मासिक पाळी का अनियमित असते?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 13:58

तुमची पाळी अनियमित येतेय? ही आहेत कारणे

ज्या महिलांना (Womens) मासिक पाळी ( Menstrual Cycle) २१ दिवसांपेक्षा (Days) कमी आणि ३५ दिवसांपेक्षा जास्त असेल किंवा दर महिन्याला पाळीची तारीख सारखी बदलदत असेल, तर त्याला अनियमित पाळी (Irregular Periods) येणे म्हणतात. मासिक पाळी अनियमित आल्यास इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, फॉलिकल उत्तेजक संप्रेरक, ल्यूटेनिझिंग हार्मोन्सच्या प्रभावाखाली असते. यापैकी कोणत्यागी संप्रेरकाच्या असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित येते. अशाप्रकारे पाळी अनियमित असेल तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र त्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे.

पीसीओएस Polycystic ovary syndrome (PCOS)

पीसीओएस असल्याने मासिक पाळी अनियमित येण्याचे प्रमाण जास्त असते. पीसीओएसमुळे मासिक पाळी प्रदीर्घ उशीरा किंवा अमेनोरिया होउ शकतो. या आजारात, अंडाशयांमध्ये टेस्टोस्टेरॉनची उच्च पातळी निर्माण होते, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होते. त्यामुळे वंध्यत्व येते. तसेच पीसीओएसमुळे मुरूम, इन्शुलिन प्रतिरोध आणि लठ्ठपणा येतो.

हायपोगोनाडोट्रोपीक- Hypogonadotropic

या स्थितीमुळे पिट्यूटरी आणि अंडाशय हार्मोन्स तयार करत नाहीत . त्यामुळे एकतर अनियमित मासिक पाळी, कमी प्रवाह किंवा संपूर्ण अमेनोरिया होतो. पिट्यूटरी ग्रंथी किंवा हायपोथॅलमसचे दुखापत, ट्यूमर किंवा रेडिएशन, वजन वाढणे, जलद वजन कमी होणे, अनुवांशिक दोष यासारखी कारणे यामागे असू शकतात. हे समजल्यावर ताबडतोब उपचार करून घेणे महत्वाचे आहे.

गर्भाशयात फायब्रॉइड-

पॉलीप ही गर्भाशयातून झालेली वाढ पण, कर्करोग नसलेले आहे यामुळेही अनियमित मासिक पाळी आणि वंध्यत्व येऊ शकते. यासाठी उपचारांची आवश्यकता आहे. या उपचारादरम्यान गर्भाशयाचा पॉलीप काढून टाकण्याची शिफारस केली जाते. तसेच ही समस्या असलेल्यांना वंध्यत्व, मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव किंवा वेदना होऊ शकतात.

प्रोलेक्टीन डिसऑर्डर-

हायपरप्रोलॅक्टेमिया या स्थितीत प्रोलॅक्टिनची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते. प्रोलॅक्टिनोमा (पिट्यूटरी च्या सौम्य ट्यूमर), हायपोथायरॉईडीझम आणि उच्च रक्तदाब, नैराश्य, वेदना यासाठी लिहून दिलेल्या काही औषधांमुळे हे होऊ शकते. प्रोलॅक्टिन हे मुख्यत्वे आईचे दूध येण्यासाठी महत्त्वाचे असते. पण ते सेक्स हार्मोन्सवर परिणाम करते. त्यामुळे मासिक पाळी लांबणे, अनियमित पाळी येणे, वंध्यत्व येऊ शकते.

जास्त ताण असल्यास-

रजोनिवृत्तीच्या काळात नैसर्गिक हार्मोनल बदलांमुळे अनियमित मासिक पाळी येऊ शकते. त्याचप्रमाणे, ज्या महिलांचे वजन कमी आहे, तसेच जास्त वजन आहे किंवा ज्यांना ताण जास्त आहे त्यांनाही अनियमित मासिक पाळी येऊ शकते. जर तुम्ही स्तनपान करत असाल, कठीण व्यायामप्रकार करत असाल किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तरीही मासिक पाळी अनियमित होते. मात्र या गोष्टींची फारशी चिंता करण्याची गरज नाही, नेमके कारण दुरूस्त केल्यावर ही अनियमितता दूर होते.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info