मूल होण्यासाठी काय करावे लागते?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 12:40


TV9 Marathi
x
Choose your language

मराठी
हिन्दी
ಕನ್ನಡ
తెలుగు
ગુજરાતી
বাংলা
मनी9
ENG

5

ताज्या बातम्याT20 World Cupशेअर मार्केटमहापालिका निवडणूकमहाराष्ट्रराजकारणमुंबईपुणेक्राईमक्रीडामनोरंजनलाईफस्टाईलफोटोव्यवसायट्रेण्डिंगहेल्थराष्ट्रीयGold Rate Today

#Agriculture#Corona Update#Special Story#Knowledge#Covid Tracker#राशीभविष्य#अध्यात्म बातम्या#शिक्षण#करिअरयूटिलिटी बातम्या

Marathi News » Health » What to do to get pregnant early 11 remedies for a good pregnancy

Pregnancy Tips | लवकर आई व्हायचंय?, हे 11 उपाय ठरतील फायदेशीर!
काही छोटे उपाय ( Pregnancy Tips ) केले, आहाराच्या पद्धतीत ( Changes in diet ) बदल केले तर गर्भधारणा होऊ शकते.
Pregnancy Tips | लवकर आई व्हायचंय?, हे 11 उपाय ठरतील फायदेशीर!
प्रतिकात्मक फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अनिश बेंद्रे

Jul 13, 2021 | 11:27 AM

प्रत्येक कुटुंबाला वाटतं की, लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरात लवकरात लवकर छोटा पाहुणा यावा. मात्र, अनेकदा ही स्वप्न पूर्ण होत नाही. महिलांना गर्भधारणेत ( pregnancy ) अनेक त्रास सोसावे लागतात. बऱ्याचदा काही शारीरीक कारणांमुळेही महिलांना गर्भधारणा करणं शक्य होत नाही. त्यामुळे त्या निराशेच्या गर्तेतही जाताना दिसतात. मात्र, काही छोटे उपाय ( Pregnancy Tips ) केले, आहाराच्या पद्धतीत ( Changes in diet ) बदल केले तर गर्भधारणा होऊ शकते. आज आपण असेच 11 उपाय पाहाणार आहोत. ( What to do to get pregnant early? 11 remedies for a good pregnancy )

01. योग्य वयात गर्भधारणा

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 18 ते 28 ही गर्भधारणेचं योग्य वय आहे. या वयात महिलांना लग्नानंतर गर्भधारणा होण्याची सर्वाधिक शक्यता असते. या वयात फर्टिलायझेशन लवकर होतं आणि गर्भ लवकर राहतो. 25 वर्षांच्या महिलेच्या तुलनेत 35 वर्षांच्या महिला प्रेग्नट राहण्याचे चान्सेस 50 टक्क्यांनी कमी होतात. त्यामुळं तुमचं वय लक्षात घेऊन गर्भधारणेसाठी प्रयत्न करा. वय जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ला घ्या.

02. पहिल्याच वेळी गर्भपात करु नका

बऱ्याचदा नवविवाहित महिलांना पहिल्याच प्रयत्नात वा चुकीने गर्भ राहतो. मात्र, काही ना काही कारणाने हे दाम्पत्य गर्भपाताचा पर्याय निवडतात. काहींना लग्नाच्या पहिल्याच वर्षात मूल नको असतं. मात्र, ही मोठी चूक ठरु शकते. कारण, पहिली प्रेग्नंसी फर्टिलायझेशनचा दर वाढवते. याच वेळी जर गर्भपात केला तर महिलांच्या शरीरात कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात. पुढे जेव्हा तुम्हाला मूल हवं असेल, तेव्हा गर्भधारणा होण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळं डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

03. मासिक पाळीचं चक्र नियमित असावं

लवकर गर्भवती राहण्यासाठी मासिक पाळीचं चक्र नियमित असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक महिलांना महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना मासिक पाळी येते. काही महिलांना लवकर तर काही महिलांना मासिक पाळी उशीरा येते. ही गोष्ट गर्भधारणेत अडचण ठरु शकते. त्यामुळं असा त्रास तुम्हालाही असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

04. ऑव्युलेशन पीरियडवर लक्ष ठेवा

मासिक पाळी यायच्या 2 आठवडे आधीचा काळ ऑव्युलेशन पीरियड असतो. या काळात केलेला सेक्स हा गर्भधारणेसाठी उत्तम मानला जातो. डॉक्टरही याच काळात गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देतात. या काळात महिलांच्या शरीरात प्रजननासाठी अंडकोष तयार होतो. त्याच काळातील लैंगिक संबंधातून गर्भधारणा होण्याची 60 ते 70 टक्के शक्यता असते. त्यामुळं मासिक पाळीची तारीख लक्षात ठेऊन गर्भधारणेसाठी प्रयत्न करा.

05. गर्भधारणेसाठी वजन ताब्यात ठेवा

जास्तिचं वजन हा गर्भधारणेतील मोठा अडसर ठरु शकतो. यामुळं महिलांमध्ये फेलोपिअन ट्यु आणि ओवरी बंद होते, ज्याचा गर्भधारणेत मोठा सहभाग आहे. त्यामुळं वजन कमी करणं हा गर्भधारणेसाठी उत्तम उपाय आहे.

06. आरोग्यदायी आहाराचं सेवन

लवकर गर्भवती होण्यासाठी आरोग्यदायी आहाराचं सेवन अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं गर्भधारणेआधी उत्तम आहार घ्या. बऱ्याचदा महिलांमध्ये आयर्न आणि कॅल्शियमची कमी असते. त्यामुळं फर्टिलायझेशन लवकर होत नाही. महिला आनंदी राहिल्या आणि उत्तम आहार घेतला तर गर्भवती राहण्याची शक्यता 30 टक्क्यांपर्यंत वाढते.

07. हनीमूननंतर कसेप्शनमूनचा उत्तम पर्याय

ही संकल्पना आपल्याकडे अद्याप रुजलेली दिसत नाही. ज्याप्रमाणे नवदाम्पत्य लग्नानंतर हनीमूनला जातात. त्याचप्रमाणं खास गर्भधारणेसाठी कसेप्शनमूनला जाणं हा उत्तम पर्याय आहे. बऱ्याचदा डॉक्टरांनी सांगितलेल्या तारखांना लैंगिक संबंध ठेवताना, दाम्पत्यांवर मानसिक दडपण येतं. शिवाय, घरातील वातावरणाचा वा कामाचा तणावही असल्यानं चांगला सेक्स करता येत नाही. हेच पाहता, हनीमूनप्रमाणे पुन्हा एकदा फिरायला जाणं, सगळा तणाव विसरुन रिलॅक्स करणं आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न करणं उत्तम असल्याचं डॉक्टर सांगतात. परदेशात हा पर्यात जास्तीत जास्त वापरला जातो.

08. दारु-सिगरेट आणि इतर नशेपासून दूर राहा

सध्याच्या काळात पुरुषांसह महिलाही सिगरेट वा अल्कोहोलचं सेवन करतात. मात्र, हीच गोष्ट गर्भधारणेत अडचण निर्माण करते. महिलांनी गर्भधारणेच्या वर्षभराआधीपासून या सगळ्यांचा त्याग करणं उत्तम असल्याचं डॉक्टर सांगतात. कारण, अल्कोहोल आणि निकोटीनमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. ऑव्युलेशनवरही त्या
चा परिणाम होतो.

09. गर्भनिरोधक औषधांचा प्रयोग टाळा

गर्भधारणेचा विचार करत असाल तर, त्या वर्षात गर्भनिरोधक गोळ्या वा इतर औषधांचा प्रयोग तातडीने बंद करा. या कॉस्ट्रासेप्टिव औषधांमध्ये अनेक घातक घटक असतात, जे तुमच्या शरीरावर परिणाम करु शकतात. त्यामुळं फर्टिलायझेशनच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही गर्भधारणेचा विचार कर असाल, त्याच्या वर्षभरआधीपासूनच ही औषधं बंद करा आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा लैंगिक संबंध ठेवणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात.

10. ल्युब्रिकेंट्सचा वापर बंद करा

जर तुम्हाला आई व्हायचं असेल तर ल्युब्रिकेंट्सचा वापर तातडीने बंद करा. ल्युब्रिकेंट्स हे पुरुषाचे स्पर्म ओवरीपर्यंत पोहचू देत नाही. त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता संपते. लैंगिक संबंधादरम्यान महिलांचा शरीरात ओलावा तयार होत असतो, जो शुक्राणूंना ओवरीपर्यंत पोहचवण्यास मदत करतो. आणि त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता दाट असते.

11. तणाव आणि डिप्

रेशनपासून दूर राहा

आजकालच्या धकाधकीच्या युगात तणाव हा गर्भधारणेचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण, तनावामुळे गर्भधारणे अनेक कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. त्यामुळे जर आई-बाप व्हायचं असेल तर तणावाला बाय बाय करा. लहान-सहान गोष्टींचा ताण घेऊ नका. एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. जर तुम्ही नोकरी करत असाल तर, काही काळ सुट्टी घ्या, मोबाईल लांब ठेवा आणि आपल्या पार्टनरला वेळ द्या. व्यायाम करा, फिरायला जा, उत्तम आहार घ्या. या सगळ्या गोष्टी चांगल्या गर्भधारणेसाठी अत्यंत गरजेच्या आहेत. हे 11 उपाय केल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info