गर्भधारणेसाठी पपई का चांगली नाही?

Language: Marathi | Published: 12 Oct 2022 | Views: 8
गर्भधारणेसाठी पपई का चांगली नाही?
या खास दिवसांमध्ये खाऊ नये पपई, कारण की...
पपई विविध पोषक तत्त्वांनी भरलेले फळ आहे. हे फळ पोटासाठी खूप चांगले मानले जाते. पपई व्हिटॅमिन 'ए' चा उत्तम स्रोत आहे. पिकलेली पपई पचनशक्ती वाढवते, यामध्ये पेपिन्स नावाचे तत्त्व आढळून येते, जे अन्न पचवण्यात मदत करते. जर तुम्हला करपट ढेकर येत असतील पपईचा रस यावर उत्तम उपाय आहे. कच्च्या पपईची भाजी करून खाणे पोटासाठी उत्तम राहते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. पपईमुळे वीर्य वाढते. त्वचेचे रोग दूर होतात. जखम लवकर भरून येते.

गरोदरावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्याचा फार त्रास होतो. पपईमध्ये लॅटेक्सचे प्रमाण जास्त असते, जे गर्भाशयामध्ये संकुचन निर्माण करू शकते आणि ही स्थिती गर्भपाताचे कारण ठरू शकते.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp