बाळाला उलटीचा त्रास होत असेल तर घरगुती उपाय?pregnancytips.in

Posted on Thu 17th Nov 2022 : 15:02

बाळाला सतत उलटीचा त्रास होत असेल तर हे रामबाण घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

लहान मुलांना वारंवार सतावणाऱ्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे उलटीची (home remedies for babies vomiting) होय. कधी कधी चुकीच्या खाण्याने किंवा कधी कधी अन्य कारणामुळे बाळाला सतत उलटी होऊ शकते. अशावेळी त्यामागचे कारण काय आहे अनेक पालकांना कळत नाही शिवाय त्यावर नेमके काय उपचार करावेत हे देखील त्यांना माहित नसते.

सतत बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाणे, सतत त्याला औषधे पाजणे त्याच्या आरोग्यासाठी योग्य नाही. अशावेळी त्याला घरगुती औषधे देणे किंवा त्याच्यावर घरगुती उपचार करणे उत्तम ठरते. या लेखातून आम्ही तुम्हाला लहान बाळाला उलटीचा तास होऊ लागल्यास काय घरगुती उपचार करावेत ते सांगणार आहोत. हे उपचार अत्यंत साधे असून त्यांचे दुष्परिणाम बाळावर होत नाहीत. चला तर जाणून घेऊया हि अमुल्य माहिती!

आले आणि मधाचा वापर
लहान मुलांना उलटी झाल्यास सर्वप्रथम हा उपाय करुन पहावा. आले आणि मध तर आपल्या घरात असतेच आणि त्याचा वापर करून आपण बाळाला होणारा उलटीचा त्रास कमी करू शकतो. एक कप गरम पाण्यात सहा मिनिटे एक ते दोन इंच आले उकळून घ्या. नंतर हे पाणी थंड होऊ द्या आणि मग हे पाणी गाळून घेऊन त्यात मध टाकून बाळाला पाजा. तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा अशा प्रकारचा चहा बनवून ते बाळाला प्यायला देऊ शकता. यामुळे काही वेळातच फरक दिसून बाळाचा उलटीचा त्रास कमी होईल आणि त्याला मळमळणार सुद्धा नाही.

पुदिना रस
बाळाला उलटीचा तास झाल्यास पुदिन्याचा रस देखील असरदार ठरू शकतो. या उपायासाठी मुठभर पुदिनाची पाने घेऊन एक कप पाण्यात दहा मिनिटे ती उकळून घ्या. आता पाणी काही वेळ थंड होऊ द्या आणि मग हे पाणी गाळून घ्या. आता या पाण्यात थोडे मध टाकून घोट घोट पाणी बाळाला पाजा. बाळ 1 वर्षापेक्षा मोठे असल्यास तुम्ही बाळाला थेट पुदिनाची पाने चावायला देऊ शकता. यामुळे सुद्धा त्याला उलटीमधून आराम मिळेल. हा उपाय दिवसातून दोनदा तरी करावा म्हणजे त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.

तांदळाची पेज
अनेकांना हा उपाय माहितही नाही मात्र आजही वडीलधारी मंडळी उलटी वर प्राथमिक उपाय म्हणून तांदळाची पेज पाजतात. एक गोष्ट लक्षात ठेवावी की बाळाला ब्राऊन राईस ऐवजी पांढऱ्या तांदळाचीच पेज पाजावी. एक कप तांदूळ घेऊन ते दोन कप गरम पाण्यात उकळावे. पाणी जेव्हा अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करून ते पाणी थंड होऊ द्यावे. आता हे पाणी गाळून घ्यावे आणि खास करून ते पाणीच बाळाला पाजावे.

लवंगही ठरते रामबाण
बाळाच्या उलटीवर लवंगाचा वापर देखील तुम्ही करू शकता. यासाठी दोन ते तीन लवंग घ्या आणि त्याला एक कप पाण्यात दहा मिनिटे उकळून घ्या. हे पाणी गाळून काही वेळ त्याला थंड होऊ द्या. आता या पाण्यात थोडे मध मिसळा आणि लवंगाचा हा चहा बाळाला पाजा. तुम्ही दिवसातून दोन वेळा हा चहा बाळाला पाजल्यास चांगला फरक दिसून येईल. लवंग मध्ये एगुनोल असते ज्याचा सुवास आणि फ्लेवर उलटी रोखण्यासाठी मदत करतो.

बडीशेप
पचनमार्गाला आराम देणारी बडीशेप बाळाची उलटी रोखण्यासही मदत करू शकते. बडीशेप मध्ये अँटीमायक्रोबीएल गुण असतात जे उलटी रोखून त्याला आराम देतात. एक कप पाण्यात एक चमचा बडीशेप टाकून 5 ते 10 मिनिटे उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर ते गाळून बाळाला पाजा. दिवसातून किमान 3 ते 4 वेळा तरी बाळाला हे पाणी द्यायला हवे. तेव्हा बाळावर त्याचा फरक दिसून येईल. तर मंडळी हे आहेत साधे सोपे उपाय जे गरोदर बाळाला उलटी आणि मळमळीचा त्रास झाल्यास घरच्या घरी करता येऊ शकतात. तुमच्या ओळखीच्या लोकांसह सुद्धा ही माहिती शेअर करा जेणेकरून ते सुद्धा गरज पडल्यास हे उपाय वापरून बाळाला उलटी आणि मळमळीच्या त्रासापासून मुक्त करू शकतात.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info