लहान बाळ थुंकी का काढतात?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 14:10

बाळ सतत जीभ बाहेर काढत असेल तर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या!

लहान बाळाने हात पाय हलवणं, मध्येच जीभ बाहेर काढून खुद्कन हसणं हे सगळं आई-वडिलांसाठी अगदी नॉर्मल असलं तरी जीभ बाहेर काढण्यामागे असू शकतात काही संकेतपूर्ण कारणे..! ती कारणे आणि त्यावर काय उपाय आहेत हे प्रत्येक आई-वडिलांनी जाणून घेणं गरजेच आहे.

बाळ सतत जीभ बाहेर काढत असेल तर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या!
लहान बाळाला बोलता येत नसल्याने आपल्या कृतीला किंवा आपण त्याच्याशी जे बोलतोय त्या बोलण्याला ते हात-पाय हलवून, जोरात ओरडून, हसून किंवा मग हळूच जीभ तोंडाबाहेर काढून प्रतिसाद देतं. कधी कधी ते जीभ बाहेर काढून आपल्या आई-वडिलांना काहीतरी सांगण्याचेही प्रयत्न करतात. तुम्ही देखील ब-याचदा लहान बाळाला सतत जीभ बाहेर काढून हसताना पाहिलं असेल. कारण सर्वच मुलं जन्मानंतर ६ महिने तरी जीभ बाहेर काढतातच. तुम्हाला बाळाने जीभ बाहेर काढली तर ती गंमत वाटू शकते आणि त्यामुळे तुम्ही ती गोष्ट दुर्लक्षित करू शकता. पण असं करणं चुकीचं आहे. कारण ब-याचदा बोलता न आल्याने आपल्याला होणारा त्रास असो वा एखाद्या गोष्टीची गरज, जसं की भूक लागली आहे वैगरे सांगण्यासाठीही लहान मुल जीभ बाहेर काढतं. त्यामुळे जर तुमचंही बाळ लहान असेल आणि ते जीभ सतत बाहेर काढत असेल तर खाली दिलेल्या गोष्टी याला कारणीभूत असू शकतात. म्हणूनच जाणून घ्या याविषयी सर्व माहिती!

भूक लागल्यावर
लहान मुलांच्या जेवणाची वेळ ही कधीच ठरलेली नसते. त्यांना मध्यरात्री किंवा पहाटे पहाटे देखील भूक लागू शकते. पण भूक लागल्यावर समजा त्याची आई आसपास नसेल तर ते बोलू शकत नाही किंवा आईला आवाज देऊ शकत नाही. अशावेळी ते जीभ बाहेर काढून तोंडाने आवाज करू लागतं किंवा चुळबूळ करू लागतं, रडू लागतं. मग अशावेळी त्याने दिलेला संकेत समजून आईने लगेचच त्याला दुध देऊ केलं पाहिजे. अशाने बाळाला वेळीच खाऊ घातल्याचं समाधान आईलाही मिळेल आणि पोट भरलेलं असेल तर बाळंही आनंदाने खेळू लागेल.

जड आहार दिल्याने
लहान बाळ जन्मानंतर जवळ जवळ सहा महिने पूर्णत: आईच्या दुधावर अवलंबून असते. सहा महिन्यांनतर त्याला तुम्ही खिमटी किंवा इतर पचणारे पदार्थ खाऊ घालू शकता. पण त्याआधी जर त्याला जड आहार खाऊ घालण्यास सुरुवात केली तर ते खाताना सतत जीभ बाहेर काढू लागतं. अशावेळी तुम्ही समजून जा की त्याला तो आहार खाताना काहीतरी त्रास होतोय किंवा त्याला तो आहार पचनास जड जात असल्याने बाळ ते अन्न खाण्यास अजूनही तयार नाही.

श्वास घेताना किंवा गैस झाल्याने
ब-याचदा नाकाऐवजी तोंडाने श्वाच्छोश्वास करताना देखील बाळ जीभ बाहेर काढते. सर्दी-पडसे, खोकला, एॅलर्जी, टॉन्सिल्समुळे घशाला सूज आल्याने किंवा साइनसमुळे नाक बंद झाल्याने बाळ तोंडाने श्वास घेतं. त्यासोबतच कधी कधी अन्न न पचल्याने पोटात गैस झाल्यावर वेदना आणि बैचेनी सहन न झाल्यानेही बाळ जीभ बाहेर काढते. तोंडाद्वारे गॅस शरीराबाहेर फेकताना किंवा ढेकर देताना बाळ जीभ देखील बाहेर काढते. अशावेळी त्याच्या वेदना ओळखा आणि तातडीने त्यावर इलाज करा.

दात येताना
बाळ सतत जीभ काढतो त्याला टंग क्रस्ट असं म्हणतात. जेव्हा बाळाला दात येऊ लागतात तेव्हा ते सतत जीभ तोंडाबाहेर काढू लागते. पण दात येण्याचे हे एकमात्र लक्षण नसून हिरड्या लाल होणे, हिरड्यांना सूज येणे, तोंडात वस्तू घालणं, चिडचिड करणं ही देखील दात येण्याचीच लक्षणे आहेत. तर कधी कधी दुध पिताना नवजात मुल जीभ बाहेर काढत असते. जन्माच्या चार ते सहा महिन्यांनंतरही काही मुले जीभ बाहेर काढतात. कारण त्यांना तोपर्यंत या गोष्टीची सवयच झालेली असते.


स्नायूंची समस्या उद्भवल्यावर
काही मुलांमध्ये स्नायू टोन कमी असतात आणि जीभ ही देखील एक असा स्नायूचआहे ज्याला इतर स्नायू नियंत्रित करतात. स्नायू टोनमुळे देखील लहान मुलं सामान्य परिस्थितीपेक्षाही जास्त वेळा जीभ बाहेर काढू शकतात. डाऊन सिंड्रोम किंवा सेरेब्रल पाल्‍सी अशा काही परिस्थितींमुळे देखील अशी परिस्थिती उद्भवू शकते. याव्यतिरिक्त बाळ हिपोटोनिया, माइक्रोगनाथिया या परिस्थितीमध्येही जीभ बाहेर काढू लागते. पण तुमचं बाळ सारखंच टंग थ्रस्टिंग करू लागलं किंवा असं करताना ते चिडचिड करुन रडू लागलं तर वेळीच त्याला बालरोग तज्ज्ञांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info