Google AdSense Header Slot

दहा महिन्याच्या बाळाला काय खाऊ घालायचे?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 16
दहा महिन्याच्या बाळाला काय खाऊ घालायचे?
८ महिन्यांच्या पुढे व ११ महिन्या पर्यंत वय असलेल्या बाळाचा आहार कसा असावा (9 महिन्याच्या बाळाचा आहार)

बाळ साधारण ७ ते ८ महिन्यांचे झाल्यानंतर त्याच्या हालचाली त्याच्या आई वडिलांसाठी सुखद धक्का देणार्‍या असू शकतात. कारण या काळातच बाळ स्वतःच इवलसं शरीर उचलून तुमच्या हातातला चमावा हिसकावू पाहते तेव्हा तुम्ही समाजायचे की त्याला आता नवीन आहार सुरू करायची हिच योग्य वेळ आहे. आता त्याला दिवसातून तीन वेळा तरी पूरक आहार दिला पाहिजे . त्यात एक तृणधान्य, एक भाजी आणि एक फळ यांचा समावेश करावा.

बाळाला नाष्टा म्हणून स्तनपान दिले तरी चालेल. नाष्टा झाल्यावर काही वेळाने पण जेवण्याआधी बाळाला गाजर शिजवून कुस्करून घ्यावे.

१) जेवणामध्ये साधारण पणे मऊसर बाळाला गिळता येईल अशी मुगाच्या डाळीची खिचडी असावी.

२) रात्री एकदा पुन्हा शिजवलेले गाजर अथवा उकडलेला बटाटा द्यावा.

३) झोपताना पुन्हा एकदा स्तनपान देवून बाळाला झोपावावे.

४) मऊ शिजणाऱ्या भाज्या आणि फळे यांचा शिजवून लगदा करून आहार म्हणून द्यावा.

५) सुरुवातीला पालक भोपळा कोहळा रताळ गाजर आशा भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून मऊ वाफवू द्यावेत. हे शिजवताना त्यात पाणी मात्र घालू नये.

६) फळांमध्ये सफरचंद, पेरू, चिकू, केळी हे सुद्धा साल बिया काढुन वाफवून द्यावे. आणि लक्षात असुदया एकावेळी एकच भाजी किंवा फळ दयायचं आहे.

८ ते ११ महिन्यांच्या मुलाचे असे साधारण आहाराचे वेळापत्रक असावे. बाळाच्या क्षमतेनुसार बाळाला कमी जास्त आहार करावा. म्हणजे बाळाला संध्याकाळी खिचडी किंवा उकडलेला बटाटा दिला आणी बाळाचे पोट भरले असले तर स्तनपान देऊ नये. खिचडीच्या ऐवजी मऊसर भात तिखट नसलेली आमटी किंवा गव्हाच्या आोटसची मऊसर लापशी दयावी .
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp