पोटातील बाळाचे वजन कसे वाढवावे?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 14:07

गर्भातील बाळाचं वजन किती असायला हवं? वजन कमी असल्यास काय करावं?
बाळ गर्भात असताना त्याची योग्य रितीने वाढ होते आहे की नाही? या गोष्टीचा अंदाज त्याच्या वजनावरुन आपण घेऊ शकतो. तर बाळाचे वजन कमी असल्यास प्रेग्नेंसीमध्ये अडचण येऊ शकते आणि बाळाच्या जीवालाही धोका पोहचू शकतो. म्हणून जाणून घ्या गर्भातील बाळाचे वजन वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्स!
असं म्हणतात की बाळाचं वजन जितकं जास्त असेल तितकं बाळ सुदृढ आणि निरोगी असतं आणि जितकं बाळाचं वजन कमी तितकं त्या बाळाला जपावं लागतं. बाळचं वजन हे आईच्या वजनावर अवलंबून असतं. गरोदरपणात आई जितकी सुदृढ असते तितकंच बाळ सुदृढ असतं. पण ही गोष्ट कितपत खरी आहे? कारण गरोदरपणात स्त्रीचं वजन जास्त नसलं पाहिजे असं तज्ञ सांगतात आणि न ते खूप कमी असावं. मग आता तुम्ही म्हणाल मग काय असावं स्त्रीचं व बाळाचं गरोदरपणातील वजन? जेणेकरून बाळ अगदी सुखरूप राहील. तर मंडळी आज तीच गोष्ट या विशेष लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत काय असावं गर्भातील अर्भकाचं योग्य वजन!
अर्भकाचे वजन कसे ओळखतात?

बहुतांश महिला गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत आपला पहिला अल्ट्रासाउंड करतात. अर्भकाचा विकास कसा होतोय हे समजून घेण्यासाठी रेडियोलोजिस्‍ट अनेक प्रकारचे माप घेतात, जसे की फेमुर लेन्थ, डोके आणि पोट यांची रुंदी, ओसिपिटोफ्रंटल डायमीटर, बाइपेरिटल डायमीटर आणि हुमरस लेन्थ! या सगळ्या मोजमापांच्या आधारावर अर्भकाचे वजन आणि गर्भावस्था कशी आहे, चांगली आहे कि प्रतिकूल ते कळते. यावरून डिलिव्हरी डेट सुद्धा ओळखता येते हे विशेष!
गरोदरपणात अर्भकाचे वजन वाढविण्याच्या टिप्स

जर अल्ट्रासाऊंड अहवालात बाळाचे वजन कमी आले तर त्याचे वजन वाढून तो सुदृढ राहावा म्हणून तुम्ही काही उपाय करू शकता. आपल्या आहारात ताजी फळे, पालेभाज्या, धान्य, मांस आणि अंडी यांचा समावेश करा. संतुलित आहारात सुका मेवा महत्त्वाचा असतो. बदाम, पिस्ता, अक्रोड, शेंगदाणे असा सुका मेवा खाण्यास सुरुवात करा. परंतु या सुका मेव्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा. बाळाच्या योग्य विकासासाठी प्रीनेटल व्हिटॅमीन दिले जातात. हे व्हिटॅमिन्स बाळाचे वजन वाढवण्यास मदत करतात. गरोदरपणात डिहायड्रेशन पासून बचाव व्हावा म्हणून खूप पाणी प्या. हे पाणी बाळापर्यंत पोहचेल आणि त्याच्या वजनावर जास्त परिणाम होणार नाही. बाळाचे वजन खूपच कमी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो आहार आणि सप्लीमेंटस घ्या.
गर्भातील बाळाचे वजन वाढवण्यासाठी काय खावे?

जर पोटातील बाळाचे वजन सामान्य पेक्षाही कमी असेल तर गरोदर स्त्रीने आपल्या आहारात मोठे बदल करण्याची गरज आहे. तिने आपल्या आहारात रताळी, डाळ, कडधान्ये, संत्राचा ज्यूस, दही, हिरव्या पालेभाज्या, अंडी, दुध, चिकन आणि सोयाबीन आवर्जुन घेण्यास सुरुवात करावी. या सर्व पदार्थांतील पोषक तत्त्वांमुळे बाळाच्या आणि त्या स्त्रीच्या वजनावरही परिणाम होऊन वजन वाढण्यास सुरुवात होईल. त्यामुळे गरोदर स्त्रीने नियमित या पदार्थांचे सेवन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
या गोष्टींची घ्या काळजी

गरोदरपणात बाळाचे वजन वाढवण्यासाठी उपाय करताना गरोदर स्त्रीने काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. गरोदर स्त्रीला कोणते व्यसन असेल जसे की मद्यपान आणि धुम्रपान, तर तिने बाळंतपण होईपर्यंत या व्यसनांपासून दूरच राहावे. अधिक प्रमाणात कॉफी, चहा घेणे आई व बाळ दोघांसाठी घातक ठरू शकते. म्हणून काही काळ या गोष्टींचा सुद्धा त्याग करावा. रोज तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, चटपटीत पदार्थ खाणे टाळावे. यामुळे वजन अतिवाढून डिलिव्हरी वेळी धोका निर्माण होऊ शकतो.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info