पोटात मुलगा आहे का मुलगी कसे ओळखावे?pregnancytips.in

Posted on Mon 17th Feb 2020 : 18:11

'लिंग' निदान करण्याच्या '9' रंजक पद्धती !

'मुलगा' की 'मुलगी' याचा अंदाज लावण्याच्या काही रंजक पध्दती !

Written by Editorial Team | Updated : January 5, 2017 9:06 AM IST

भारतात गेल्या काही वर्षांत गर्भपात करण्याचे तसेच लिंग निदान करण्याचे अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले. त्यातील काही दोषींवर कडक कारवाई करून त्यांना तुरूंगावासची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र असे प्रकार रोखण्यासाठी कठोर शिक्षेबरोबरच विचारसरणीतही बदल होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या 'बेटी बचाव, बेटी पढाओ' या उपक्रमातून हा प्रयत्न केला जात आहे. मात्र अनेकांना आपले होणारे बाळ हे मुलगी आहे की मुलगा याबाबत फार उत्सुकता असते. मग अशांसाठी तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय काही पारंपारिक आणि रंजक पद्धतीने 'लिंग निदाना'चा अंदाज बांधता येतो. मग पहा हे काही रंजक प्रकार .. या केवळ उत्सुकतेतून अंदाज बांधण्याच्या पद्धती आहेत. त्यावर विश्वास ठेवून कोणताही ठोस निष्कर्ष काढू नका. लिंगनिदान करणे चूकीचे आणि बेकायदेशीर आहे.

1) पोटाच्या आकारानुसार - पूर्वीच्या काळी भारतीय स्त्रिया, गर्भवती स्त्रीच्या पोटाच्या आकारावरून मुलगा की मुलगी होणार याबाबत अंदाज लावत असे. जर स्त्रीचे पोट खूपच वाढलेले आणि बाहेर आले असल्यास मुलगा होणार. तर व्यवस्थित गोल पण पायांना समांतर असल्यास मुलगी होण्याचा अंदाज असतो.

2) गर्भाच्या हालचालीवरून - पोटातील गर्भ किती आणि कुठल्या जागी लाथ मारतो यावरूनही लिंगाचे निदान करता येते. बरगड्यांच्या वरच्या बाजूला तुमच्या गर्भाची हालचाल जाणवत असेल तर ती मुलगी असण्याची शक्यता आहे. तर पोटाच्या खालच्या बाजूला बाळ लाथ मारत असल्यास तो मुलगा असण्याची शक्यता असते.
Also Read

प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !
मासिकपाळी की गर्भपात - नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ?
स्तनपानाच्या काळात पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे का?

More News

3) बदलणारे मूड्स - जर्नल ऑफ सायकोलॉजी आणि बिहेविरल यांच्यानुसार गर्भारपण्याच्या पहिल्या दोन टप्प्यांत जर स्त्रिया सतत आणि प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करत असतील तर त्या मुलाला जन्म देण्याची शक्यता आहे. तर गर्भारपणाच्या सुरवातीच्या काळात जर त्या संतुलित राहत असतील तर मुलीचा जन्म होण्याची शक्यता असते.

4) काही विशिष्ट पदार्थांच्या नावडीनुसार - गर्भारपणात डोहाळ्यांप्रमाणेच काहीजणींमध्ये विशिष्ट पदार्थांबाबत तिटकारादेखील निर्माण होतो. एका संशोधनानुसार दुपारच्या जेवणानंतर जर त्यांना मळमळत असेल तर मुलगा होण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’

5) डोहाळे - हे गर्भारपणातील एक प्रमुख आकर्षण ! तुम्हांला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्हांला तशीच गोड मुलगी होण्याची शक्यता आहे. तर तिखट किंवा चमचमीत पदार्थांचे डोहाळे म्हणजे तुमचा मुलगा होण्याची शक्यता असते. चटकदार डोहाळ्यांवर मात करा या '10' हेल्दी पदार्थांनी !
by Taboola
Sponsored Links
You May Like
Get your special bonus up to 20 000 INR1Xbet
Couple’s Life Was Forever Changed After They Accepted This 30-Day ChallengeEveryDayMonkey

6) स्तनांमध्ये होणारे बदल - गर्भारपणात स्त्री शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे सामान्य स्थितीपेक्षा तुमचे स्तन मोठे व फुललेले जाणवत असल्यास ही मुलीची चाहूल आहे. तर काहीच विशेष बदल जाणवत नसल्यास मुलगा होण्याची शक्यता आहे. ( जाणून घ्या स्त्रीयांच्या स्तनाबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी)

7) बोलका चेहरा - गर्भारपणात तुमच्या चेहर्‍यावर अ‍ॅक्ने तसेच केसांचा रुक्षपणा वाढला असेल तर तुमची राणी हे तुमच्याकडून हिरावून घेतयं असा जुना समज आहे. तर तुमच्या केसांचे आणि चेहर्‍याचे सौंदर्य वाढत असेल तर तुम्हांला मुलगा होण्याची शक्यता आहे.

8) वेडींग रिंग टेस्ट - ही एक फार गंमतशीर चाचणी आहे. स्त्रीच्या साखरपुड्यातील अंगठीने ही चाचणी करायची असते. यामध्ये अंगठी दोर्‍याला बांधुन ती स्त्रीच्या पोटावर धरावी. ती पुढे-मागे सरकल्यास 'मुलगा' तर गोलाकार स्थितीत सरकल्यास 'मुलगी' होण्याची शक्यता आहे. हाच प्रयोग तुम्ही सुईसोबतही करू शकता. यामध्ये ती दोर्‍याला बांधून पोटावर धरावी. जर सुई घडाळ्याच्या काट्यांप्रमाणे सरकली तर 'मुलगी' उलट झाल्यास मुलगा होण्याची शक्यता आहे.

9) गर्भाच्या हृद्याच्या ठोक्यांनुसार- हा थोडा वास्तविक व वैज्ञानिकदृष्ट्या शक्य असा प्रयोग आहे. मात्र याबाबत पुरेसे संशोधन समोर आलेले नाही. गर्भाच्या हृदयाचे ठोके जर 140 bmp पेक्षा अधिक असतील तर ती मुलगी असण्याची शक्यता आहे. तर कमी असल्यास मुलगा असण्याची शक्यता आहे.

टीप - या केवळ शक्यता आहेत. प्रत्येक स्त्रीची परिस्थिती व तिच्यात होणारे बदल वेगावेगळे असतात.म्हणूनच वरील निष्कर्षाच्या विरुद्ध अनुभव आल्यास अचंबित होऊ नये. मुलगा किंवा मुलगी यापेक्षा सदृढ बाळं हे फार गरजेचे आहे.

मोदींच्या 'बेटी बचाव' मोहिमेला 'सेलिब्रिटीं'चाही प्रतिसाद ! पहा कोणाकोणत्या सेलिब्रिटींनी क्लिक केले त्यांच्या लेकीसोबत सेल्फी.

संबंधित दुवे -

गरोदरपणातील ’10′ गंमतशीर गैरसमज !

Source - 9-funny-ways-to-predict-your-babys-gender-naturally

Translated by - Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Getty Images

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेजलाही नक्की लाईक करा.

solved 5
wordpress 4 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info