एक्टोपिक प्रेग्नेंसी म्हणजे काय?pregnancytips.in

Posted on Thu 10th Nov 2022 : 09:56

एक्टोपिक गर्भधारणा म्हणजे काय ? सामान्य आणि या गर्भधारणेतील फरक घ्या जाणून

प्रत्येक महिलेचे ‘आई होणे’ हे स्वप्न असते. आई होण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक महिलेला अनेक शारिरीक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, कधी कधी पुरेश्या माहीतीअभावी तिचा गर्भपात होतो, तर कधी एक्टोपिक गर्भधारणेमुळे तिला जीवाचा धोका पत्करावा लागतो.

चला तर मग आजच्या लेखामध्ये या एक्टोपिक गर्भधारणेबद्दल जाणून घेऊयात. ज्याबद्दल प्रत्येक मुलीला माहीत असणे आवश्यक आहे. या लेखामध्ये डॉ. पूनम खेडा, तीरथ राम शाह हॉस्पिटलच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि कोलंबिया एशिया हॉस्पिटलच्या डॉ. विनिता दिवाकर यांनी एक्टोपिक गर्भधारणेविषयी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.



एक्टोपिक गर्भधारणा काय आहे ?
जेव्हा एखादी महिला गरोदर असते तेव्हा तिच्या शरिराला गर्भधारणा किंवा गर्भधारणेद्वारे बाळाला जन्म देण्यापर्यंत अनेक प्रक्रियांमधून जावे लागते. यामध्येच असलेली एक प्रक्रिया म्हणजे फलित अंड्याचा गर्भाशयापर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्ग होय. हे भ्रूण गर्भाशयाला जोडलेल्या फॅलोपियन ट्यूबमधून गर्भाशयात पोहोचते. परंतु, पोटाच्या खालच्या भागात गोठलेली पोकळी किंवा गर्भाशय ग्रीवा किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे गर्भाशयात पोहोचण्यापूर्वीच ते भ्रूण नळीमध्ये विकसित होऊ लागते, तेव्हा या स्थितीला एक्टोपिक गर्भधारणा असे म्हणतात.

अमेरिकन सोसायटी ऑफ फॅमिली फिजिशियन्स (एएएफपी) च्या मते, सामान्यतः 50 पैकी एक महिला एक्टोपिक गर्भधारणेच्या समस्याचा सामना करते. जर यावर योग्य वेळी उपचार न केल्यास ही स्थिती त्या महिलेच्या जीवासाठी घातक ठरू शकते.

डॉक्टर विनिता सांगतात की, गर्भाचा विकास गर्भाशयाशिवाय इतरत्र योग्य प्रकारे होऊ शकत नाही. जर काही कारणाने गर्भधारणा गर्भाशयाऐवजी इतरत्र थांबली तर ती एक एक्टोपिक गर्भधारणा आहे. अशा परिस्थितीत गर्भपात करणे हा योग्य पर्याय आहे.

सामान्यपणे एक्टोपिक गर्भधारणा झाल्याचे गर्भधारणेच्या चौथ्या किंवा दहाव्या आठवड्याच्या मध्यावर दिसून येते. त्यामुळे, मासिक पाळी चुकल्यावर दोन आठवड्यांच्या आत डॉक्टरांशी संपर्क साधा आणि जर तुमची गर्भधारणा एक्टोपिक असेल, तर ताबडतोब त्यावर उपचार सुरू करा. यामध्ये उशिर केल्यास महिलेच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.



· गर्भपात

· रक्तस्त्राव

· पोटात तीव्र वेदना

· अतिरिक्त रक्तस्रावामुळे जीवाला धोका
एक्टोपिक गर्भधारणेची कारणे


· एक्टोपिक गर्भधारणेसाठी सर्वसाधारणपणे कोणतेही स्पष्ट कारण नसते. परंतु, महिलेच्या आरोग्याशी संबंधित काही अशा परिस्थिती असतात, ज्या एक्टोपिक गर्भधारणेचे कारण बनू शकतात:

· पूर्वीच्या उपचारांमुळे किंवा शस्त्रक्रियेमुळे फॅलोपियन ट्यूबमध्ये सूज आणि संसर्गाच्या तक्रारी.

· हार्मोनल कारणांमुळे

· अनुवांशिक आरोग्य समस्यांमुळे

· जन्मजात दोषांमुळे

· फॅलोपियन ट्यूब आणि प्रजनन अवयवांच्या आकारावर आणि स्थितीवर परिणाम करणाऱ्या वैद्यकीय परिस्थिती.

· प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी घेतलेल्या औषधांमुळे

· पेल्विक इन्फ्लेमेट्री रोगाच्या समस्येने ग्रस्त असल्यास.

· गर्भनिरोधक म्हणून जर तुम्ही गर्भनिरोधक कॉईल घातली असेल किंवा गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करत असल्यास

· ज्यांना पूर्वी एक्टोपिक गर्भधारणा झाली आहे.

· ज्या स्त्रिया 35 वर्षांपेक्षा जास्त वयामध्ये गरोदर आहेत

· ज्यांनी पोट किंवा ओटीपोटाच्या शस्त्रक्रियेव्यतिरिक्त गर्भपात केला आहे.

· ज्या महिला धूम्रपान करत आहेत

· ज्या महिलांना पूर्वी एंडोमेट्रिओसिसची समस्या होती.

· ज्या महिलांनी गर्भधारणेसाठी फॅलोपियन ट्यूबची शस्त्रक्रिया केली आहे.

· ज्या महिला गोनोरिया किंवा क्लॅमिडीया यांसारख्या लैंगिक संक्रमित रोगांनी (STDs) ग्रस्त आहेत.

· ज्यांच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा आहे, ज्यामुळे गर्भधारणेनंतर फलित अंडे गर्भाशयात पोहोचू शकत नाही.
एक्टोपिक गर्भधारणेची लक्षणे


कोणत्याही धोक्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, एक्टोपिक गर्भधारणा आणि सामान्य गर्भधारणा या दोघांमधील फरक समजून घेणे फार महत्वाचे आहे. मळमळ आणि छातीत होणारा घट्टपणा या दोन्ही सामान्य आणि एक्टोपिक गर्भधारणेच्या तक्रारी आहेत. परंतु, जर तुम्हाला या शिवाय, ही खालील लक्षणे आढळली तर ताबडतोब डॉक्टरकडे जा. चला तर मग जाणून घेऊयात एक्टोपिक गर्भधारणेच्या या लक्षणांबद्दल

· पोटाच्या खालील भागात, ओटीपोटात, खांद्यावर आणि मानेमध्ये सतत तीव्र वेदना होणे.

· पोटाच्या एका बाजूला सतत तीव्र वेदना होणे.

· योनीतून कमी-जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे.

· जास्त प्रमाणात घाम येणे, तीव्र डोकेदुखी आणि सतत सुस्ती येणे, जास्त थकव्याने बेशुदध होणे इत्यादी तक्रारी

· शौचास गेल्यावर जास्त वेदना होणे

· कमी रक्तदाबाची समस्या

· त्वचेचा रंग काविळीच्या रुग्णासारखा पिवळा होतो.


एक्टोपिक गर्भधारणेचे निदान आणि उपचार

जर तुम्हाला वाटत असेल की तुमची गर्भधारणा सामान्य नाही. तुम्हाला एक्टोपिक गर्भधारणा झाल्याचा संशय असल्यास, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. एक्टोपिक गर्भधारणेसाठी चाचणी करणे हे शारिरीकदृष्ट्या शक्य नाही. यासाठी, ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड केले जाते, ज्यामध्ये डॉक्टर तुमचे बाळ गर्भाशयात आहे की नाही हे पाहतात. यासाठी, ते फॅलोपियन ट्यूबमध्ये काठीसारखे उपकरण घालून तुमच्या गर्भाशयाची तपासणी करतात.याशिवाय, गर्भधारणा

एक्टोपिक आहे का ? हे तपासण्यासाठी रक्ताची तपासणी देखील केली जाते, ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान तुमच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि एचसीजीची पातळी तपासली जाते. अल्ट्रासाऊंड दरम्यान गर्भ हा गर्भाशयात दिसत नसल्यास आणि तुमच्या शरिरातील या हार्मोन्सची पातळी वारंवार रक्त तपासणी करूनही कमी किंवा स्थिर असेल तर याचा अर्थ तुमची गर्भधारणा ही एक्टोपिक आहे.

जर तुम्हाला तीव्र पोटदुखी, रक्तस्त्रावाची तक्रार असेल तर या सर्व तपासणीच्या प्रक्रियांऐवजी ताबडतोब डॉक्टरांकडे जा. जास्त उशीर झाल्यास, फॅलोपियन ट्यूब फुटू शकतात, ज्यामुळे महिलेचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा परिस्थितीत तात्काळ शस्त्रक्रिया करूनच त्यांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. अशी परिस्थिती ही खरं तर अशा प्रकरणांमध्ये येते, ज्यामध्ये एक्टोपिक गर्भधारणा वेळेत ओळखली जात नाही.

एक्टोपिक गर्भधारणा होण्याची शक्यता असल्यास महिलेची कीहोल शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये ओटीपोटात एक छोटासा चीरा टाकला जातो आणि फॅलोपियन ट्यूबची तपासणी पोटाच्या माध्यमातून एका उपकरणाद्वारे केली जाते. जर एक्टोपिक गर्भधारणा दर्शविली, तर लॅप्रोस्कोपी प्रक्रियेद्वारे गर्भ असलेली ट्यूब कापली जाते. फॅलोपियन ट्यूब फुटल्यास कीहोल शस्त्रक्रियेऐवजी पोटाची शस्त्रक्रिया करावी लागते. परंतु, हे फार कमी प्रकरणांमध्ये घडते.

· शस्त्रक्रियेनंतर असे घडल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधा

· शस्त्रक्रियेनंतर घरी आल्यावरही रक्तस्त्राव थांबला नसेल तर

· जास्त रक्तस्त्राव झाल्यास.

· योनीतून आणि शस्त्रक्रियेच्या जागेवरुन वाईट वास आल्यावर

· शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर स्पर्श केल्यास गरम जाणवल्यावर

· शस्त्रक्रियेची जागा लालसर दिसणे

· शस्त्रक्रियेच्या जागेवर सूज आल्यास
या गोष्टी लक्षात ठेवा

· जड वस्तू उचलणे टाळा.

· बद्धकोष्ठता टाळण्यासाठी भरपूर पाणी पिण्यासोबतच लिंबूपाणी, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस इत्यादी द्रव पदार्थांचा आहारात समावेश करा.

· पेल्विकच्या विश्रांतीसाठी लैंगिक संबंध टाळण्याशिवाय टॅम्पोन्सचा वापर करू नका.

· योनी पाण्याने जास्त धुवू नका.

· शस्त्रक्रियेनंतर पहिल्या आठवड्यात शक्य तितकी विश्रांती घ्या. त्यानंतर स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी हलकी-फुलकी कामे करा.


बचाव होऊ शकतो

· सामान्यपणे, एक्टोपिक गर्भधारणेचे एक कारण हे एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत लैंगिक संबंध असू शकते. हे टाळण्यासाठी तुमचा पार्टनर सेक्स करताना कंडोम वापरतो याची खात्री करा. याशिवाय निरोगी गर्भधारणेसाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींशी संबंध ठेवणे टाळा.

· जर तुम्हाला ओटीपोटात दुखणे, लघवी करताना त्रास होणे, सेक्स करताना दुखणे, योनीमार्गातून जास्त प्रमाणात रक्त येणे, योनीमार्गाचा वास येणे इत्यादी तक्रारी असतील तर याचा अर्थ तुम्ही लैंगिक संसर्गाने ग्रस्त आहात. निरोगी गर्भधारणेसाठी, या सर्व समस्यांवर त्वरित उपचार करा.

· एक्टोपिक गर्भधारणेसाठी धूम्रपान हे देखील एक मुख्य कारण आहे. त्यामुळे, धूम्रपान करणे टाळा.
काळजी करण्याचे कारण नाही

सामान्यपणे, एक्टोपिक गर्भधारणेच्या शस्त्रक्रियेनंतर, अनेक स्त्रियांना त्या भविष्यात आई होऊ शकतात की नाही याबद्दल काळजी वाटते. याबाबत डॉ.पूनम खेडा सांगतात की, घाबरण्याची आणि काळजी करण्याची गरज नाही. निरोगी महिलेच्या शरीरात दोन फॅलोपियन ट्यूब असतात. काही कारणाने एक ट्यूब नष्ट झाली तरी त्या पुन्हा गरोदर होऊ शकतात, त्यामध्ये काहीच अडचणी येत नाहीत.

बऱ्याच महिला या एक्टोपिक गर्भधारणेनंतर पुन्हा गर्भवती होतात आणि निरोगी बाळाला जन्म देतात. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही फॅलोपियन्स ट्यूब जर नष्ट झाल्या, तर आई होण्याचा आनंद आयव्हीएफच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त करता येईल. परंतु, एक्टोपिक गर्भधारणेमध्ये स्त्रीच्या दोन्ही ट्यूब्स नष्ट होण्याची शक्यता ही फारच दुर्मिळ आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांचा सल्ला घेत रहा.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info