गर्भाशय कोणत्या बाजूला असते?pregnancytips.in

Posted on Sun 13th Nov 2022 : 06:57


सस्तन प्राण्यांतील मादीमध्ये पोटात असलेला प्रजननाचा अवयव. हा अवयव इंग्लिश भाषा टी (T) आकाराचा असतो. वरच्या दोन बाजू गर्भनलिकांना जोडलेल्या असतात. खालील बाजूस गर्भाशयमुख व योनी असते.

प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा अवयव आहे. फलित बीजांड (गर्भ) रुजवणे, सुरक्षित वातावरणात वाढवणे व योग्य कालावधीनंतर प्रसूतीची प्रक्रिया घडवून तो बाहेरच्या जगात सोडणे ही त्याची कामे आहेत.
रचना

श्रोणिगुहेत दोन्ही बाजूंच्या बीजांडवाहिन्या आणि योनी यांच्या मधे गर्भाशय असते. ही त्रिकोनी, उलट्या धरलेल्या पेरू किंवा नासपतीच्या आकाराची, स्नायूंची बनलेली जाड पिशवी असते. त्याची आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोणी असते. त्याच्या वरच्या रूंद, घुमटकार आणि जाड भागाला बुध्‍न म्हणतात. त्याच्या दोन टोकांना बीजांडवाहिन्या जोडलेल्या असतात आणि त्या गर्भाशयपोकळीत उघडतात. त्याच्या खालच्या निमुळत्या भागाला ग्रीवा (मान) म्हणतात व तिच्यातून गर्भाशयाचे तोंड योनिमार्गात उघडते. गर्भाशयाची लांबी ७.५ सेंमी.; घुमटाकार बुध्नाची रूंदी ५ सेंमी. आणि जाडी २.५ सेंमी. असते.

गर्भाशयाला तीन थर असतात.
कार्य
तपासणी
तपासणी पद्धती

गर्भाशयाच्या तपासणीकरिता खालील तपासणी पद्धती वापरतात.

योनी मार्गातील तपासणी - योनी मार्गातून ग्लोव्ह्जच्या मदतीने तपासणी करून गर्भाशयाचा आकार, आकारमान तपासले जाते.
सोनोग्राफी - पोटाची सोनोग्राफी करून गर्भाशयाचा आकारमान व स्थान निश्चित केले जाते. गर्भाशयात असणारा गर्भ व त्याच आकारमान व वाढ पहाण्याकरिता सोनोग्राफी केली जाते.
एमआरआय- चुंबक व रेडिओ लहरींचा चित्र घेण्यासाठी वापर करून गर्भाशयाचा आकारमान व स्थान निश्चित केले जाते.
क्ष-किरण- शरीराच्या अंतर्भागात पाहण्यासाठी व चित्र घेण्यासाठी एक प्रकारच्या उत्सर्जनाचा वापर केला जातो.
सीटी स्कॅन- परिपूर्ण प्रतिमा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कोनांतून शरीराची अनेक चित्रे घेऊन गर्भाशयाच्या कर्करोग किंवा इतर आजारांचा अभ्यास केला जातो.
लॅप्रोस्कोपी- भूल देऊन केली जाणारी शस्त्रक्रिया, ज्यात डॉक्टर तुमच्या पोटाला बारीकसा छेद करतात आणि आत गर्भाशयाची तपासणी करण्याकरिता लहानशी नळी सोडतात.
हिस्टेरोस्कोपी- या शस्त्रक्रियेत डॉक्टर आत गर्भाशयाच्या अस्तराची पाहणी करण्याकरिता कॅमेरा जोडलेली एक लांब नळी योनिमार्गातून थेट गर्भाशयात सोडतात व गर्भाशयात सलाइन अथवा कार्बन डायॉक्साइड भरतात. डॉक्टरांबरोबरच रूग्णालाही गर्भाशयात फायब्रॉइड्‌सची झालेली वाढ व समस्या हिस्ट्रोस्कोपीद्वारे दाखवता येते. नंतर हिस्ट्रोस्कोप काढून टाकला जातो. हे काम १ ते दोन मिनिटांत होते. गर्भाशय अस्तराचा नमुना घेण्यासाठी प्लास्टिकची नळी वापरली जाते.
गर्भाशयाचे आतील अस्तर खरवडून काढून त्याची सुक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते.

गर्भाशयचे आजार
गर्भाशय व इतर अवयव
गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स)

गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स) म्हणजे गर्भाशयाच्या भिंतींमध्ये होणारी स्नायू, पेशी व इतर ऊतींची वाढ असते. फायब्रॉइड्‌सचा जरी गाठी असा उल्लेख केला असला तरी बहुतांश वेळा त्या कर्करोगाशी संबंधित नसणाऱ्या असतात. वैद्यकीय परिभाषेत फायब्रॉइड्‌सना युटेरिन लिओम्योमा(Uterine Leioyoma) असे संबोधले जाते. फायब्रॉइड्‌सची वाढ एकेरी अथवा पुंजक्यात (समूहाने) होऊ शकते. त्या आकाराने अगदी लहान म्हणजे सफरचंदाच्या बी एवढया (एक इंचाहूनही कमी) किंवा द्राक्षाच्या फळाएवढया (आठ इंच अथवा त्याहून अधिक) मोठया असू शकतात.
गर्भाशयाचा कर्करोग

गर्भाशयाच्या मुखातील गाठी म्हणजे ऊतींची वाढ होऊन कर्करोग होण्याचे शक्यता असते.
गर्भनलिकांच्या गाठी

गर्भनलिका अवरुद्ध होऊन त्यामध्ये गाठी तयार होण्याची शक्यता असते.

-----------------------------------------

अंड्यांचे निषेचन (फलन) ज्यांच्या शरीराच्या आत होते अशा बहुतेक प्राण्यांत अंडवाहिनीचा ( स्त्री-बीजांड वाहून नेणार्‍या नलिकेचा ) एक भाग रूपांतरित होऊन विकास पावणार्‍या भ्रूणाचे रक्षण करण्याकरिता भ्रूणकोष्ठ अथवा गर्भाशय तयार होतो. ही सरंचना यंत्रणा ( गर्भाशय ) अंडवाहिनीचा वरचा भाग ( याला फॅलोपिअस या शास्त्रज्ञांच्या नावावरून फॅलोपिअन नलिका म्हणतात ) आणि योनी यांच्या मधे असते.

खालच्या प्रतीच्या पृष्ठवंशी ( पाठीचा कणा असलेल्या ) प्राण्यांमध्ये आढळणारा गर्भाशय सामान्यत: दुहेरी असतो. प्रत्येक अंडवाहिनीचा खालचा भाग रूपांतरित होऊन दोन गर्भाशय तयार होतात. परंतु स्तनिवर्गात अंडवाहिन्यांची एकत्रित होण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे गर्भाशय प्रदेशाच्या थोड्या भागाचे किंवा सगळ्या गर्भाशय प्रदेशाचे एकीकरण झालेले आढळते.गर्भाशयाचे प्रकार यामुळे दोन गर्भाशय आणि एक गर्भाशय यांच्यामध्ये असणार्‍या सर्व अवस्था सस्तन प्राण्यात आढळून येतात.

अशा प्रकारे अंडजस्तनींमध्ये ( अंडी घालणार्‍या स्तनिप्राण्यांमध्ये ) दोन स्पष्ट गर्भाशय ( दोन योनिमार्ग नसलेले ) असतात व शिशुधान स्तनींमध्ये ( पिल्‍लू बाळगण्यासाठी पिशवी असलेल्या प्राण्यांमध्ये ) दोन गर्भाशय आणि दोन वेगळे योनिमार्ग असतात. अशा गर्भाशयाला द्वि-गर्भाशय (यूटेरस ड्युप्लेक्स) म्हणतात. अपरास्तनींमध्ये (वार असणार्‍या स्तनी प्राण्यांमध्ये) उंदीर,ससा, बीव्हर यांच्यासारखे कृंतक (कुरतडून खाणारे) प्राणी, त्याचप्रमाणे हत्ती, काही वटवाघुळे आणि दक्षिण आफ्रिकेतील आर्डव्हॉर्क या सर्व प्राण्यांना एकाच योनिमार्गात उघडणारा द्वि-गर्भाशय असतो. डुकरे,गुरे, कित्येक कृंतक प्राणी, काही वटवाघुळे व मांसाहारी प्राणी यांत दोन्ही गर्भाशयांच्या एकीकरणाला सुरूवात झालेली दिसून येते. अशा गर्भाशयाला द्विभक्त गर्भाशय (यूरेटस बायपार्टायटस) म्हणतात. खुरी प्राणिगण, तिमिगण (सागरातील मोठ्या प्राण्यांचा वर्ग) व कीटकभक्षिगण या गणांतील प्राण्यांत व काही मांसाहारी गणांतील प्राण्यांत शिंगासारखे दोन प्रवर्ध (फाटे) असलेला गर्भाशय असतो. अशा गर्भाशयाला द्वि-शृंगी (दोन शिंगे असलेला) गर्भाशय म्हणतात आणि अखेरीस कपी व माणूस यांत दोन फॅलोपिअन नलिका असलेला गर्भाशय असतो, त्याला एक गर्भाशय किंवा साधा गर्भाशय (यूरेटस सिंप्लेक्स) असे म्हणतात.
मानवी गर्भाशय
स्रीच्या जनन तंत्रात (प्रजोत्पादन यंत्रणेत) जाड, स्नायुमय, पिशवीसारखा गर्भाशय असतो. त्याचा आकार उलट्या धरलेल्या पेरूसारखा किंवा नासपतीच्या फळासारखा असतो. गर्भाशयाचे निमुळते तोंड खालच्या बाजूस असून ते योनिमार्गात उघडते. गर्भाशयाची लांबी ७.५ सेंमी.; घुमटाकार भागाची रूंदी ५ सेंमी. आणि जाडी २.५ सेंमी. असते.

रचना
रचनात्मक दृष्ट्या गर्भाशयाचे दोन भाग होतात. वरचा रूंद गोल घुमटकार आणि जाड भाग, याला बुध्‍न म्हणतात; खालचा अरूंद, लांबट आणि निमुळता भाग, याला ग्रीवा म्हणतात. ग्रीवेचे वरचे तोंड गर्भाशयाच्या पोकळीशी जोडलेले असून त्याला ग्रीवेचे अंतर्मुख आणि खालच्या योनिमार्गात उघडणार्‍या तोंडाला बहिर्मुख असे म्हणतात. बुध्‍नाच्या दोन्ही बाजूंना कोपर्‍यात लांब नलिका जोडलेल्या असून त्यांना अंडवाहिन्या असे म्हणतात. अंडवाहिनीचे बाहेरचे टोक झालरीसारखे असते व ते अंडाशयावर लोंबत असून अंडाशयाला चिकटलेले असते. अंडाशयाच्या मागच्या बाजूला रूंद असा एक तंतूमय बंध असून त्या बंधाला विस्तृत बंध असे नाव आहे. अंडाशयाच्या मध्यवर्ती टोकापासून गर्भाशय बुध्‍नाच्या कोपर्‍यापर्यंत जाणार्‍या बंधाला गोल बंध असे म्हणतात. या दोन बंधांमुळे गर्भाशय जागच्याजागी कायम राहतो.

गर्भाशयाचे स्‍नायू खूप जाड असून आतील पोकळी अरूंद आणि त्रिकोणी फटीसारखी असते. गर्भाशयाला एकूण तीन थर असतात. सर्वांत बाहेरचे आवरण पर्युदराचे (उदरातील इंद्रियांवरील पडद्यासारख्या आवरणाचे) बनलेले असते. मधले आवरण स्‍नायूंचे असून ते सर्वांत जाड असते. या आवरणाला रक्तवाहिन्या आणि तंत्रिका (मज्‍जा) यांचा भरपूर पुरवठा असतो. गर्भाशयात गर्भधारणा झाली म्हणजे हे स्‍नायू हलके हलके लांबत जातात व गर्भाशय पोकळी त्यामुळे मोठी होत जातात. सगळ्यात आतले आवरण अंत:स्तराचे असून तो स्तर गर्भाशयाच्या आतल्या पृष्ठभागावर पसरलेले असतो. हा अंत:स्तर ग्रीवेच्या अंत:स्तराशी व योनिपोकळीतील अंत:स्तराशी अखंड असतो.

गर्भाशयाचा अंत:स्तर हा श्लेष्मकलेचा (बुळबुळीत पातळ अस्तराचा) बनलेला असून तो सु. २ मिमी. जाड असतो. अंडकोशिकेची (स्त्रीबीजांडाची) वाढ होत असताना या अंत:स्तराची जाडी वाढते आणि त्यात रक्तवाहिन्या व ग्रंथींची वाढ होत असते.

अंडकोशिकेचे निषेचन न झाल्यास गर्भाशयाचा अंत:स्तर अपकर्षित होऊन (आकारमान पूर्ववत होऊन) रक्तासह विसर्जित केला जातो. या प्रकारालाच ‘मासिक पाळी’ असे म्हणतात. हे ऋतुचक २८ ते ३० दिवसांचे असते [→ऋतुस्त्राव व ऋतुविकार].

गर्भाशय हे कटीरपोकळीत दोन्ही बाजूंचे अंडाशय व अंडनलिका यांच्यामध्ये असून त्याच्या पुढील बाजूला मूत्राशय व मागील बाजूला गुदांत्र (आतड्याचा शेवटचा भाग) असते.

गर्भाशय व जननेंद्रिये यांची वाढ म्यूलेरियन नलिकेपासून (अंडवाहिनीच्या शेजारून जाणार्‍या व म्यूलर या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या नलिकेपासून) होऊन दोन्ही बाजूंचे गर्भाशयार्घ एकमेकांस मिळून त्यांचा गर्भाशय बनतो.

गर्भाशयाचे विकार: गर्भाशयाच्या विकारांचे चार प्रकार कल्पिलेले आहेत:

(१) जन्मजात,

(२) शौथज,

(३) अर्बुद व

(४) क्रियात्मक.

(१)जन्मजात: भ्रूणावस्थेमध्ये गर्भाशयाची नीट वाढ झाली नाही, तर द्विखंड गर्भाशय दिसून येतो. यात प्रत्येक बाजूला एकएक गर्भाशय, अंडशय व अंडवाहिनी स्वतंत्र असते . क्वचित प्रसंगी बाहेरून जरी गर्भाशय एकच दिसला, तरी आत एका पडद्यामुळे गर्भाशयाचे दोन भाग झालेले असतात. हा पडदा पूर्ण वा अपूर्ण असतो. गर्भाशयाचे दोन भाग असले, तरी त्यांतील एकच भाग चांगला वाढलेला असतो. क्वचित प्रसंगी दोन्ही भागांमध्ये गर्भधारणा होते, परंतु त्यांपैकी एकाच गर्भाची वाढ पूर्ण होऊ शकते. अपूर्ण वाढ झालेल्या गर्भाशयात गर्भधारणा झाली असता गर्भाशय पूर्ण वाढलेला नसल्यामुळे गर्भ अंडवाहिनीतच वाढतो व त्यामुळे नलिकागर्भाची सर्व लक्षणे दिसतात.

(२)शोथज विकार: ( दाहयुक्त सूजेमुळे होणारे विकार). आघात, बाळतपण अथवा गर्भपात यांमुळे जंतुसंसर्ग होऊन गर्भाशयाच्या अंत:स्तराला सूज येते. गर्भाशय ग्रीवेमधील अंत:स्तरात हा विकार अधिक प्रमाणात दिसतो. उपदंश (गरमी), क्षय, पूयप्रमेह (परमा) वगैर रोगांच्या जंतूंचा संसर्ग झाल्यासही गर्भाशय- अंत:स्तरशोध होतो.

(३) अर्बुद : (नव्या पेशींच्या वाढीमुळे निर्माण होणारी आणि शरीरक्रियेस निरूपयोगी असणारी गाठ ). गर्भाशयातील अंत:स्तरापासून मोड, तंत्वार्बुद वगैरे सौम्य अर्बुदे पुष्कळ प्रमाणात दिसतात. मारक अर्बुद (कर्करोग) ग्रीवेमध्ये अधिक प्रमाणात दिसते. त्यामानाने गर्भाशयकायेमध्ये त्याचे प्रमाण कमी असते.

(४) क्रियात्मक विकारांत ऋतुविकार मोडतात [→ऋतुस्त्राव व ऋतुविकार].

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info