तान्ह्या बाळाची वाढ होण्यासाठी तुम्ही त्याला काय खायला द्याल?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 13:34

बालकाचे पहिले वर्ष : पोषण व आहार

Oil Ghee Butter पोषण व वाढ – वाढ, विकास व निरोगीपणा या सर्वांसाठी लागणारी प्रमुख गोष्ट म्हणजे योग्य पोषण. एखाद्या समाजाचे आर्थिक, सामाजिक मुल्यमापन करण्याचा एक मार्ग म्हणजे या समाजातील लहान मुलामुलींच्या पोषणाचे मुल्यमापन करणे. योग्य स्वच्छ आणि पुरेशा अन्नाआभावी आज आपल्या देशात अनेक रोग दिसतात.

योग्य अन्न न मिळाल्याने मुलांची वाढ खुरटते. अति कुपोषणामुळे बौध्दिक वाढही खुंटते. रोगाचा मुकाबला करण्याची शक्ती कमी होते. जुलाब, जंत आणि कुपोषण यांचे एकमेकांमध्ये अगदी घट्ट नाते आहे. कारण सर्वसाधारणपणे आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे परिसराची स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची योग्य काळजी राखली जात नाही. अनेक घरातील सर्व मोठी माणसे कामावर जातात व मुलांची जबाबदारी त्याचेच मोठे भावंड घेत असतात.

लहानपणी कुपोषण, खुरटलेली वाढ आणि रोगटपणा ज्या मुलांच्या मागे लागतो, तो मोठेपणातही त्यांची सहसा पाठ सोडत नाही. मोठेपणीही या मुलांची काम करण्याची शक्ती, रोगप्रतिकारशक्ती कमी पडते. म्हणून लहानपणापासून योग्य व समतोल आहार महत्त्वाचा आहे.
स्तनपान महत्त्वाचे

Breastfeeding जन्मापासून पहिले सहा महिने बाळाला फक्त स्तनपान द्यावे. या काळात आईचे दूध हा बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. बाळ जन्मल्यावर लगेच अर्ध्या तासात पाजण्यासाठी अंगावर घेणे महत्त्वाचे असते. पहिल्या चिकामध्ये भरपूर प्रथिने व रोगप्रतिबंधक घटक (प्रतिघटक) असतात. म्हणून हा चीक वाया जाऊ देऊ नये.

पहिल्या दिवसापासून अंगावर पाजू लागल्याने दूध येण्याची क्रिया लवकर व सुलभ होते. असे केले नाही तर छाती दाटून दुखते व बाळाला अंगावर ओढणे अवघड होते.

तिस-या ते चौथ्या दिवशी चीक संपून नेहमीसारखे दूध येणे सुरू होते. दूध कमी पडल्यास उकळून थंड केलेले पाणी, साखर घालून वाटी-चमच्याने पाजावे. पण प्रत्येक वेळी प्रथम बाळाला पाजायला घेणे आवश्यक आहे.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info