मासिक पाळीच्या वेळी किती रक्तस्त्राव होतो?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 12:47

मासिक पाळीदरम्यान, एका व्यक्तीचा(महिलेचा) ३० ते ४० मिलीलीटर किंवा दोन ते तीन टेबलस्पून रक्तस्त्राव होतो असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण काही संशोधनांनुसार ही आकडेवारी ६० मिलीलीटरच्या आसपास आहे म्हणजे जवळपास ४ टेबलस्पून.

सरासरी रक्तस्त्राव होण्याचा कालावधी हा मोठा असतो, त्यामुळे सरासरी म्हणून मानल्या जाणाऱ्या रक्तस्त्रावापेक्षा काहींना कमी प्रमाणात तर काहींना जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. तुम्हाला जर कोणत्यांही प्रकारचे तीव्र क्रॅम्पिंग, मळमळ किंवा इतर काही त्रास जाणवत नसेल तर तुमचा वैयक्तिक रक्तस्त्राव नॉर्मल समजला जातो.

तुमचा मासिक रक्तस्त्राव कसा मोजावा, काय आहे लक्षण आणि कधी डॉक्टरला भेटण्याची गरज आहे हे कसे ओळखावे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
तुमचा सर्वसाधरणपणे किती रक्तस्त्राव होतो हे तुम्ही कसे सांगू शकता?

मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही रक्तासह इतर गोष्टी देखील शरीराबाहेर पडतात. तुमच्या मासिक पाळीच्या द्रवामध्ये श्लेष्मा ( mucus), ऊती( tissue) आणि गर्भशयाचा पातळ पडदा (uterine lining) मिश्रण देखील असते, ज्यामुळे तुमचा एकूण स्त्राव वाढ करू शकतो. त्यामुळेच रक्तस्त्राव मोजणे आणखी अवघड होते, पण ते नक्कीच शक्य आहे

तुम्ही वापरत असलेली स्वच्छता उत्पादने तुम्हाला तुमच्या एकूण प्रवाहाचा अंदाज घेण्यास मदत करू शकतात. आणि जर तुम्हाला शुद्ध रक्त कमी होण्याचा अचूक हिशोब हवा असेल तर गणिताची मदत घेऊ शकता.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info