स्त्री बीज वाढीसाठी आहार?pregnancytips.in

Posted on Sun 27th Nov 2022 : 13:37

गरोदर (pregnant) होण्यात अनेक घटक योगदान देतात, यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो अंडाशयाची गुणवत्ता! हे अंडाशय (ovary) प्रजनन होण्यासाठी अतिशय निरोगी असणे गरजेचे असते. जर गरोदर स्त्रीचे अंडाशय सुदृढ असेल तर त्यात अर्भकाचा विकास योग्य पद्धतीने होतो आणि बाळ एतिशय सुदृढ होऊन जन्म घेते. या अंडाशयातील निरोगी अंडी स्त्रीची मासिक पाळी, भविष्यातील प्रजाना क्षमता आणि गर्भधारणा होण्याची क्षमता निर्धारित करतात. योग्य आहार, पोषण आणि निरोगी जीवनशैली या सगळ्या गोष्टीनुसार स्त्रीच्या अंडाशयाची गुणवत्ता ठरते.

जर तुमची हि गुणवत्ता समाधानकारक नसेल आणि तुम्हाला हि गुणवत्ता सुधारायची असेल तर तुम्ही काही विशेष पदार्थ आहारात सेवन करायला हवेत. एक गोष्ट लक्षात घ्या आहारातील हा बदल केवळ आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. डॉक्टरच तुम्हाला तुमच्या अंडाशयाची गुणवत्ता सांगून त्या नुसार काय उपाय करावेत हे नीट सांगू शकतात. त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे या पदार्थांचे सेवन करू नये.

अ‍ॅव्होकॅडो

तुम्हाला माहित असेलच की अ‍ॅव्होकॅडो ला सुपरफूड सुद्धा असे म्हणतात. असे का म्हणून विचारताय? अहो कारण कित्येक पदार्थांत वेगवेगळे दिसणारे गुणधर्म एका अ‍ॅव्होकॅडोमध्ये आढळतात. म्हणजेच एक अ‍ॅव्होकॅडो खाल्ल्यास त्यातून पुष्कळ गोष्टी शरीराला मिळतात आणि त्या सर्व गोष्टी शरीराला उपयुक्तच असतात. तर अशा या अ‍ॅव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट असते जे अंडाशयाची गुणवत्ता आणि स्वस्थता अधिक सुधारण्यास मदत करते. म्हणून अंडाशयाची गुणवत्ता वाढवण्यासठी स्त्रीने अ‍ॅव्होकॅडचे सेवन आवर्जून करावे.

कडधान्य

स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता असणे हा अतिशय गंभीर विषय ठरू शकतो. खास करून जेव्हा स्त्री गरोदर राहते तेव्हा लोहाची कमतरता तिला आणि बाळाला दोघांना नुकसान पोहचवू शकते. पण गरोदर राहण्याआधी असणारी लोहाची कमतरता गर्भधारणेवर प्रभाव टाकू शकते. स्त्री च्या शरीरात गरोदर राहण्यापूर्वी लोहाची कमी असल्यास त्यामुळे अंडाशय निरोगी राहत नाही. अशावेळी कडधान्ये आणि डाळ यांचे सेवन केल्यास लोह, जीवनसत्त्व ब कॉम्पलेक्स, मॅग्नेशियम नि इतरही अनेक पोषक तत्वे स्त्री च्या शरीराला मिळतात. हि सर्व तत्वे गर्भधारणेला चालना दतात.

आले

हो मंडळी आपल्या आहाराचा अविभाज्य भाग असणारे आले हे स्त्रीच्या अंडाशयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गुणकारक आहे. आल्यामध्ये सुजन विरोधी गुण असतात जे पचन सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करतात. शिवाय प्रजनन तंत्राशी निगडीत समस्या, अनियमित मासिक पाळी सुद्धा आल्याचे सेवनाने दूर होतात. प्रजनन अंगांना आलेली सूज सुद्धा कमी करण्याची क्षमता आल्यात असते. आल्याचे सेवन करण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा बनवून पिऊ शकता किंवा आहारात आल्याचा जास्तीत जास्त वापर करू शकता.

दालचीनी

दालचिनी सुद्धा स्त्रियांची गर्भधारणा वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते. दालचीनिच्या सेवनाने अंडाशयाची सुदृढता अधिक वाढते आणि प्रजनन क्षमतेला चालना मिळते. पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोमच्या समस्येत दालचिनी खूप उपयुक्त ठरते. पीसीओएस आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासठी स्त्रीने दालचीनीचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. जर स्त्रीला आपली फर्टिलिटी पॉवर वाढवायची असेल आणि अंडाशयाची गुणवत्ता सुधारायची असले तर कॅफिनयुक्त पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे आणि शक्य तितक कमी ताण घ्यावा. अधिकाधिक आनंदी व खुश राहण्याचा प्रयत्न करावा.

आहारावर लक्ष द्या

अंडाशयाची गुणवत्ता ढासळली असेल व ढासळत असेल तर त्याला चुकीचा आहार सुद्धा कारणीभूत असू शकतो. स्त्रीने आपल्या आहारात अधिकाधिक पालेभाज्या, सुका मेवा आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश करवा. स्त्रीने तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न, साखर आणि मीठ यांपासून दूर राहावे. स्त्रियांच्या अंडाशयातील बीज फर्टिलाइजेशन आणि इंप्लांटेशनच्या संभावनेला प्रभावित करतात. अंडाशयातील बीजाच्या गुणवत्तेवरून कळते की ते गरोदरपणापर्यंत पोहोचेल की नाही. एक बीजाला ओवेल्युशनसाठी तयार होण्याकरता ९० दिवसांचा वेळ लागतो. तुम्हाला जर खरंच आपल्या अंडाशयाची आणि बीजाची गुणवत्ता वाढवून लवकरात लवकर गरोदर रहायचे असेल तर या गोष्टी करण्यास नक्की सुरुवात करा.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info