गरोदरपणात जळजळ होते का?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 16:09

गर्भवती महिलांना गर्भधारणेनंतर पहिल्या काही दिवसांत अ‍ॅसिडीटी आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतात. पण हे काही जालीम घरगुती उपचार करुन तुम्ही या समस्येला दूर करु शकता.
मातृत्व ही जितकी गोड आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे तितकाच हा एक कठीण आणि खडतर प्रवास आहे. अर्थात कठीण यासाठी कारण त्या प्रवासात आपण एकटे नसतो आपल्यासोबत आपला एक छोटासा सोबती असतो. ज्याची छोट्यात छोटी जबाबदारीही आईवर असते. अगदी आईच्या श्वास घेण्यापासून तिच्या हसण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम बाळावर होत असतो. या काळात मानसिक बदलांसोबतच आईला शारीरिक बदल देखील मोठ्या प्रमाणात झेलावे लागतात. उलटी, अस्वस्थता, मुड स्विंग्स, सकाळी सकाळी येणारा थकवा (morning sickness), जीव घाबराघुबरा होणं यासोबतच पित्त किंवा अ‍ॅसिडीटी ही देखील एक सामान्य समस्या दिसून येते. गरोदर स्त्रीने बाळाच्या आरोग्याचा विचार करता बाहेरची कोणतीही औषधे घेणं बाळ आणि आई दोघांसाठी धोकादायक ठरु शकतं. म्हणूनच खाली दिलेले काही साधेसोपे घरगुती उपाय या काळात नक्कीच तुमची मदत करतील.
गर्भावस्थेत अ‍ॅसिडीटी होण्याची कारणं

छातीत जळजळ आणि मोठ्या प्रमाणात अ‍ॅसिडीटी ही लक्षणं अनेक महिलांना गर्भधारणेच्या पहिल्या दिवसांत जाणवतात. गर्भावस्थेच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये महिलांना ही समस्या सतत भेडसावू शकते. प्रेग्नेंसीच्या पहिल्या दिवसांत शरीरात प्रोजेस्‍टेरोन और रिलैक्‍सिन हार्मोन्स मोठ्या प्रमाणात बनू लागतात. हे हार्मोन्स शरीरातील नाजूक भागांना किंवा स्नायूंना आराम देतात. यामध्ये लैंगिकदृष्ट्या कार्यशील भागांतील (gastrointestinal) स्नायूही सहभागी असतात. यामुळे पचनक्रिया बिघडते आणि त्यामुळे अपचन, पोट फुगणं, अ‍ॅसिडीटी यासारख्या समस्या डोकं वर काढतात.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info