गर्भधारणा झाली कसे ओळखावे घरगुती उपाय?pregnancytips.in

Posted on Sun 27th Nov 2022 : 13:16

तुम्ही गरोदर आहात की नाही, किती दिवसांत कळते?
बऱ्याचदा स्त्रियांना गर्भधारणा (Pregnant woman) झाली आहे, हे कसे ओळखाचे हेच माहिती नसते. आपल्या शरीरावर आणि स्वभात कोणते असे बदल होतात, ज्याने गर्भधारणा झाली आहे, हे ओळखता येते. त्याची लक्षणे जाणून घ्या.

स्त्रिच्या आयुष्यातील आई होणं सर्वांत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पण, बऱ्याचदा गर्भधारणा (Pregnant woman) झाली आहे, हे कसे ओळखाचे हेच माहिती नसते. त्याची लक्षणं काय असतात, आपल्या शरीरावर आणि स्वभावात कोणते असे बदल होतात, ज्याने गर्भधारणा झाली आहे, हे ओळखता येते. तर तुम्ही गरोदर झाला आहात की नाही, ते ओळखण्याची कोणती लक्षणं दिसतात, ते पाहुया... (pregnancy symptoms how to identify if you are pregnant)

गरोदरपणाची शक्यता कधी असते?

गर्भनिरोधक गोळ्या किंवा कंडोमचा वापर न करता संबंध ठेवले तर, गरोदर राहण्याची शक्यता अधिक वाढते. संबंध ठेवल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनंतर स्त्री बीज आणि पुरुष शुक्राणू यांचे मिलन होऊन फर्टिलाईजेशन होते. त्यानंतर 15 दिवसांपर्यंत फर्टिलाईज झालेले अंड गर्भाशयात रुजण्याची प्रक्रिया सुरू होते. तेव्हा स्त्री गरोदर राहते.

गर्भधारणचे लक्षणे कोणती : मासिक पाळी न येणे, चिडचिडपणा वाढणे, मूड सातत्याने बदलणे, पोट गच्च वाटणे किंवा फुगल्यासारखं वाटणे, स्तन दुखणे किंवा जड झाल्यासारखे वाटणे, अशक्तपणा येणे, थकवा येणे, अंग गरम असल्यासारखे वाटणे, सतत लघवीला येणे, मळमळ किंवा उलट्या येणे. या लक्षणांतून तुम्हाला गरोदर असल्याचे कळते. पण, ही लक्षणं 2 आठवड्यांहून जास्त काळ असणं गरजेचं आहे.

मासिक पाळी चुकते : स्त्रियांना नियमितपणे मासिक पाळी येत असते. मात्र, पण अचानक पाळी बंद आली नाही किंवा पाळीचे तारीख टळून 10 दिवस झाले की, तुम्ही गरोदर आहात, असं सांगितलं जातं. पण, यालाही काही अपवाद असतात.

प्रेग्नन्सी टेस्ट करा : बऱ्याचदा लक्षणांवरून तुम्ही गरोदर आहात की नाही, हे ओळखणे कठीण असते. त्यामुळे रुग्णालयात जाऊन प्रेग्नन्सी टेस्ट, ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी करून घेतली, गरोदर आहे की, नाही हे समजते. त्याचबरोबर मेडिकलमध्ये प्रेग्नन्सी टेक्स कीट मिळते, त्याचा वापर करूनदेखील गरोदर आहे की नाही, हे समजते.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info