बाळ चालायला कधी लागते?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 16:06

तुमचे बाळ चालू लागेल
तुमचे बाळ शब्द उच्चारू शकेल, किंवा शब्दांसारखे वाटणारे आवाज काढू शकेल. त्याचा मेंदू विकसित होत आहे व बोलण्याची क्षमताही वाढत आहे. त्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐका व त्याच्या आवाजांना प्रतिसाद द्या. यामुळे त्याला प्रोत्साहन मिळेल.

ते आता जवळपास वर्षाचे आहे! त्याला या वयात काय चालले आहे हे नेमके समजले नाही तरीही, कुटुंब व मित्रांसोबत सण व समारंभांमुळे सुरक्षा व सामुदायिक भावना निर्माण होते. त्याला घराच्या जवळपास होणाऱ्या समारंभांमध्ये मजा वाटेल. मात्र खूप लोक असतील तर ते कदाचित थोडेसे गोंधळून जाईल.

तुम्हाला कदाचित दिसेल की तुमचे बाळ अजूनही वस्तू तोंडात घालून त्याविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करते. ते वर ठेवलेल्या वस्तू घेण्यासाठी कदाचित खुर्चीवर चढायचा प्रयत्न करेल! आता काळजी घ्या, त्याच्याकडे नीट लक्ष ठेवा व अपायकारक वस्तू त्याच्या हाती लागणार नाहीत अशा ठेवा.

तुमच्या बाळाला तुम्हाला खुश करायचे असते, म्हणूनच ते कसे करायचे हे शिकविण्यासाठी इतकी चांगली वेळ कोणतीच नाही. वेगवेगळ्या कामांचा खेळ करुन त्यात गंमत आणता येईल. कामांचे लहान भाग करुन त्याच्या बरोबरीने ती करा.

तुमचे बाळ कदाचित आधीपासूनच चालत असेल, किंवा ते लवकरच आपले पहिले पाऊल टाकेल.

तुम्ही त्याला हसत खेळत चालायला शिकवू शकता. त्याच्यासमोर उभ्या रहा किंवा गुडघे टेका व त्याचे हात धरा. त्याचे दोन्ही हात धरुन तुमच्याकडे चालत यायला लावण्याचा प्रयत्न करा. ते कदाचित दोन्ही हात बाजूला करुन व कोपरात वाकवून पहिली पावले टाकू शकते. ते कदाचित पावले बाहेरच्या दिशेने वळवून व पार्श्वभाग (मागचा भाग) बाहेर काढून तोल सांभाळण्याचा प्रयत्न करेल.
माझे बाळ कधी चालेल?
बहुतेक बाळे साधारण १२ महिन्यांची झाल्यानंतर चालायला सुरुवात करतात. बरीच बाळे १४ किंवा १५ महिन्यांची होईपर्यंत व्यवस्थित चालू लागतात.

तुमच्या बाळाला थोडा अधिक वेळ लागत असेल तर काळजी करु नका. बरीच मुले १७ किंवा १८ महिन्यांची होईपर्यंत चालत नाहीत.

तुमचे बाळ जेव्हा पहिली पावले टाकतेतेव्हा, त्याला थोडीशी मदत करा. ते तुमचे हात धरेल, किंवा भिंतीचा किंवा फर्निचरचा आधार घेईल. त्याच्या प्रयत्नांसाठी त्याचे भरपूर कौतुक करा व जवळ घ्या!

तुमच्या बाळाला एकट्याने पहिली पाऊले टाकण्यासाठीचा आत्मविश्वास व संतुलन विकसित होण्यासाठी कदाचित काही महिने लागतील. त्यानंतर त्याला तोल सांभाळत व स्थिरपणे चालायला काही महिने लागतील.

चालायला शिकणे हा तुमच्या बाळाच्या वाढीतील महत्वाचा भाग आहे. बाळापासून ते लहान मूलापर्यंतच्या बदलांचा त्यामध्ये समावेश होतो.

तुमच्या बाळाचा विकास कसा होत आहे याची तुम्हाला काळजी वाटत असेल, तर आरोग्य सेविकेशी बोला.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info