बाळाला काय खाऊ घालावे?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 14:05

बाळाला काय, कधी आणि कसं द्यावं? समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार
पहिलंच बाळ असेल तर नवमातांना हमखास आपल्या बाळाच्या आहाराची चिंता सतावते.

आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी सुखद असा अनुभव आणि क्षण असतो. आई होण्याचा आनंद तर असतोच पण सोबत एक भीतीही मनात असते. पहिल्यांदाच आई होत असताना बाळाची (Baby care) चिंता लागून राहिलेली असते. बाळाचं रडणं, झोपणं, खाणं-पिणं याची कशी काळजी (Baby care tips) घ्यावी हे समजत नाही. बाळाचा आहार (Baby food) हा खूप महत्त्वाचा असतो. कारण यावर त्याचा विकास होणार असतो. बाळाची योग्य वाढ आणि विकासासाठी त्याला पोषक आहार देणं अतिशय गरजेचं आहे.

आपल्या बाळाला योग्य आणि पोषक आहार मिळावा याकरिता प्रत्येक पालक प्रयत्न करत असतात. बाळाचं योग्य पोषण, खाण्यापिण्याची वेळ, बाळाचा आहार याबाबत पालकांना अनेक प्रश्न भेडसावू शकतात.

- तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पहिल्या काही महिन्यांपर्यंत आपल्या बाळाला घन पदार्थ देणं टाळा. आपलं बाळ घन पदार्थ खाण्यायोग्य होईपर्यंत त्याला केवळ आईचं दूध द्यावं. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही गाईचे दूध अथवा पावडरचं दूध देऊ शकता. स्वतःच्या मर्जीने गाईचे दूध अथवा पावडरचे दूध पाजणं टाळा

- आईचं दूध बाळासाठी सर्वोत्त्तम ठरतं. बाळाला आवश्यक ती सर्व पोषक तत्वं ही आईच्या दुधातून मिळतात. सुरुवातीचे 12 महिने आईने दर 2 तासांनी बाळाला स्तनपान दिलं पाहिजे. आपल्या बाळाला भूक लागणं त्यासंबंधीच्या त्याच्या संकेतांना समजून त्यानुसार बाळाला स्तनपान करणं आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी आपल्या बाळाला आहार देताना आपल्याला काही शंका किंवा समस्या असल्यास डॉक्टरांशी बोला.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info