एक वर्षाच्या बाळाला काय खाऊ घालावे?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 16:06

जेव्हा आपल्या घरात बाळ जन्माला येते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदित होते. घरातील सगळे सदस्य त्या बाळाच्या मागेपुढे दिमतीला असतात. बाळ छोटेसे असते पण ते संपूर्ण घराला नाचवते आणि आईबाबा तर बाळाच्या चोवीस तास बाळाच्या दिमतीला हजर असतातच पण घरातील इतर सदस्य सुद्धा बाळाचे कौतुक करण्यास उत्सुक असतात. बाळाच्या वाढीचे सगळे टप्पे बघण्याचा घरातल्या सर्वांनाच उत्साह असतो. तसेच बाळाला काही त्रास झाला तर सगळ्यांचाच जीव वर-खाली होतो. जोपर्यंत बाळ बोलू शकत नाही तोपर्यंत त्याला नेमके काय हवे आहे असा प्रश्न पालकांसमोर असतो. जरी बाळाला 12 महिने स्तनपान दिले जाते, परंतु जेव्हा ते 1 वर्षाचे होते तेव्हा डॉक्टर त्याला पौष्टिक आहार (1 Varshachya Balacha Aahar) देण्याची शिफारस करतात. अशा परिस्थितीत बाळाला पौष्टिक आहारात कोणत्या गोष्टी द्याव्यात हे आईबाबांनी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे बाळ वयाच्या पहिल्या वर्षापासूनच निरोगी आणि बुद्धिमान बनू शकेल. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनुसार, बाळ 12 महिन्यांचे झाल्यावर त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी 1,000 कॅलरीज, 700 मिलीग्राम कॅल्शियम, 600 IU व्हिटॅमिन डी आणि 7 मिलीग्राम लोह असलेल्या पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. तर जाणून घेऊया 1 वर्षाच्या बाळाचा आहार कसा असावा. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी बाळाला कुठले पदार्थ पौष्टिक पदार्थ द्यावेत तसेच बाळाला कोणते पदार्थ देऊ नयेत. बाळाच्या आईला कायमच बाळाच्या जेवणाची चिंता असते, बाळाने सगळं पौष्टिक अन्न पोटभर खावं अशीच आईची इच्छा असते. म्हणूनच येथे तुमच्या मदतीसाठी 1 वर्षाच्या बाळाचा आहार तक्ता दिलेला आहे जो तुम्ही तुमच्या बाळासाठी फॉलो करू शकता.
1 वर्षाच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्न

1 वर्षाचे बाळ खूप ऍक्टिव्ह झालेले असते.या ऍक्टिव्ह बाळाची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न आईबाबांना पडतो. नुकतेच उभे राहायला व कदाचित चालायला शिकल्याने त्याला एका ठिकाणी बसून राहणे आवडत नाही. त्यामुळे सतत हालचाल करत असलेल्या या वाढत्या वयाच्या बाळाला भरपूर पोषणाची आवश्यकता असते. तुमच्या बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी त्याला हे अन्नपदार्थ आवर्जून द्या.

केळी, पीच आणि इतर मऊ फळे

मऊ आणि ताजी फळे खाणे खूप फायदेशीर आहे. फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक पोषक घटकांमुळे बाळाला भरपूर पोषण देखील मिळेल, ज्यामुळे तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हळूहळू तुमच्या बाळाला केळी, संत्री, स्ट्रॉबेरी, पीच किंवा आंबा यांसारखी फळे द्या. फळे लहान तुकड्यांमध्ये ठेवा, जेणेकरून त्यांना गिळताना त्रास होणार नाही. द्राक्षे देताना त्यांचे नेहमी दोन किंवा चार तुकडे करा आणि तुमच्या बाळाला खायला द्या. मऊ आणि ताजी फळे वेळेचा अपव्यय न करता सहजपणे कापून तयार करता येतात आणि जेव्हाही तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचे असेल तेव्हा ते तुम्ही एअरटाइट डब्यात काप करून घेऊन जाऊ शकता. नेहमी लक्षात ठेवा की फ्रीजमध्ये ठेवलेली गार फळे बाळाला देऊ नयेत. ती आधी बाहेर काढून ठेवून मग नॉर्मल तापमानाला आल्यावर बाळाला द्यावीत. बाळाचे पोट साफ होण्यासाठी त्याला आहारात आवर्जून फळे द्या.

दूध आणि दही

जर तुमच्या बाळाला तुम्ही 12 महिने फक्त स्तनपान देत असाल आणि बाहेरचे दूध देत नसाल तर आता तुम्ही बाळाला गायीचे दूध देण्यास सुरुवात करू शकता. दूध आणि दही हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे त्यांच्या हाडांसाठी व दातांसाठी खूप फायदेशीर आहेत. तुम्ही या वयात त्यांना मध देखील देऊ शकता, परंतु 12 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाला ते कधीही देऊ नये. असे केल्याने त्यांना बोट्युलिझमचा धोका होऊ शकतो, जो एक गंभीर संसर्ग आहे. तुम्ही तुमच्या बाळाला हळूहळू दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसह नवीन पौष्टिक पदार्थ देखील देऊ शकता. बाळाला दुधाचे इतर पर्याय देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण दूध हे बाळाच्या योग्य पोषणासाठी आवश्यक आहे.

लापशी

मुले 4 वर्षांची होईपर्यंत त्यांना कडक पदार्थ खाण्यास त्रास होतो. त्यामुळे तोपर्यंत त्यांचे अन्न चांगले मॅश केलेले किंवा सहज चघळता येण्याजोगे असावे. ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे कारण तुमचे बाळ ते सहजपणे गिळू शकते. त्यात प्रथिने, कार्ब्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असे पौष्टिक घटक आहेत.तसेच तुम्ही बाळाला लापशी रव्याचा दलिया देखील देऊ शकता.

फक्त तृणधान्यांपासून बनवलेले पॅनकेक्स

साधारणपणे लहान मुलांना पॅनकेक्स आवडतात आणि संपूर्ण धान्य हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहेत. म्हणून तृणधान्यांपासून बनवलेले पॅनकेक्स खाल्ल्याने तुमच्या 1 वर्षाच्या बाळाला चांगले पोषण मिळेल.

अंडी

लहान मुले आणि वृद्ध या दोघांसाठीही अंडी हा एक पोषक आहार आहे. अंड्यांमध्ये प्रथिने, फॅट्स आणि इतर पोषक घटक असतात, जे डोळे आणि मेंदूसाठी फायदेशीर असतात. अंडी उकडून सोलून त्याचे छोटे तुकडे करून बाळाला खायला द्या. अंड्याचे लहान तुकडे करा जेणेकरून तुमचे मूल ते स्वतःच स्वतःच्या हाताने खाऊ शकेल.

टोफू

टोफू हा लोह, कॅल्शियम आणि प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. फक्त 1 वर्षाच्या बाळासाठी फक्त 56 ग्रॅम असलेले फर्म टोफू योग्य मानले जाते, कारण ते तुमच्या बाळासाठी सुमारे 1 मिलीग्राम लोह किंवा सुमारे 14% DV प्रदान करते. तुमच्या बाळाला ‘सोया ऍलर्जी’ असेल तर तुम्ही त्याला टोफू देऊ नका.
1 वर्षाच्या बाळाने किती खाल्ले पाहिजे

1 वर्षाच्या बाळांसाठी मील प्लॅन किंवा बेबी फूड चार्ट बनवताना हे लक्षात ठेवायाला हवे की बाळाला दिवसातून किमान 3 ते 4 वेळा आईचे दूध किंवा फॉर्म्युला मिल्क पाजले पाहिजे आणि हळूहळू ते 3 किंवा 2 वेळा पाजण्यापर्यंत कमी करा. परंतु बाळाला किमान 2 वेळा दूध दिलेच पाहिजे. याशिवाय बाळाला दिवसातून दोन ते तीन वेळा स्नॅक्स खायला द्यावे. याचा अर्थ बाळाला 4 ते 5 वेळा घन पदार्थ किंवा अन्न आणि 2 ते 3 वेळा दूध देणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे बाळ घन पदार्थ घेऊ शकत नाही, तर तुम्ही बाळाला सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या दरम्यान दोनदा घन पदार्थ देऊ शकता आणि दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात बेबी फूड शेक आणि ज्यूस देऊ शकता. तुमच्या बाळाला काय आवडते व पचते त्यानुसार तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाचा मील प्लॅन तयार करा.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info