Google AdSense Header Slot

मासिक पाळी आधी आणि नंतर किती दिवस सुरक्षित आहे?

Language: Marathi | Published: 11 Oct 2022 | Views: 33
मासिक पाळी आधी आणि नंतर किती दिवस सुरक्षित आहे?
'सुरक्षित सेक्स'चा नेमका काळ कोणता ?

प्रेम , विश्वास , जिव्हाळा याचबरोबर सुखी वैवाहिक जीवनाचे एक महत्त्वाचे गमक असते ते म्हणजे ' सेक्स'… मग सुरक्षित सेक्सचा काळ कोणता ?

स्त्रियांच्या मासिक पाळीतील ८ ते २१ वा दिवस हा काळ असुरक्षित म्हणजे या काळात गर्भधारणा होऊ शकण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे हे दिवस वगळता इतर दिवस हा सुरक्षित सेक्सचा काळ समजला जातो. मासिक पाळीच्या पहिल्या सात दिवसांचा आणि २२ ते २८ वा दिवस या काळात सेफ सेक्स होऊ शकतो मात्र प्रत्येक स्त्रीसाठी हेच गणित अचूक ठरेल असे काही नाही. पण मासिक पाळीच्या दिवसांत सेक्स करावा का? हा प्रश्न तुमच्या मनात रेंगाळतोय ना.. मग पहा त्याचे उत्तर

बऱ्याचदा स्त्रीच्या मासिक पाळीच्या चक्रावर सेक्सचा सुरक्षित काळ ठरतो . जर स्त्रीच्या दोन मासिक पाळीमध्ये २८ दिवस अथवा त्यापेक्षा थोड्या कमी दिवसांचे अंतर असल्यास हे गणित अचूक ठरेल मात्र त्यापेक्षा अधिक दिवसांचा फरक असल्यास तुमच्या सुरक्षित सेक्सचा काळ वेगळा असू शकतो. या काळात केलेला सेक्सही प्रत्येक वेळी सुरक्षितच असेल असेही नाही त्यामुळे अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम अथवा गर्भनिरोधक गोळ्या घेणे चांगले !
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp