पॅड कसे वापरतात?

Language: Marathi | Published: 27 Jan 2019 | Views: 12
पॅड कसे वापरतात?
६३ टक्के महिला वापरतात मासिक पाळीत कापड

आजही १५ ते २४ वयोगटातील ६३ टक्के महिला मासिक पाळीच्यावेळी कापड वापरतात, अशी धक्कादायक माहिती कुटुंब सर्वेक्षण आरोग्य सर्वेक्षण - ४ मधून पुढे आली आहे



दररोज कपिवाचा गेट स्लिम ज्यूस प्या आणि नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करा

सॅनिटरी नॅपकिनवरचा जीएसटी कर हटवून ते सर्वसामान्य महिलांच्या वापराच्या कक्षेत आणावेत यासाठी महिलांकडून आग्रही मागणी होत असताना आजही १५ ते २४ वयोगटातील ६३ टक्के महिला मासिक पाळीच्यावेळी कापड वापरतात, अशी धक्कादायक माहिती कुटुंब सर्वेक्षण आरोग्य सर्वेक्षण - ४ मधून पुढे आली आहे. मासिक पाळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कापडाच्या स्वच्छतेबाबत पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने सॅनिटरी पॅडचा वापर आरोग्यदायी असतो. मात्र, आजही शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना पॅड वापरणे ही चैनीची गोष्ट वाटते, असे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मासिक पाळीच्या वेळी किती महिला आरोग्यदायी साधनांचा वापर करतात, याचा अभ्यास या सर्वेक्षणामध्ये करण्यात आला होता. पॅडच्या वापराबद्दल आजही ग्रामीण भागामध्ये अनेक शंकाकुशंका, अंधश्रद्धा आहेत. शिवाय त्यांच्या किमतीही परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या अनेक महिलांना पॅडचा वापर करणे हे आर्थिकदृष्ट्या सुसह्य वाटत नाही. सॅनिटरी पॅडवरचा जीएसटी कर हटवण्यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या लातूरच्या पारधेवाडी येथील छाया काकडे यांनीही सॅनिटरी नॅपकिन प्रत्येक महिलेला उपलब्ध व्हावे यासाठी किमती कमी करण्याचा आग्रह व्यक्त केला.


स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शाल्मली दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कपड्याचा वापर वर्षानुवर्षं केला जात आहे. कपडा स्वच्छ, जंतुसंसर्गरहित असेल तर त्याचा वापर करणे हितावह असते. मात्र प्रसूतीनंतर, तसेच रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत असताना, रजोनिवृत्तीच्या काळात कपड्याचा वापर सुसह्य नसतो. मुली तसेच महिलांना कपडा उघड्यावर वाळत घालायला लाज वाटते. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने दमट कपडा वापरला जातो, त्यातूनही जंतुसंसर्ग होतो. गर्भाशयाच्या कॅन्सरसारखे आजारही बळावतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बिहारमध्ये सर्वाधिक प्रमाण

मासिक पाळीदरम्यान महाराष्ट्रात पन्नास टक्के महिला कपडा वापरतात. या सर्वेक्षणामध्ये मासिक पाळीच्या वेळी कपडा वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजे ८२ टक्के आहे. छत्तीसगड मध्ये हे प्रमाण ८१ टक्के तर उत्तरप्रदेशमध्ये हे प्रमाण तितकेच आहे. वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित साधनांचा वापर करण्यामध्ये मिझोरमचा क्रमांक सर्वांत वरचा म्हणजे ९३ टक्के इतका आहे, त्याखालोखाल केरळमध्येही ९० टक्के महिला आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन वापरतात. स्थानिक बटत गटाच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड तयार करण्याची चळवळ महाराष्ट्रात जोर धरत असली तरीही या उत्पादनांना अद्याप म्हणावी तितकी मागणी नाही, फक्त सोळा टक्के स्त्रिया या पॅडचा वापर करतात.


शहरी भागात नॅपकिनचा वापर अधिक

एकूण सर्वेक्षणामध्ये शहरी भागात ७८ टक्के महिला तर ग्रामीण भागातल्या ४८ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात. शिकलेल्या मुली नॅपकिन वापरण्यास प्राधान्य देतात, तर आर्थिक क्रयशक्ती असलेल्या महिलांमध्येही पॅड विकत घेऊन वापरण्याचे प्रमाण अधिक आहे.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp