गर्भारपणात स्त्रीच्या जिवाला धोका असतो का?
गर्भवती स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. कारण काळजीअभावी गर्भपाताची शक्यता निर्माण झाली तर तिच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. आपण गेल्या वेळी प्रसूतिपूर्व तपासणी सामान्यत: कशी होते आणि काय सल्ला दिला जातो, काय तपासण्या होतात हे पाहिले.