Google AdSense Header Slot

मासिक पाळी चुकल्यास काय करावे?

Language: Marathi | Published: 12 Oct 2022 | Views: 23
मासिक पाळी चुकल्यास काय करावे?
आजच्या धकाधकीच्या जीवनाचा परिणाम गरोदरपणावर होत आहे. महिलांना गरोदर राहण्यास अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. यामध्ये ताण-तणाव, कामाचं प्रेशर आणि अनेक वेगवेगळ्या आजारांमुळे जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. असं असताना बाळाच्या विचार करणाऱ्या महिलेला गोड बातमीची, बाळाची चाहुल आपल्याला सर्वात आधी कशी कळेल याची उत्सुकता असते.अनेकदा तर महिलांना मासिक पाळीची तारीख उलटून जाण्याची देखील उसंत नसते. मात्र अनेकदा ही गोड बातमी जाणून घेण्यासाठी महिलेची उत्सुकता सर्वाधिक आहे. अगदी एक महिन्याची वाट बघण्याची देखील तयारी नव्हती. अगदी ३ ते ४ दिवसांतच गरोदरपणाची लक्षणे दिसू शकतात. (फोटो सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया)
​सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे ब्लिडींग होणं
जेव्हा फलित अंडी (फर्टिलाइज्‍ड एग) तुमच्या गर्भाशयाच्या अस्तराला चिकटते तेव्हा त्या प्रक्रियेत काही रक्तवाहिन्या फुटतात. ज्यामुळे थोडासा रक्तस्त्राव जाणवू शकतो. यामुळे मासिक पाळी आली का असा गोंधळ होऊ शकतो. कारण पीरियड्समध्ये रक्तस्राव होतो आणि ओटीपोटात किंवा कंबरेत तीव्र वेदना होतात. परंतु या प्रक्रियेत रक्त खूप हलके होते आणि गर्भाशयात थोडे क्रॅम्पिंग जाणवू शकते. हे लक्षण प्रत्येकामध्ये दिसतेच असं नाही.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp