गर्भाशयात सर्वात जास्त हालचाल कोण करते?pregnancytips.in

Posted on Thu 24th Nov 2022 : 13:42

बाळं गर्भात नेमकं काय करत असतं? कितव्या महिन्यापासून जाणवते हालचाल.. कुतूहल वाढवणारी भावना

गर्भधारणेचा काळ हा प्रत्येक मातेसाठी खास असतो. आपण आपल्यातून एका जीवाची निर्मिती करत असतो, ही भावना सुखावणारी असते. बाळाला न पाहता त्याची हालचाल अनुभवणे हा सुखद अनुभव असतो. गरोदरपणात बाळाची हालचाल हे त्याच्या हेल्दी आरोग्याची लक्षणे असतात. त्यामुळे त्या हालचालींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

गर्भातील आपल्या बाळाची पहिली हालचाल जाणवणे आणि तो अनुभव घेणे हा प्रत्येक आईसाठी भावूक क्षण असतो. हळूहळू आई आपल्या गर्भातील बाळांची हालचाल ओळखतात. कधी कधी गर्भातील बाळ जेवल्यावर हालचाल करतं तर काही बाळ गाणी ऐकल्यावर हालचाल करतात. आई बाळाशी संवाद साधते तेव्हा देखील बाळ चांगला प्रतिसाद देत असतं. न पाहता या दोघांची भावनिक संवाद सुरू होतो.

जसजसे बाळ मोठे होते, तसतसे त्याच्या हालचाली देखील मजबूत होतात आणि कधीकधी तुम्हाला यामुळे वेदना होऊ शकतात. या लेखात, गर्भात बाळाच्या हालचाली कशा वाटतात आणि गर्भधारणा वाढत असताना त्यांच्यात काय बदल होतात याबद्दल माहिती मिळेल.
​गर्भातील बाळाची हालचाल केव्हा जाणवते?

गर्भातील बाळाची हालचाल ही १८ ते २० आठवड्यानंतर जाणवायला सुरूवात होते. जर तुमची पहिली गर्भधारणा असेल तर ही हालचाल लवकर जाणवत नाही. अनेकदा गर्भवती महिलेला वाटतं की, हा आपल्या पोटातील गॅस असेल पण तसं नसून ती बाळाची हालचाल असते. अनेकदा आईला शांत राहून हा अनुभव घेणं गरजेचं आहे. बाळाची हालचाल १६ आठवड्यापासून हळूहळू जाणवते. २४ आठवड्यापर्यंत तुम्हाला हालचाल जाणवली नाही तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

​बाळ गर्भात नेमकं काय करत असतं?
अल्ट्रासाऊंड स्कॅनमार्फत बाळ गर्भात काय करत असतं याचा अंदाज लावू शकतो. तसेच एनॉमली स्कॅन आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये देखील बाळाची हालचाल जाणवते. गर्भावस्थेच्या सुरूवातीपासूनच बाळ आपलं शरीर एका कुशीवर घेऊन हालचाल करतं. त्यानंतर हळूहळू बाळाच्या अवयवांची वाढ होत असते. तसेच बाळांच्या मांसपेशींची देखील वाढ होते. दहाव्या आठवड्यात गर्भात बाळ आपली मान हलवण्यास सुरूवात करतात. १३ आठवड्यानंतर बाळ एमनियोटिक द्रव काढण्यापासून सुरूवात करते. २२ व्या आठवड्यात गर्भात येणाऱ्या प्रकाशाकडे बाळ आपली मान नेण्यास सुरूवात करतो. त्यानंतर बाळ आपला अंगठा देखील चोखायला सुरूवात करतो किंवा गर्भनाळेशी देखील खेळायला सुरूवात करतात.

​दिवसातून किती वेळा जाणवते बाळाची हालचाल
आईने गरोदरपणात गर्भातील बाळाच्या हालचालींकडे विशेष लक्ष ठेवलं पाहिजे. हे तुमच्या चिंतेचंही कारण ठरू शकतं किंवा तुमच्यासाठी तो रोमांचक क्षण देखील ठरू शकतो. गर्भात बाळ नेमकं कधी आणि कितीवेळा हालचाल करतं याची काही ठराविक माहिती नाही. पण या गोष्टींची नोंद ठेवणे आवश्यक असते. कारण बाळाच्या हालचालीचा आणि मातेच्या शेड्युलचा संबंध असतो. कारण आईने काही विशिष्ट पदार्थ खाल्ला आणि बाळाला आनंद झाला की तो हालचाल करतो किंवा आई आनंदी असली तरीही बाळ खूप हालचाल करते.

​बाळाची हालचाल जाणवली नाही तर काय कराल?
जर मातेला दोन आठवड्यात १० वेळा हालचाल जाणवली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पण त्या अगोदर मातेने थोडा वेळ शांत राहावे. थोडा स्नॅक्स खावा, आराम करावा, डाव्या कुशीवर झोपावं. कारण अनेकदा माता हालचाल करत असेल तर बाळ झोपी जातं. अशावेळी वरील कृती केल्यावर बाळ जागं होतं. तसेच थोडं गार गोष्ट खा म्हणजे बाळाच्या तापमानात बदल झाल्यावर ते हालचाल करू शकता. काही बाळांना संगीताची आवड असते. अशावेळी तुम्ही गाणं ऐका ज्याचा फायदा होईल.

बाळाच्या हालचालीबद्दल डॉक्टरांशी कधी संवाद साधाल?
बाळाच्या हालचालीबाबत कायमच डॉक्टरांशी संवाद साधला पाहिजे. अशीही काही कारणे आहेत ज्यामुळे बाळाला गर्भाशयात कमी हालचाल जाणवणे अगदी सामान्य आहे. उदाहरणार्थ, जर तुमची प्लेसेंटा गर्भाशयात पुढे सरकत असेल किंवा तुमचे बाळ गर्भाशयात मागे तोंड करून पडलेले असेल तेव्हा देखील तुम्हाला कमी हालचाल जाणवेल. तुमच्या डॉक्टरांनी तपासणीसाठी बोलावल्यास, ती तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकेल आणि कदाचित सर्व काही ठीक आहे याची खात्री करण्यासाठी लगेचच अल्ट्रासाऊंड स्कॅन करेल. बहुतेक प्रकरणांमध्ये सर्व काही ठीक होते आणि निरोगी गर्भधारणा चालू राहते.

या चाचण्यांनंतर, तुम्हाला घरी पाठवले जाईल, परंतु तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचालींची जाणीव असणे आवश्यक आहे. तुमच्या बाळाच्या हालचाली पुन्हा मंद होत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी किंवा हॉस्पिटलशी संपर्क साधा. जर तुमच्या बाळाच्या हालचाली क्वचितच होत असतील तर त्याला अतिरिक्त देखरेखीची आवश्यकता असेल.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info