बाळाला किती वेळाने दूध पाजावे?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 11:30

लहान मुलं रडली की त्यांना भूक लागली आहे असं आई समजते. मुलांच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या शरीराला पोषक तत्त्वांचा पुरवठा होत आहे की नाही याची चिंता देखील आईला सतावत असते.
लहान मुलं जेव्हा रडतात तेव्हाच त्यांना भूक लागली आहे हे संकेत आईला मिळतात. मुलं रडत असताना त्यांना भूक लागली आहे म्हणून आई दूध पाजते. आपल्याला भूक लागली आहे अथवा दूध हवं आहे हे लहान मुलं बोलू शकत नाहीत. मग अशावेळी आई कधीकधी आपल्या बाळाला जास्त दूध पाजते. बाळाच्या भूके पलिकडे दूध पोटात जातं. पण हे कितपत योग्य आहे याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? मुलांना भूक लागली आहे की नाही हे ओळखणं पहिल्यांदाच आई झालेल्या स्त्रियांसाठी देखील कठीण असतं. मुल रडायला लागलं म्हणजे तो भूकेने व्याकुळ होत आहे एवढंच आईला माहित असतं. मुलांना दुधामधून पोषक तत्त्वांचा पुरवठा होत आहे की नाही ही चिंता देखील आईला असते. मुलांच्या शरीराला पोषक तत्त्वांचा अधिक पुरवठा व्हावा म्हणून आई मुलाला अधिक दूध पाजण्याचा प्रयत्न करते. पण यामुळे मुलांच्या निरोगी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दिवसातून किती वेळा मुलांना दूध पाजलं पाहिजे याची योग्य माहिती नवीन आईला माहिती असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया मुलांना दूध पाजण्याची योग्य पद्धत.
​दिवसातून किती वेळा भूक लागते?
लहान मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं ही आईची मुख्य जबाबदारी असते. बराच काळ मुलांच्या सहवासामध्ये राहून मुलाची प्रत्येक सवय आईच्या लक्षात येते. प्रत्येक मुल, त्याची शारीरिक रचना, भुकेचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. म्हणूनच प्रत्येक मुल दिवसातून किती वेळा दूध पितं याचं प्रमाण आणि वेळ देखील निराळी असते. जर तुम्ही स्तनपान करत असाल तर थोड्या-थोड्या वेळाने मुलांना दूध पाजणं गरजेचं आहे. कारण आईचं दूध हे पचायला हलकं असतं. अशावेळी मुलांना अधिक भूक लागते.
किती दूध पाजावं?

सहा महिन्यांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना दिवसातून प्रत्येक दोन ते तीन तासांनी दूध पाजलं पाहिजे. जेव्हा मुलांची वाढ होत जाते तेव्हा दुध पाजण्याच्या वेळेमधील अंतर देखील कमी होत जातं. वाढत्या वयानुसार मुलांना अधिक भूक लागते. मुल जन्माला आल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मुलांना ८ ते १२ वेळा दूध पाजलं पाहिजे. त्यानंतर हळूहळू ही वेळ कमी देखील होऊ शकते. काही मुलांच्या बाबतीत ७ ते ९ वेळा मुलांना दूध पाजलं जातं. तसेच वाढत्या वयानुसार मुलांची दूध पिण्याची क्षमता अधिक वाढते.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info