सिझेरियन नंतर पोट कमी करण्यासाठी उपाय?pregnancytips.in

Posted on Thu 24th Feb 2022 : 02:02

सिझेरियन नंतर वजन कमी करण्याचे ५ उपाय

सी-सेक्शन नंतर पुन्हा सुडौल बांध्यासाठी हे व्यायाम जरुर करा.

सी-सेक्शन अथवा सिझेरियन मध्ये करण्यात येणा-या ओटीपोटातील मोठ्या शस्त्रक्रीयेमुळे स्त्रीयांना काही दिवस खुप वेदना सहन कराव्या लागतात.ऑपरेशन नंतर लगेच कोणतीही हालचाल व व्यायाम करणे शक्य नसते.जीएफएफआय फिटनेस अॅकेडमीच्या न्यूट्रीशियनीस्ट व डायरेक्टर तसेच फीटनेस प्रोफेशनल नीरजा मेहता यांच्या मते सिझेरियन झाल्यावर पुन्हा पुर्ववत होण्यासाठी कमीतकमी सहा आठवडे थांबून मगच नियमित व्यायाम सुरु करणे योग्य आहे. सिझेरियन प्रसुतीनंतर आठवड्याभरापासून महिनाभर कायत्रास होतो ?

निसर्गनियमानुसार अशा स्त्रीयांनी प्रथम हलक्याफुलक्या व्यायामाच्या प्रकारापासून वर्कआऊट करण्यास सुरुवात करावी.कारण ऑपरेशन नंतर काही दिवस तुम्हाला साधे उभे रहाणे देखील कठीण होते.अशा महीलांनी सुरुवातील बेडवरुनच व्यायामाला सुरुवात करण्यास हरकत नाही.खोल श्वास घेणे,ओटीपोटाचे व्यायाम व किगल व्यायाम केल्याने तुम्हाला पुर्ववत होण्यास मदत होऊ शकते.त्यानंतर डॉक्टरांची परवानगी मिळाल्यावर तुम्ही पुन्हा नियमित व्यायाम करण्यास सुरुवात करु शकता.हे नक्की वाचा सिझेरियन पद्धतीबाबत हे | 5′ गैरसमज आजच दूर करा !



प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !
मासिकपाळी की गर्भपात - नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ?
स्तनपानाच्या काळात पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे का?



सी-सेक्शन नंतर पुन्हा व्यायाम सुरु करण्यासाठी हा उत्तम पर्याय असू शकतो.नीरजा यांच्या मते यासाठी सुरुवातीला सपाट पृष्टभागावरुन चालण्याचा प्रयत्न करा.सुरुवातीला दिवसभरात ५०० मीटर अंतर चाला व पुढे पुढे हे अंतर वाढवत न्या.चालण्यामुळे तुमचे पाय व संपुर्ण शरीर मजबूत होईल.तुम्हाला याची सवय झाल्यानंतर नियमित काही मिनीटे मध्यम वेगाने व काही मिनीटे ब्रीस्क वॉक घ्या त्यानंतर पुन्हा थोडा वेळ आराम करा.असे कमीतकमी तीन ते चार वेळा करा.यामुळे तुमच्यातील फॅट बर्न होतील व तुमच्यामधील उर्जा देखील वाढेल.

किगल एक्सरसाइज-

तुम्हाला याविषयी प्रसुतीपुर्व वर्गात माहीती देण्यात आलीच असेल.गर्भधारणे प्रमाणेच आता डिलीव्हरी नंतर देखील तुम्ही हा व्यायाम करणे गरजेचे आहे.नीरजा यांच्या मते या व्यायामामुळे तुमच्या योनीमार्गातील स्नायू मजबूत होतात व गर्भाशयाला व्यायाम मिळतो.हा व्यायाम करण्यासाठी तुमच्या योनीमार्गातील स्नायू श्वास घेत काही क्षण ताणून धरा व श्वास सोडत हा ताण कमी करा.सिझेरियन नंतर बरे होण्यासाठी किगल व्यायामामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. जाणून घ्या सि-सेक्शन बाबत अनेक गैरसमज असतात.

एरोमेटीक होल्ड एक्सरसाईज-

तुम्ही तुमचा ओटीपोटावरील ताण व वेदना कमी झाल्यावर हा व्यायाम करणे सुरु करु शकता.नीरजा यांच्या मते हा व्यायाम करण्यासाठी पाय सरळ करुन बसा व हळूहळू पाठीचा कणा वाकवत पुढच्या दिशेन झुका.लक्षात ठेवा जास्त ताण घेऊन हा व्यायाम करु नका.तसेच वाकताना शरीराला हिसका बसणार नाही याची देखील काळजी घ्या.

लाईट वेट ट्रेनींग-

तुमची पाठ व पोटाचे स्नायू पुरेसे मजबूत झाल्यावर तुम्ही लाईट वेट ट्रेनींग करु शकता.नीरजा यांच्या मतानूसार सिझेरियन नंतर लाईट वेट ट्रेनींग केल्यामुळे तुमचे शरीराचा तोल सांभाळणे सुधारते,शरीरामध्ये समन्वय साधता येतो तसेच पोट व इतर भागावरील चरबी कमी होण्यास मदत होते.त्याचप्रमाणे तुम्हाला क्रंचेस सुरु करण्यास देखील काहीच हरकत नाही.ओटीपोट मजबूत करण्यासाठी क्रंचींग दी मील,रिवर्स क्रंचेस,नॉर्मल क्रंचेस हे प्रकार हळूहळू करण्यास सुरुवात करा. नक्की वाचा गरोदरपणातील पाठदुखी कमी करेल ही | 5′ योगासनं !

वॉटर वर्कआऊट-

सी-सेक्शन नंतर पुन्हा शेप मध्ये येण्यासाठी पोहणे अथवा वॉटर अॅरोबिक्सचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.नीरजा यांच्यामते वॉटर वर्कआऊट हा योग्य व सुरक्षित व्यायाम प्रकार आहे.कारण यामुळे तुमच्या सांध्यांना योग्य व्यायाम मिळतो.पोहल्यामुळे देखील तुमचे स्नायू बळकट होतात व कार्डिओ व्हॅस्क्युलर सहनशीलता वाढते. जाणून घ्या नैसर्गिक प्रसुतीनंतर योनीमार्ग शिथील होतो का?

solved 5
wordpress 2 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info