मला 3 महिन्यांत मासिक पाळी का आली नाही?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 12:04

अनियमित मासिक पाळीमुळे त्रस्त आहात, घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
मासिक पाळी (Periods) ही एक नैसर्गिक प्रक्रिया (Natural process) आहे, जी महिलांमध्ये दर महिन्याला येते. परंतु बहुतेकदा काही स्त्रिया आणि किशोरवयीन मुलींना अनियमित मासिक पाळी (Irregular Periods) किंवा अनियमित कालावधीत येत असल्यामुळे त्याचा त्रास होतो. काही काही महिलांना दोन महिन्यांनंतर मासिक पाळी येते. जर त्या स्त्रीचं लग्न झालं असेल, तर ती गर्भवती (Pregnant) नाही ना, याची काळजी तिला सतावते.

अनेक कारणांमुळे ताणतणाव, थायरॉइड, संतुलित व पौष्टिक आहार न घेणे, वजन कमी करणे किंवा वाढणे, अधिक गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करणे इ. कारणामुळे मासिक पाळी अनियमित असू शकते. ही अनियमित मासिक पाळीची समस्या खूप सामान्य आहे, परंतु जर मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर दोन ते तीन महिने थांबून डॉक्टरांना भेटा. काही घरगुती उपचारांचा अवलंब करून मासिक पाळीच्या अनियमित उपायांच्या समस्येवरही तुम्ही मात करू शकता.

अनियमित कालावधीची लक्षणे

- अधिक थकवा जाणवू शकतो.

- बद्धकोष्ठतेत समस्या उद्भवू शकतात.

- लवकर भूक न लागणे

- पोट, कंबर, स्तन दुखणे

- ओटीपोटाच्या खालच्या भागाजवळ किंवा गर्भाशयाच्या जवळ वेदना होऊ शकते.

अनियमित येणारी मासिक पाळीला नियमित करण्याचे मार्ग

- वारंवार मासिक पाळी अनियमित येत असेल किंवा दोन महिने येत नसेल तर व्यायाम, योगा करायला सुरुवात करा.

- अनेक वेळा, जास्त वजन असण्यामुळे मासिक पाळीमध्ये समस्या देखील उद्भवतात. आपल्या वजनावर नियंत्रण ठेवा. वजन कमी करण्यासाठी वेट लॉस डाएट फॉलो करा.

- हेल्दी आहार घ्या, ज्यात धान्य, फळे, भाज्या, शेंगदाणे, दूध, दुधापासून बनविलेले पदार्थ यांचा समावेश आहे.

- आल्याचा चहा प्यायल्याने मासिक पाळीही नियमित येते. आल्याचा चहा काही दिवस प्यावा. मासिक पाळीची तारीख पुढे कधी जाणार नाही.

- तुळशीची पाने चघळल्याने मासिक पाळीही नियमित येते. यात अँटीऑक्सिडेंट घटक असतात, जे मासिक पाळी तसेच इतर अनेक समस्या दूर करतात.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info