सिझेरियन कसे करतात?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 16:02

सिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होऊ शकते व सुरक्षित डिलिव्हरीसाठी काय काळजी घ्यावी?

सिझेरियन डिलिव्हरी कधी करतात?

सिझेरियन डिलिव्हरी विशिष्ट कारणे डिलिव्हरी वेळी दिसली तरच केली जाते. गर्भाशय ग्रीवा पूर्णपणे न उघडणे, प्रसूती वेदना संथ होणे, डिलीव्हरी साठी बाळ योग्य स्थितीत नसणे. असे सामान्यतः प्रसूतीच्या दुसऱ्या टप्प्यात होते. अशा प्रतिकुल परिस्थिती मध्ये नॉर्मल डिलीव्हरी करताना बाळ योग्य स्थितीत बाहेर न येण्याची शक्यता असते. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे डॉक्टर सिझेरियन डिलीव्हरीचा सल्ला देतात. यामुळे बाळ आणि आई दोन्ही सुरक्षित राहतात.

किती सिझेरियन डिलिव्हरी करता येतात?

सिझेरियन डिलिव्हरी किती वेळा करावी याचे काही विशिष्ट प्रमाण नाही. हे सर्वस्वी स्त्री किती सक्षम आहे आणि त्या त्या डिलिव्हरी वेळी तिची डिलिव्हरी किती गुंतागुंतीची आहे त्यावर सिझेरियन डिलिव्हरी होणार की नाही ते ठरते. अनेक डॉक्टर असेही आहेत जे आपले अनुभवत सांगताना म्हणतात की, त्यांनी काही काही स्त्रियांचे 6-6 वेळा सिझेरियन डिलिव्हरीज केल्या आहेत. पण काही स्त्रियांची दुसरी सिझेरियन डिलिव्हरी सुद्धा अतिशय धोक्याची ठरली होती. तर यावरून आपण असे म्हणू शकतो कि सिझेरियन डिलिव्हरी किती वेळा होते याची काही विशेष मर्यादा नाही.

सिझेरियन डिलिव्हरी नंतर नॉर्मल डिलिव्हरी

काही स्त्रिया सिझेरियन डिलिव्हरी नंतर आपली डिलिव्हरी नॉर्मल व्हावी अशी इच्छा व्यक्त करतात. वैद्यकीय भाषेत याला वजाईनल बर्थ आफ्टर सिझेरियन अर्थात सिझेरियन डिलिव्हरी नंतरची नॉर्मल डिलिव्हरी असे म्हटले जाते. जाणकारांच्या म्हणण्यानुसार सिझेरियन डिलिव्हरी नंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे. ती यशस्वी होण्याचे प्रमाण 60 ते 80 टक्के असते. मात्र यानंतर पुन्हा सिझेरियन डिलिव्हरी नंतर नोर्मल डिलिव्हरीचा सल्ला दिला जात नाही. हे यासाठी कारण सिझेरियन डिलिव्हरी नंतर नॉर्मल डिलिव्हरी नंतर गर्भाशय फाटण्याचा धोका असतो आणि यामुळे आई व बाळ दोघांचा मृत्यू ओढावू शकतो.

दुसऱ्या सिझेरियन डिलिव्हरीचे धोके

जर स्त्री दुसऱ्यांदा सिझेरियन डिलिव्हरीला सामोरी जात असले तर तिला काही धोके स्वीकारावे लागतात. अर्थात आता वैद्यकीय क्षेत्र प्रगत झाल्याने या धोक्यांचे प्रमाण कमी झाले आहे. डिलिव्हरी वेळी गर्भाशय फाटणे, अधिक जास्त ब्लीडींग होणे, जास्त ब्लीडींगमुळे स्त्रीला रक्त सुद्धा चढवण्याची गरज भासू शकते. मूत्राशय वा आतड्याला इजा होऊ शकते, डिलिव्हरी नंतर जन्मनाळ काढण्यात धोका निर्माण होऊ शकतो. या सगळ्या धोक्यांपासून बचाव म्हणून स्त्रीने आधीपासूच स्वत:ची योग्य काळजी घ्यावी.

सिझेरियन डिलिव्हरीनंतर रिकव्हर होण्यास लागणारा वेळ

तुमच्या सुद्धा मनात हा प्रश्न आला असले की सिझेरियन डिलिव्हरी नंतर किती वेळात स्त्री रिकव्हर होते किंवा जखमा या कधीपर्यंत भरल्या जातात. तर ऑपरेशनच्या जवळपास 6 आठवड्यांनंतरच आतमधील सगळ्या जखमा या बऱ्या होतात. या काळात शक्य तितका संयम बाळगावा आणि त्या टाक्यांची काळजी घ्यावी कारण छोटीशी चूक सुद्धा या जखमांना वाढवू शकते. या काळत कोणतेही मेहनतीचे काम करू नये वा सामान उचलू नये कारण असे केल्याने भरत असलेल्या जखमा खचल्या जाऊन पुन्हा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info