गरोदरपणात कोणते पुस्तक वाचावे?pregnancytips.in

Posted on Tue 8th Nov 2022 : 10:10

Best Books To Be Read During Pregnancy In 2022 In Marathi|गरोदरपणात कोणती पुस्तके वाचावीत ?

प्रेग्नेंसी म्हटलं की अगदी काय करू आणि काय नको नको असं होऊन जातं सगळीकडे आनंदाचे वातावरण असते यामध्ये चांगले गर्भसंस्कार होण्यासाठी चांगली पुस्तके(Books) वाचण्याचा सल्ला दिला जातो.आई आणि बाळ यांच्यामध्ये बॉण्डिंग सुद्धा प्रेग्नेंसी पासूनच सुरु होते.यासाठी मी आज तुम्हाला pregnancy मध्ये कोणती पुस्तके वाचावीत याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे.
गरोदरपणात वाचवायची पुस्तके(Books)
गरोदरपणात कोणती पुस्तके वाचावीत?


आयुर्वेदीय गर्भसंस्कार(Ayurvediy Garbh Sanskar)

गर्भसंस्कार म्हणजेच बाळ पोटात असतानाच त्याच्यावर केले जाणारे संस्कार यासाठी डॉ. बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे उत्तम पुस्तक आहे मी स्वतः सुद्धा माझ्या प्रेग्नेंसी मध्ये हे पुस्तक वाचले होते.
वंशवेल-डॉ. मालकी कारगावकर:

आपली मुलं ही दिसायला चांगली व्हावीत तसेच वागायला समंजस हवीत अभ्यासात देखील हुशार असायला हवीत असे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते त्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात याची माहिती या पुस्तकातून मिळते.
रामरक्षा:

दररोज संध्याकाळी सात वाजता गर्भवती स्त्रीने स्पष्ट उच्चारात रामरक्षा म्हणावी त्याने बाळावर चांगले संस्कार होण्यास मदत होते.
बोधकथांची पुस्तके:

प्रेग्नेंसी मध्ये तुम्ही बोधकथा देखील वाचू शकता त्यामुळे तुम्हाला चांगला बोध मिळतो आणि तुम्ही चांगला विचार करू लागतो त्यामुळे तुमची चांगली वर्तणूक होण्यास मदत मिळते याशिवाय तुम्ही मनोरंजन म्हणून पंचतंत्राच्या गोष्टी अकबर बिरबलाच्या गोष्टी तसेच तेनालीराम यांच्या गोष्टी यासारख्या गोष्टीदेखील वाचू शकता.
जोक्स:

तुमचा मूड काही कारणामुळे खराब झाला असेल तर मूड ठीक करण्यासाठी तुम्ही जोक्स देखील वाचू शकता त्याने तुमचा मूड चांगला होईल आणि प्रेग्नेंसी मध्ये मूड चांगला असणे हे तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे आहे.
कविता:

जर तुम्हाला कवितेची आवड असेल तर तुम्ही कवितेची पुस्तकेही वाचू शकता काही जणांना कविता वाचून देखील आनंद मिळू शकतो.


काही थोर पुरुषांची आत्मचरित्र जसे की डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख यांसारखी इन्स्पिरेशनल बुक्स देखील तुम्ही वाचू शकता.

तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांसारख्या राजे महाराजांची पुस्तके देखील वाचू शकता.काही जणांना ऐतिहासिक पुस्तके वाचायला आवडते.
Newspaper:

जर तुम्हाला रोजच्या दैनंदिन घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही Newspaper वाचू शकता.याशिवाय तुम्हाला interest असेल तर general knowledge ची पुस्तके सुद्धा वाचू शकता.

याचबरोबर प्रेग्नेंसी मध्ये बाळाला कसे सांभाळावे या रिलेटेड देखील बुक्स वाचू शकता.

याशिवाय तुम्हाला इंग्रजी पुस्तके वाचायची असतील तर What You Expect When You Are Expecting, Birth Without Fear यासारखी पुस्तके वाचू शकता. याशिवाय Real Food For Pregnancy यासारखी बुक्स म्हणजेच pregnancy मध्ये काय खावे या related बुक्स देखील वाचू शकता.
गरोदरपणात पुस्तके का वाचावीत ?

१) आईच्या विचारांचा डायरेक्ट परिणाम बाळाच्या development मध्ये होतो. आई जर मानसिक तणावाखाली असेल तर डायरेक्ट impact बाळावर होतो यासाठी आईने जरूर चांगली Books वाचली पाहिजेत.

२) पुस्तक वाचल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते आणि गरोदरपणात मन प्रसन्न असणे हे महत्वाचे असते.

३) पुस्तकांमुळे आपल्याला चांगलेच ज्ञान (Knowledge)मिळते.

४) पुस्तकासारखा मित्र आपल्याला जगात सापडणार नाही त्यामुळे जेव्हा आपल्याला वाटत असेल कंटाळा येत असेल तेव्हा आपण पुस्तके वाचू शकतो.

५) पुस्तक वाचताना शक्यतो मोठ्या आवाजात वाचावीत कारण त्यामुळे पोटातील बाळही ते ऐकू शकते आणि त्याच्यावर चांगले संस्कार होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही लँग्वेजमध्ये पुस्तके वाचू शकता.
महत्वाच्या टिप्स :

पुस्तक वाचताना ती बळजबरीने वाचू नये म्हणजे कोणीतरी पुस्तक वाचायला सांगितले आहे म्हणून ते वाचू नये तर ती मनापासूनच वाचावीत.
पुस्तक वाचताना आईच्या चेहऱ्यावर smile आले पाहिजे.
Horror stories किंवा त्या related बुक्स वाचू नयेत. कारण त्यामुळे आई घाबरू शकते आणि त्याचा बळावर वाईट परिणाम होऊ शकतो.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info