणे, हृदयावर परिणाम होणे, मूत्राशयाचे वारंवार इन्फेक्शन होणे इत्यादी प्रकार जाणवतात. आजपर्यंत गर्भपिशवीच्या ऑपरेशनला कोणताही पर्याय नव्हता, परंतु या शस्त्रक्रियेस अत्यंत प्रभावी व निर्धोक असे पर्याय आता उपलब्ध झालेले आहेत.
१) बलून थेरपी
२) टीसीआरई
३) मायक्रोवेव्ह ॲब्लेशन
४) एल. एन. जी. सिस्टीम
५) नवीन औषधोपचार
या सर्वप्रकारांतील थेरपीचे फायदे
१) गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्यासाठी मोठे ऑपरेशन करावे लागत नाही.
२) शरीरावर कोणतीही जखम किंवा व्रण नसतो.
३) भूल व शस्त्रक्रिया छोटी असल्याने तिच्या अनुषंगाने येणारे धोकेदेखील कमी असतात.
४) महिना दीड महिना विश्रांतीची गरज नाही. दोन-तीन दिवसांमध्ये कामाला सुरवात करता येते.
५) रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणापूर्वी पोटावर शस्त्रक्रिया असणाऱ्या स्त्रियांना अत्यंत फायदेशीर व कमी धोकादायक.
६) ८५ ते ९० टक्के महिलांची पाळी बंद होते. उरलेल्यांमध्ये पाळी चालू राहिली, तरी रक्तस्रावाचे प्रमाण अल्प असते.
७) गर्भ अंडकोष शरीरात राहिल्याने मेनोपॉजचे सर्व त्रास कमी होतात.
८) ऑपरेशनच्या वेळी जरुरी असणाऱ्या बाहेरील रक्ताची गरज भासत नाही.
९) उपचारानंतर तीन-चार दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतात.
११) रुग्ण त्याच दिवशी घरी जातो.
नवीन अत्याधुनिक उपचारपद्धती म्हटले, की ती महाग व सर्वसामान्यांना परवडणार नाही अशी वाटते, परंतु या सर्व थेरपी याला अपवाद आहे. उपचार, औषध, हॉस्पिटल, भूलतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांचा सर्व खर्च गर्भपिशवी काढून टाकणाऱ्या ऑपरेशनच्या मानाने कमी आहे. गर्भपिशवी काढून टाकण्याच्या ऑपरेशनच्या मानाने खर्च कमी आहे. गर्भपिशवी काढून टाकण्याच्या ऑपरेशनपूर्वी या वेगवेगळ्या थेरपीचा आपण जरूर विचार करावा.
Web Title: Women Health Bharati Dhore Patil Maitrin Supplement Sakal Pune Today
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..

solved 5
wordpress 4 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info