नवजात बाळासाठी तेल मालिश कधी सुरू करावी?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 13:00

जन्मानंतर बाळाला जवळ जवळ ५ ते ६ दिवसांनी मालिश करायला सुरुवात करतात. बाळाला बोलायला येत नसल्याने आणि ते फारच लहान असल्याने आपण केलेली मालिश ते सहन करतं. पण मंडळी, थांबा... मालिश करण्याची देखील एक पद्धत असते. ती योग्य पद्धत काय आहे हे जाणून घ्या आणि बाळाचं आरोग्या सुरक्षित ठेवा!
बाळ जन्माला आलं की त्याची सगळ्या बाजूंनी नीट काळजी घ्यावी लागते. खास काळजी घ्यावी लागते त्याच्या शरीराची, कारण नवजात बाळाचं शरीर हे खूप नाजूक असतं. त्यामुळे त्याच्या शरीराला जपावं लागतं. त्याचं हेच नाजूक शरीर घट्ट आणि बळकट बनवण्यासाठी बाळाला मालिश केली जाते. बाळाला मालिश करण्याचे खूप फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याच्या शरीराला आकार मिळतो आणि त्याचे अवयव सक्षम होत जातात. बाळाला देखील मालिश घेतल्यावर खूप छान वाटतं, तुम्ही देखील पाहिलं असले की मालिश घेताना जरी बाळ रडत असलं तरी जेव्हा मालिश पूर्ण होते आणि ते बाळाला आपण अंघोळ घालतो तेव्हा पाच मिनिटांत ते झोपतं, कारण त्याला मालिश केल्याने आराम मिळतो. त्यामुळे बाळाला मालिश ही करायलाच हवी, पण मंडळी, तुम्हाला हे माहित आहे का की मालिश करण्याची पण एक योग्य पद्धत आहे! हो, बाळाला कशीही मालिश करून चालत नाही, यामुळे त्याच्या शरीराला धोका होऊ शकतो, म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बाळाला मालिश करण्याचा योग्य मार्ग आणि सोबत काही गोष्टी जसे की मालिशमुळे नक्की काय फायदे होतात? बाळाला मालिश करणे कधीपासून सुरु करावे. चला तर जाणून घेऊया.
बाळाला मालिश कधी करावी?

बाळाच्या जन्मानंतर काही आठवड्यांनी तुम्ही बाळाला मालिश करायला सुरुवात करू शकता पण यासाठी तुम्हाला बाळाच्या मूडची खास काळजी घ्यावी लागते. मालिश देताना बाळ शांत असायला हवं. मालिश करताना इतक्या जोरात करू नये की बाळाला ते सहन होणार नाही. मायो क्लिनिकच्या अभ्यासानुसार, मालिश करताना जेव्हा बाळ हात मागे घेतं किंवा डोकं मागे खेचू लागतं तेव्हा समजावं बाळ मालिश घ्यायला तयार नाही. बाळाला मालिश देण्याची योग्य वेळ ही स्तनपान केल्यावर ४५ मिनिटांनी असते. दुध पाजल्यावर लगेच मालिश दिल्याने बाळ उलटी करू शकते.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info