बाळाच्या तोंडाला फेस का येतो?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 12:42

नवजात अर्भक व बालकांमधील शस्त्रक्रिया या वैद्यकीय क्षेत्रामधील सर्वात जास्त आव्हानात्मक मानल्या जातात. बाळ जेव्हा आईच्या उदरामधून जग पाहायला उत्सुक असतं. तेव्हा वेगवेगळ्या आजारांमुळे बाळाला धोका संभवतो. याचा वेळीच उपचार करणे आवश्यक असते. बाळ ही घराची व पर्यायाने राष्ट्राच्या भविष्याची नांदी असते. त्यांना | कांगारू | या प्राण्याप्रमाणे नाजूक काळजीची व जडणघडणीची गरज असते. वेळेचा एक टाका नऊ टाक्यांना वाचवतो, असं म्हणतात.
बालरोग शल्यचिकित्सा ही नवजात अर्भक व बालकांमधील दोषांची नाजूकपणे जडणघडण करून काही गोष्टी पूर्ववत व एक साधारण कार्यक्षम आयुष्याची नांदी निर्माण करणारी वैद्यकीय शाखा आहे.
दोष किचकट व गुंतागुंतीचे
नवजात बालकांमधील दोष हे अत्यंत किचकट व गुंतागुंतीचे असतात. त्यात बालकांमध्ये जन्मजात अवयवांचे विकार, बाळाची आईच्या उदारामधील वाढ, जन्मानंतरचे वजन, हाडांची ठिसूळता, किडनीची व मेंदूची परिपक्वता आणि बाळ बालरोग शल्यचिकित्सकापर्यंत पोहोचेपर्यंतची फुप्फुसांची अवस्था या सर्व गोष्टी शस्त्रक्रियेनंतरचे यश ठरवतात.
बालरोग शल्यचिकित्सा
नवजात बालकांचे वजन किमान 2.5 किलो असणे, रक्ताभिसरण अर्थात कॅपीलरी रिफील टाइम 3 सेकंदापेक्षा कमी असणे तसेच बाळाचे रडणे, स्नायूंचा टोण व हालचाल व्यवस्थित असणेही चांगल्या बालकाची लक्षणे असतात व अशा बाळांमध्ये शस्त्रक्रियेच्या यशाचे प्रमाण जास्त असते.
बालकांचे आजार
डोके मोठे होणे : congenital Hydrocephalus
या आजारामध्ये बालकांचे डोके प्रचंड मोठे असते. मेंदूमधील Ventricles मधील पाणी (cerbrospinal Fluid) हे अडथळ्यामुळे वाढून डोक्याचा आकार वाढतो. अशा प्रकारचा आजार हा जंतूमुळे किंवा टीबी मेंदूज्वरामुळेसुद्धा होऊ शकतो. fundoscopy करून डोळ्यांमधील pressure व papilloedema तपासला जातो. सीटी स्कॅन करून मेंदूमधील पाण्याचे प्रमाण व परिणाम तपासता येतात.
उपचार : Ventrniculo peritoneal shunt किंवा Third ucntriculostomy करून या आजाराचा उपचार करता येतो. (मेंदूमधील पाण्याला पोटात वाट तयार करून देणे)
श्वासनलिका व अन्ननलिकेतील जोड : Tracheo oesophageal fistula
या आजारात श्वासनलिका व अन्ननलिकेतील जोडामुळे लाळ फुप्फुसात जमा होऊन निमोनिया होतो व तोंडाला फेस येतो. Infont feeding tube ही नळी अन्ननलिकेत जाऊ शकत नाही.
उपचार : बाळाला स्थिरस्थावर केल्यानंतर शस्त्राक्रियेद्वारे छाती उघडून रिपेअर केले जाते. शस्त्रक्रियेनंतर बाळाला कृत्रिम श्वासोच्छवासाच्या मशीनवर ठेवावे लागते.
छाती व पोटामधील पडद्याचा भाग नसणे :
या आजारात छाती व पोटामधील पडदा विकसित नसतो व त्यामुळे आतडी छातीमध्ये जाऊन हृदय व फुप्फुसावर दबाव येतो.
उपचार : शस्त्रक्रियेद्वारे पडद्यामधील छिद्र बंद केले जाते व बाळाला कृत्रिम श्वासाच्या मशीनवर ठेवले जाते.
फुप्फुसाचे विकार : या आजारात फुप्फुसाचा काही भाग निकामी होऊन बाळाला वारंवार निमोनियाचा त्रास सुरू होतो.
उपचार : शस्त्रक्रियेद्वारे छाती उघडून निकामी फुप्फुसाचा भाग काढला जातो व बाळाला काही वेळ व्हेंटिलेटरवर ठेवले जाते.
आतड्यांना पीळ पडणे : या अजारात आतड्यांना पीळ पडून पित्ताची उलटी होणे, पोट फुगणे व संडास न होणे अशी लक्षणे दिसून येतात. एक्स-रे व सोनोग्राफीद्वारे अधिक अचूकपणे रोगनिदान शक्य होते.
उपचार : तत्काळ शस्त्रक्रिया करून आतड्यांमधील पीळ सोडवला जातो व बालक पूर्ववत होते.
आतडीत आतडी फसणे : हा आजार 6 महिने व ते 1 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये होतो. आतडीत आतडी फसून उलट्या होणे, पोट फुगणे व संडासवाटे रक्तस्राव होणे ही लक्षण दिसून येते.
उपचार : सोनोग्राफीद्वारे enema redution करून अथवा शस्त्रक्रिया करून आतडी काळी पडणे व जिवाला होणारा धोका टाळता येऊ शकतो.
संडासच्या जागी गँगलीऑन पेशी नसणे
बालकांमधील मलावरोध हा हिरस्प्रुंग डिसीज असू शकतो. या आजारात दूध न पचणे, वारंवार पोट फुगणे, मलावरोध होऊन संडास होण्याची औषधी व इनिमा घेण्याची गरज पडणे ही लक्षणे दिसून येतात.
उपचार : एक्स-रे व Barian enema आजाराच्या प्रकारावर प्रकाश टाकतात. बायोप्सी व गरज पडल्यास कोलोस्टोमी आणि पुल-थ्रू हे ऑपरेशन करून बाळाची तब्येत पूर्ववत करता येते.
जन्मजात संडासची जागा नसणे :
या आजारात बाळाला संडासची जागा नसते.
उपचार : Invertogram व एक्स-रेद्वारे कमी व जास्त या प्रकारात वर्गीकरण करता येते. 3 टप्प्यामध्ये हा आजार शस्त्रक्रियेद्वारे बरा करता येतो.
बालकांमधील हर्निया : या आजारात पोटांमधील आतडी हर्निया सॅकमध्ये अडकून आतडी काळी पडण्याचा धोका संभावतो.
उपचार : लघवीच्या जागेच्या बाजूला फुगा दिसतो. वयाच्या 6 महिन्यानंतर हर्नियाची शस्त्रक्रिया करून पुढील धोके टाळता येऊ शकतात.
गोटी वर असणे :
या आजारात जन्मजात गोटी अंडकोषाऐवजी पोटात किंवा लघवीच्या जागेच्या बाजूला असते. अंडकोषाचे तापमान 4 अंश ने कमी असून गोटीस पोषक असते. गोटी वर राहिल्यास निकामी होण्याचा व वंधत्वाचा धोका तसेच कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. त्यावर उपाय आवश्यकच असतो.
उपचार : 6 महिने ते 1 वर्ष या वयात एका किंवा 2 टप्प्यांमध्ये शस्त्रक्रिया करून गोटी खाली आणता येते.
लघवीची जागा बंद असणे : या आजारात लघवीची जागा बंद होऊन कातडी पुढील भागात चिकटून जाते. त्यामुळे उलट दाब वाढून मूत्राशय व किडनीला सूज येण्याचा धोका संभवतो.
उपचार : Circumeision किंवा prepucioplosty करून हा आजार बरा करता येतो.
लघवीच्या मार्गातील पडदा :
या आजारात जन्मजात मूत्रनलिकेत पडदा असतो. त्यामुळे मूत्राशय व किडनीला सूज येऊन किडनी अकार्यक्षम होण्याचा धोका संभवतो.
उपचार : MCU (Micturating cystourethrogram) या तपासणीद्वारे पडद्याचा प्रकार व किडनीच्या सुजेविषयी कल्पना घेता येते DTPA Scan द्वारे किडनीचे कार्य जाणून घेता येते. दुर्बिणीद्वारे हा पडदा जाळता येतो, त्यास Cystoscopic felgraticn म्हणतात. तसेच गरज भासल्यास लघवीची जागा पोटातून काढता येते.
किडनीमधील अडथळा : जन्मजात बालकांमधील किडनीतील अडथळ्यामुळे किडनी अकार्यक्षम होण्याचा व पुन: पुन्हा इन्फेक्शन होण्याचा धोका संभवतो.
उपचार : सोनोग्राफी व डीटीपीए स्कॅनद्वारे या आजारावर प्रकाश टाकता येतो. सूज वाढत असल्यास अँडरसन हाइन्स पायलोप्लास्टी करून किडनीमधील अडथळा दूर करता येतो व किडनीचे कार्य पूर्ववत होऊ शकते.
लघवीची जागा खाली असणे : या आजारात लघवीची जागा खालच्या बाजूला असते. बालकांमध्ये पुन: पुन्हा लघवीत जंतूसंसर्ग होणे व मनोविकार होण्याचा धोका संभवतो.
उपचार : या आजारात सुंदर नक्षीकाम पद्धतीने प्लास्टिक सर्जरी करून लघवीची जागा टोकापासून बनवता येते. ही शस्त्रक्रिया बालरोग शल्यप्रकारातील नाजूक कलाकुसर असणारी व सर्जनचे कौशल्य पडताळणारी आहे.
दोष दूर करणे शक्य असते :
सामाजिक भावना, नवजात बालकांमधील गुंतागुंतीचे आजार व सर्जनचे कौशल्य या त्रिवेणी संगमाने बालकांमधील दोष दूर करणे हे अत्याधुनिक उपचार पद्धतीने शक्य झाले आहे.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info