मासिक पाळी का येत नाही?pregnancytips.in

Posted on Wed 12th Oct 2022 : 10:40

मासिक पाळी वेळेवर येत नाही?

अनेक स्त्रिया किंवा मुलींना अनियमित मासिक पाळीची (Irregular Period) समस्या असते. काही महिलांना दोन महिने मासिक पाळी (Periods) येत नाही. मानसिक ताणतणाव, थायरॉईड, संतुलित आणि पौष्टिक आहार न घेणे, वजन कमी होणे किंवा वाढणे, गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन इत्यादी अनेक कारणांमुळे (Causes of Irregular Periods) मासिक पाळी अनियमित होऊ शकते. अनियमित पीरियड्सची ही समस्या खूप सामान्य आहे. परंतु जर वारंवार मासिक पाळी योग्य वेळी येत नसेल. तर हे गंभीर होऊ शकते. अविवाहित मुलींना यामुळे पाळीच्या वेळेला जास्त त्रास (Pain During Periods) होण्याची शक्यता असते. तर विवाहित महिलांना अनियमित पाळीमुळे गर्भधारणेसही त्रास होऊ शकतो.

अजतकने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हा IVF येथील IVF तज्ञ डॉ. उन्नती ममातोरा यांनी अनियमित मासिक पाळी आणि फर्टिलिटी (Fertility) याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मासिक पाळीचे अनियमित चक्र 21 दिवसांपेक्षा कमी आणि 35 दिवसांपेक्षा जास्त असते. याशिवाय ज्या महिलांची सायकल खूप लांब असते, त्यांना ओव्हुलेशनच्या समस्यांना सामोरे जावे लागते. याला अॅनोव्ह्युलेटरी सायकल असे म्हणतात.
त्यांनी पुढे सांगितले की, अनियमित मासिक पाळी हा अनेक महिलांसाठी चिंतेचा विषय असतो. जर एखाद्या महिलेची मासिक पाळी अनियमित असेल तर ओव्ह्युलेशनचा (Ovulation) अंदाज लावणे, फर्टिलिटीच्या लक्षणांबद्दल जाणून घेणे आणि त्यानुसार लैंगिक संबंध ठेवणे खूप कठीण होते. ओव्हुलेशन म्हणजे महिलांच्या अंडाशयातून अंडी बाहेर पडण्याची वेळ. यावेळी महिला सर्वात प्रजननक्षम म्हणजेच फर्टाईल असतात. स्त्रिया केवळ मासिक पाळीच्या आधारे ओव्हुलेशनच्या वेळेचा अंदाज लावू शकतात.ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित असते. त्यांना गर्भधारणेदरम्यान (conceiving Baby) अडचणी येऊ शकतात. कारण अनियमित मासिक पाळीमुळे ओव्हुलेशनचा अंदाज लावता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल, तर तुम्ही प्रथम फर्टिलिटीशी संबंधित टेस्ट करून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info