मुलगा होण्यासाठी कोणत्या दिवशी संबंध ठेवावे?pregnancytips.in

Posted on Sat 25th Dec 2021 : 12:27

आम्हाला मुलगा होत नाही, काय करू?

मी २६ वर्षांची एक विवाहित स्त्री असून आमचं लग्न होऊन सात वर्षं झाली. मला तीन मुली आहेत. मुलगा होऊ शकत नाही म्हणून सासरी मला हिणवलं जातं. मला सतत मुली झाल्याने पतीसुद्धा माझा तिरस्कार करतात. नेहमी दोष देऊन बोलणं, टोमणे मारणं, दुस-या लग्नाची धमकी देणं सुरू असतं. मुलगा व्हावा यासाठी काही उपाय आहे का?
त्यावर उत्तर असे...

मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे पूर्णपणे पुरुषावर अवलंबून असतं. गर्भाचं लिंग पुल्लिंगी असेल का स्त्रीलिंगी, हे पूर्णपणे पुरुषाच्या शुक्रजंतूंवर अवलंबून असतं.

स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषाचा शुक्रजंतू यांचं मिलन होण्याने गर्भधारणा होते. स्त्रीमध्ये XX अशी लिंगसुत्राची जोडी असते तर पुरुषामध्ये XY अशी लिंगसुत्राची जोडी असते. स्त्रीमधे दोन्ही लिंगसुत्रं X या प्रकाराची असल्यामुळे जननबीजाच्या विभाजनानंतर तिची सर्व स्त्रीबीजं X हे लिंगसूत्रच धारण करतात.

पुरुषांमध्ये मात्र XY अशी लिंगसुत्राची जोडी असते, त्यामुळे जननबीजाच्या विभाजनानंतर अर्धे शुक्रजंतू X लिंगसूत्रधारी तर अर्धे Y लिंगसूत्रधारी होतात. यातल्या X लिंगसूत्रधारी शुक्रजंतूशी स्त्रीबीजाचं मिलन घडल्यास XX अशी जोडी जुळते आणि मुलीचा जन्म होतो. पण जर Y लिंगसूत्रधारी शुक्रजंतूशी स्त्रीबीजाचं मिलन घडलं तर XY अशी जोडी तयार होऊन मुलगा जन्माला येतो. यावरून हे दिसून येतं, की मुलगा होणार की मुलगी याचा निर्णय शुक्रजंतूंवर अवलंबून असतो, स्त्रीबीजावर नव्हे.


सतत तीन मुली होण्यात तुमचा दोष नाही. तुमच्या पतीच्या शुक्रजंतूंवर ते अवलंबून आहे. अशा परिस्थितीत तुमच्यावर दोष टाकणं हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या पतीबरोबर एकदा डॉक्टरांकडे जाऊन या गोष्टीचं समोरासमोर स्पष्टीकरण करून घ्या. डॉक्टरांकडून योग्य ज्ञान मिळताच तुमच्या पतीला त्याची चूक कळेल.

solved 5
wordpress 2 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info