प्रेग्नेंट आहे का नाही हे कसे ओळखावे?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 16:02

घरातच प्रेग्नेंसी टेस्ट करायची आहे? असा करा मिठाचा वापर
गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक खास आणि हवाहवासा वाटणारा काळ असतो. पण गर्भावस्थेतील आनंद अनुभवण्यासाठी खूप तयारी करावी लागते. जसं की, योग्य आहार, चांगली झोप, यथायोग्य सेक्स पोझिशन या सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष द्यावे लागते. ही खबरदारी घेतल्याने तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. साधारणपणे मासिक पाळी न येणे हे प्रेग्नन्सीचे मोठे लक्षण आहे. पण प्रत्येकवेळीच मासिक पाळी चूकण्यामागे प्रेग्नन्सी हे कारण असू शकत नाही. ब-याच महिला गर्भधारणा तपासणीसाठी प्रेग्नन्सी किटचा आधार घेतात. पण किट महाग असल्याने सर्वच स्तरातील महिलांना ते विकत घेणं शक्य होत नाही. अशावेळी त्या महिला घरच्या घरी मीठाच्या वापराने गर्भधारणा तपासणी करु शकतात.
होममेड प्रेग्नेन्सी टेस्ट म्हणजे काय?

होममेड प्रेग्नेन्सी टेस्ट एक घरगुती उपाय आहे, जो प्रेग्नेन्सी किट घरात उपलब्ध नसल्यास केला जातो. घरातल्या घरात गर्भधारणा तपासणी करण्यासाठी स्त्रिया साखर, ब्लिच किंवा मिठाचा वापर करतात. या सर्व पद्धती एका सिद्धांतानुसार काम करत असून त्याने मुत्रातील एचसीजी हार्मेनच्या पातळीची चाचणी करता येते.
मिठाने गर्भधारणा चाचणी करण्याची योग्य वेळ?

मीठाच्या माध्यमातून प्रेग्नन्सी टेस्ट तेव्हाच करावी जेव्हा त्यातून अधिक अचूक निष्कर्ष मिळतील. सामान्यत: ऑव्ह्युलेशनच्या पाचव्या दिवशी प्रेग्नन्सी टेस्ट करावी. यासाठी पहिल्यापासूनच आपल्या ऑव्ह्युलेशन डेटचा ट्रॅक ठेवावा.
मिठाच्या वापराने कशी करावी प्रेग्नन्सी टेस्ट?

१) सकाळी सकाळी उठल्यानंतर एका बाटलीत पहिल्या लघवीचा सॅंपल घ्या.

२) त्यात तीन चतुर्थांश चमचे मीठ मिसळा.

३) एक ते दोन मिनिटांनंतर लघवी (urine) आणि मीठ एकत्र आल्यावर होणारा परिणाम बघा.

४) जर परिणाम सकारात्मक असेल तर मिठासोबत लघवीतील एचसीजी हार्मोनची अभिक्रीया होऊन फेस निर्माण होतो.

५) जर परिणाम नकारात्मक असेल, म्हणजेच तुम्ही जर गरोदर नसाल तर मीठ लघवीतील हार्मोनसोबत कोणतीही प्रकिया करत नाही.
मिठाने केलेल्या तपासणीचा रिझल्ट किती अचूक मिळतो?

मिठाने केलेल्या चाचणीचा रिझल्ट अचूकच मिळतो. पण तरिही काही स्त्रियांना प्रेग्नन्सी किटने केलेल्या चाचणीवर अधिक विश्वास असतो. तुम्हाला माहित हवं की, प्रेग्नन्सी किटने केलेल्या चाचणीचा रिझल्टही प्रत्येक वेळीच अचूकच येईल असे नाही, त्यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन अल्ट्रासाऊंड हे करावंच लागतं.

तर अशाप्रकारे मिठाच्या वापराने तुम्ही घरच्या घरी प्रेग्नन्सी टेस्ट करु शकता. लघवी आणि मीठ एकत्र येऊन झालेल्या प्रक्रियेमुळे जर फेस निर्माण झाला तर समजून जा की, तुम्ही गरोदर आहात.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info