बाळंतपणात काय खावे?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 5
बाळंतपणात काय खावे?
बाळंतपणानंतरचा आहार काय असावा ?

गरोदरपणासारखेच जन्मल्यानंतरही वाढीसाठी बाळ आईवरच अवलंबून असते. आईच्या दुधातून बाळाच्या वाढीसाठी योग्य असे सर्व प्रकारचे घटका मिळतात. म्हणूनच प्रत्येक बाळंतपणानंतर जोपर्यंत बाळ अंगावर पीत असते. तोपर्यंत आईच्या आहाराचे खूपच महत्त्व असते. तिच्या नेहमीच्या गरजा भागविण्यासाठी, बाळंतपणात शरीराची झीज भरून घेण्यासाठी, बाळाच्या वाढीसाठी लागणारे जास्तीचे घटक दुधात तयार होण्यासाठी आवश्यक असणारे घटक आहारातूनच मिळतात.
आहार व काळजी

सकस व चौरस आहार मिळाला पाहिजे व पुरेशी विश्रांतीही घ्यावी.
दिवसातून नेहमीपेक्षा जास्त वेळा जेवले पाहिजे.
मसालेदार, तिखट पदार्थ कमी खावे.
बाळंतपणानंतर लगेचच गर्भ निरोधक गोळ्या घेऊ नयेत.
कोणत्याही तणावाखाली वावरू नये.
दूध भरपूर येण्यासाठी हळीव, डिंक, खारीक, खसखस, खोबरे हे पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे.


Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp