प्रसूतीनंतर किती पाणी प्यावे?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 10:33

स्तनपान करणा-या महिलांनी एका दिवसात किती पाणी पिणं गरजेचं आहे?
तुम्हाला हे जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे की ज्या महिला स्तनपान करतात त्यांनी अधिक मात्रेत पाणी पिणं अत्यंत गरजेचं असतं.
गर्भावस्था व डिलिव्हरी हे एका स्त्रिच्या आयुष्यातील असे टप्पे असतात ज्यामध्ये तिला फक्त स्वत:पुरतं जगता येत नाही तर आपल्या गर्भात असणा-या बाळाचा देखील विचार करावा लागतो. ते गर्भात असल्यापासून जन्माला आल्यानंतरही त्या स्त्रीला आपल्या आहारावर, व्यायामावर आणि जीवनशैलीवर अधिक लक्ष द्यावे लागते. स्तनपान करणा-या महिलांच्या स्तनात साडेसातशे मि.ली दूध दररोज बनतं. त्यामुळे स्तनपान करणा-या महिलांच्या शरीरात पाण्याची कमी पडू देऊ नये असं म्हणतात. पण दिवसभरात या महिलांनी किती पाणी पिणं गरजेचं आहे हे तुम्हाला माहित आहे का? डिलिव्हरी नंतरची स्तनपान ही सर्वात मोठी गोष्ट असते. कारण बाळ पूर्णत: आईच्या दूधावर अवलंबून असते. आईचे दूध हे त्याच्यासाठी पौष्टिक आणि १०० सात्विक पदार्थांच्या बरोबरीचे मानले जाते. आई जे खाईल तेच बाळाच्या शरीरातही जातं. त्यामुळे आईला त्रास झाला तर सहाजिकच तो सहाजिकच बाळालही होतो.
किती पाणी पिणं गरजेचं आहे?
यूरोपियन फूड सेफटी अथॉरिटी अनुसार स्तनपान करणा-या महिलांना नियमित सेवन करतात त्यापेक्षा ७०० मि.ली पाणी अधिक अधिक पिण्याची आवश्यकता असते. साधारणपणे महिलांनी दिवसभरात ११.०५ कप पाणी रोज पिणं आवश्यक असतं. तर स्तनपान करणा-या महिलांनी ११.०५ कपपेक्षाही अधिक पाणी प्यायलं पाहिजे. प्रत्येक वेळी स्तनपान करण्याच्या आधी आणि नंतर एक एक ग्लास पाणी प्यावं. पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवतं आणि अशक्तपणा देखील येत नाही.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info