भारतात प्रसूती कायदा कधी निर्माण झाला?
कायद्यातील निर्देश आणि ठराव पाहता १९६१ मध्ये प्रसूतीदरम्यानच्या रजेसंदर्भातील कायदा तयार करण्यात अाला. या कायद्यान्वये नोकरदार महिलांना काम करताना प्रसवकाळातील सवलती देण्यात आल्या आहेत. कोणताही नियोक्ता एखाद्या महिला कर्मचाऱ्यास प्रसूती किंवा गर्भपातानंतर लगेच सहा आठवड्यांत संस्थेत जाणीवपूर्वक नियुक्ती देणार नाही.