Google AdSense Header Slot

अगदी सुरुवातीला बाळ किती वेळ झोपतो?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 22
अगदी सुरुवातीला बाळ किती वेळ झोपतो?
लहान बाळाने पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक असतं कारण यामुळे त्यांचा मुड रिफ्रेश राहतो आणि शारीरिक व मानसिक विकास देखील चांगला होतो. पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या वयाच्या मुलांनी किती तास झोप घेणं आवश्यक असतं?
बाळासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची असते. बाळाला जितका जास्त आराम मिळेल तेवढे बाळ चांगल्या स्थितीत आणि सुदृढ राहील. पण आपण अशी अनेक लहान बाळं पाहतो जी खूप झोपतात पण तरी देखील त्यांना दिवसभर सुस्ती असते. सामान्यत: माणूस हा असा प्राणी आहे जो मस्त झोप काढून उठला की त्याला फ्रेश वाटते. पण अनेक मुलांमध्ये सुस्तीची ही समस्या दिसून येते. पण ही समस्या खरंच गंभीर आहे का? हा कोणता आजार आहे का? यावर उपचार करायला हवेत का? हे आणि असे अनेक प्रश्न अशावेळी पालकांच्या मनात उद्भवू शकतात. आज आपण याच गोष्टीचा मागोवा या लेखातून जाणून घेणार आहोत. सोबत हे देखील माहित करून घेणार आहोत की लहान मुलांना नेमकी किती झोप मिळाली पाहिजे. चला तर जाणून घेऊया.
बाळाला किती झोप मिळाली पाहिजे?

हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात अनेक वेळा येत असतो. आज याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊया. जस जसे बाळ मोठे होते तस तशी त्याची झोपेची गरज बदलत जाते. अमेरिकन अॅकेडमी ऑफ स्‍लीप मेडिसिनच्य अहवाला नुसार नवजात बाळ ते 12 महिने वयाच्या बाळांना 12 ते 16 तासांची झोप आवश्यक असते. तर एक किंवा दोन वर्षांच्या बाळाला दिवसातून 11 ते 14 तासांची झोप गरजेची असते. सामान्यत: नवजात बाळ तीन ते चार तासांच्या गॅपमध्ये 30 ते 45 मिनिटे झोपते आणि एक वर्षाचे झाल्यावर ते रात्री उशिरा पर्यंत झोपण्यास सुरुवात करते.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp