बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय?pregnancytips.in

Posted on Mon 23rd Dec 2019 : 04:44

जिरं - नवमातांचे दूध वाढवणारा रामबाण घरगुती उपाय !

या घरगुती उपायाने नवमातांचे ब्रेस्ट मिल्क सुधारण्यास मदत होते.

Written by Editorial Team | Updated : June 19, 2017 12:50 PM IST

स्तनपान करणार्‍या स्त्रियांमध्ये सतत आणि मुबलक प्रमाणात दूधाची निर्मिती होणं गरजेचे आहे. अनेकजणी स्वयंपाक घरातील काही घरगुती उपायांचा वापर करून दूधाची निर्मिती वाढवतात. तज्ञ आणि स्तनपान देणार्‍या स्त्रियांचा अनुभव पाहता काही मसाल्यातील पदार्थ आणि हर्ब्सदेखील दूधाची निर्मिती वाढवायला मदत करतात. प्रामुख्याने नवमाता आणि पहिल्यांदा स्तनपान देणार्‍या स्त्रियांमध्ये हा त्रास अधिक आहे. म्हणूनच स्तनपान देणार्‍या स्त्रियांच्या आहारात जिरं अवश्यक असणं गरजेचे आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये जिरं नियमित वापरलं जाते. नक्की वाचा : शतावरी – स्तनपान करणार्‍या स्त्रियांसाठी फायदेशीर नैसर्गिक उपाय !

जिर्‍यामध्ये आयर्न, आवश्यक मिनरल्स आढळतात. त्याचा फायदा स्तनपान करणार्‍या स्त्रियांना होतो. यासोबतच जिर्‍यामुळे पचन सुधारते, पोट साफ होण्यास मदत होते, तसेच गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्सपासून बचाव होतो. असा सल्ला Sami Labs चे Founder and Chairman,डॉ. मोहम्मद माजीद देतात. शरीरात आयर्नची कमतरता निर्माण झाल्यानंतर अ‍ॅनिमियाचा धोका वाढतो. त्यामुळे स्तनपान करणार्‍या स्त्रियांमध्ये कमजोरी वाढते. आईप्रमाणेच बाळालादेखील गॅस्ट्रिक आणि पचनाचे विकार होतात. त्यामुळे आहारात प्रत्येक घराघरात सहज वापरले जाणारे जिरं नक्की समाविष्ट करा. अजूनही कोणत्या अभ्यासानुसार स्तनपान देणार्‍या स्त्रीयांनी जिरं खाल्ल्याने त्रास झाल्याचे समोर आलेले नाही.

स्तनपानाचे दूध वाढवण्यासाठी कसा कराल आहार जिर्‍याचा समावेश ?
Also Read

स्तनपान देणा-या नवमातांना जाणवणा-या ४ प्रमुख समस्या व त्यावरील उपाय

More News

एक टीस्पून जिरं पूड आणि साखर एकत्र करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापुर्वी गरम दूधासोबत प्यावे.

भाजलेल्या जिर्‍याची पूड करा आणि त्याचा वापर कढी, आमटी, डाळ तसेच रस्सा भाजीत अवश्य करा.

चाट, ताक, रायतामध्ये हमखास भाजलेली जिरंपूड मिसळल्यास त्याचा स्वादही वाढतो आणि नवमातांना फायदेही होतात.
by Taboola
Sponsored Links
You May Like
The Cost of Apartments for Sale in Dubai Might Totally Surprise YouApartments for Sale in Dubai | Search Ads
22 Celebs Reveal Their No-Makeup Faces, And We Are In Love 5minstory.com

नवमातांमध्ये दूधाची निर्मिती वाढवण्यासाठी रात्रभर जिर्‍याचे काही दाणे भिजत ठेवा आणि ते पाणी सकाळी उठल्यावर प्या.

जिर्‍याप्रमाणेच नवमातांचे दूध वाढवतील आयुर्वेदाने सुचवलेले हे ’5′ घरगुती उपाय नक्की जाणुून घ्या

घरगुती उपाय करूनदेखील स्तनपानाचे दूध वाढत नसेल, तुमच्या बाळाला पुरेसे दूध मिळत नसेल तर काळजी घ्या. स्तनपानानंतरही बाळ रडारड करत असेल तर लॅक्टेशन एक्सपर्टकडून मदत घ्या. तुमच्या बाळाला सतत भूक लागत असल्यास, रडत असल्यास किंवा ड्राय माऊथ असल्यास हा त्रास वेळीच तज्ञांच्या सल्ल्याने दूर करण्याचा प्रयत्न करा. बाळाला पुरेसे स्तनपान देण्यासाठी मुबलक दूधाची निर्मिती होणं गरजेचे आहे. स्तनपान देणा-या मातेला हे ९ सल्ले अजिबात देऊ नका !

solved 5
wordpress 4 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info