बाळगुटी किती महिने द्यावी?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 14:08

बाळगुटी | बाळगुटी साहित्य | बाळगुटी कशी द्यावी

बाळगुटी | बाळगुटी साहित्य | बाळगुटी कशी द्यावी >> बाळ जन्मांला आल्यापासून पालक सतत आपल्या बाळांच्या आरोग्या बाबतीत खुप काळजी घेत असतात. बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबाबत बाळाचे पालक नेहमी जागरुक असतात, जेणे करून आपल्या बाळाचे आरोग्य चांगले राहावे अशी काळजी घेताना पाहायला मिळतात.

बाळ गुटी म्हणजे बाळाच्या प्रकृती ला उपयुक्त अशा औषधांचा संग्रह. बालगुटी घेतांना पालकां च्या मनात बरेचसे प्रश्न असतात. बाळाला बालगुटी देणे खुप फायदेशीर असते. बाळाच्या एकंदर बौध्दीक आणी शारीरिक विकासावर याचा कमालीचा फरक दिसतो.

अनेक पालकांच्या मनात हा प्रश्न असतो की गुटीमध्‍ये कोण कोणते पदार्थ उगळावे, बाळ गुटी कशी द्यावी? किती प्रमाणात उगळावे ? गुटी उगाळताना काय काळजी घ्यावी ? या बददल आपण ‍ सविस्तर ‍माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत.

Table of Contents

बाळगुटी साहित्य (balguti ingredients in marathi)
बाळगुटी कशी द्यावी व कधी द्यावी | बाळगुटी देताना घ्यायची काळजी
बाळगुटी बनवण्याची पध्दत व देण्याची वेळ
सारांश – बाळगुटी | बाळगुटी साहित्य | बाळगुटी कशी द्यावी

बाळगुटी साहित्य (balguti ingredients in marathi)

मुलांच्या आरोग्यासाठी बाळकडू या नावाने ओळखला जाणारा हा औषधांचा गट खूप उपयोगी पडतो. या गटात कडू आणि तिखट चवीची औषधे असतात. हे पदार्थ पाण्यात उगाळून बाळाला दोन वेळा चाटवले जातात. अशी औषधे परंपरेने घराघरां तून चालत आली आहेत.
बाळगुटीबाळ गुटी

बाळगुटी मध्ये वापरण्यात येणारे साहित्य पुढील प्रमाणे (balguti ingredients in marathi):-

बाळ गुटी मध्ये वेखंड, बाळहिरडे, हळकुंड, काकड शींगी, बेहडा, मुरूड शेंग, जायफळ, चिचेंका, खारीक, बदाम, यां सारखे घटक असतात.
ही औषधे टिकाऊ स्वरूपात ठेवता येतात. व सहाणेवर उगळून बाळाला रोज चाटवता येतात.
बाळगुटी कशी द्यावी व कधी द्यावी | बाळगुटी देताना घ्यायची काळजी

१) बाळाची छाती कफाने भरत असल्यास वेखंड वापरावे. स्वच्छ दगडा वर मध एक चमचा टाकून वेखंडाची कांडी त्यात उगाळून तयार करावे. हे चाटण बाळास चाटवल्यास बाळाला चिकट फेसकर उलटी होऊन छाती तील फेसकट पणा कमी होतो.

२) छाती भरत असेल तर वेखंड व काकडिंग उगाळणे ‍किंचिंत वाढवावे. कधीकधी बाळाला शी होताना खडा झाल्याने कुंथावे लागते. यासाठी रोजच्या उगाळण्यामध्ये बाहिरडा अधीक उगाळावा व चिंचोका उगाळू नये.

३) बाळाला पातळ शी होत असल्यास खारीक, बदाम बाळहिरडा कमी करून किंवा वगळून जायफळ, चिंचोका, यांचे गाहणे अधीक करून चाटण द्यावे.

४) बाळाच्या जर पोटात दुखण्यामुळे बाळ रडत असेल, तर मुरूड शेंग अधीक उगळावी, जायफळ, चिचोंका, बदाम हे उगाळू नयेत.

५) लहान मुलांना जुलाब, शी चे खडे, छाती भरणे, यांसारखे अनेक त्रास होत असतात. यासाठी सूक्ष्म प्रमाणात दिलेल्या औषधांनी वेळीच सुधारणा घडवता येते.

६) बाजारात २ प्रकारची बाळगुटी मिळते. एक असते ती ‍सिरप स्वरूपात, व एक असते ती मूळ वनस्पतीं च्या भागांच्या संग्रह स्वरूपात. सिरप स्वरूपा तील ही बालगुटी सिरप ही ध्यायला अतिशय सोपी असते. बाळाच्या रोजच्या सदृढ वाढी साठी त्याचा चांगला उपयोग होतो.

७) जी बाळ गुटी उगळून दिली जाते त्यामध्ये जवळ जवळ २०-३० औषधे, त्यांच्या मुळ किंवा काष्ठ स्वरूपात दिले जातात. त्यामधील आपल्याला हवी असलेली औषधी उगाळून ही बाळ गुटी बनवली जाते.

८) हया बाळ गुटीचा फायदा हा की बाळाच्या छोटया आजारां वर घरगुती स्वरूपात हे उपचार केले जाऊ शकतात. परंतु उगळून दिल्या जाणार्‍या गुटी बाबत स्वच्छते ची अतिशय काळजी घ्यायला लागते. बाळाला सांभाळणे हे जणू तेलाने भरलेल्या भांडयाला घेऊन जाण्या इतके कठीण असते. त्यामुळे कुठून ही जराही जंतूचा शीरकाव जर बाळाच्या शरीरात झाला तर मोठी समस्या उभी राहू शकते.
बाळगुटी बनवण्याची पध्दत व देण्याची वेळ

गुटी ही साधारण पणे बाळ सकाळी उठल्या उठल्या दयावी. सर्वप्रथम ५-१० मिनिटे उकळलेल्या पाण्याने सहाण स्वच्छ धूवून घ्यावी. आईचे स्तनाचे दूध साधारण १०-१२ थेंब त्यावर टाकावेत. नंतर उगळून दयावयाची द्रव्ये धूवून मग ती त्यात उगळावी. त्याच उकळत्या पाण्याने स्वच्छ धुतलेल्या चमच्या मध्ये ते दूध घेऊन बाळाला गुटी पाजावी.
सारांश – बाळगुटी | बाळगुटी साहित्य | बाळगुटी कशी द्यावी

वरील लेख वाचणर्‍या वाचकांनी हे मात्र जरूर लक्षात ठेवावे की बाळ गुटी हे पूर्ण औषध असेलच असे नाही. बाळामध्ये आजाराची काही वेगळी अशी लक्षणे दिसल्यास बाळासाठी ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. रोजची बाळगुटी सर्वानीच आपल्या बाळाला दयायला हरकत नाही. परंतु औषधोपचार करताना आपल्या आयुर्वेदिक वैदयाचा मार्गदर्शना खाली केलेले केव्हाही उत्तम.
तुम्हाला आरोग्यपूर्ण बालकासाठी शुभेच्छा.

आपल्याला बाळ गुटी | बाळ गुटी साहित्य | बाळ गुटी कशी द्यावी ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info