Google AdSense Header Slot

मासिक पाळी दरम्यान सेक्स करणे सुरक्षित आहे का?

Language: Marathi | Published: 10 Oct 2022 | Views: 144
मासिक पाळी दरम्यान सेक्स करणे सुरक्षित आहे का?
तात्पुरता प्रेग्नेंसीपासून दूर राहण्यासाठी सेक्स करण्यास योग्य काळ कोणता? याबाबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर यावर तज्ज्ञांचं नेमकं मत काय हे जाणून घ्या.
प्रश्न मी एक २८ वर्षाची मुलगी आहे. माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली आहे. अजूनही दोन वर्ष आम्ही कंसीव करू इच्छित नाही. मी आणि माझे पती नैसर्गिक पद्धतीने लैंगिक संबंध ठेवतो. पण तात्पुरता प्रेग्नेंसीपासून दूर राहण्यासाठी कोणता सुरक्षित उपाय किंवा काळ आहे का? आम्ही सेक्सदरम्यान सुरक्षितता बाळतो. पण मला कृपया योग्य तो सल्ला द्या.उत्तर - तुम्ही जर प्रेग्नेंसीसाठी अजूनही तयार नसाल आणि लैगिंक आयुष्याचा आनंद घेऊ इच्छित असाल तर मासिक पाळीचा काळ हा महत्त्वाचा असतो. या काळामध्ये प्रेग्नेंसीची शक्यता फार कमी असते. सुरक्षित काळामध्ये सेक्स करणं देखील एका गर्भनिरोधकासारखं काम करतं. सुरक्षित सेक्स करायचं असेल तर मासिक पाळीचा काळ याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मासिक पाळीचं चक्र समजून घेणं गरजेचं
जर मासिक पाळीचं चक्र उत्तमरित्या समजून घेत असाल तर तुम्ही सुरक्षित सेक्स करू शकता. सुरक्षित काळामध्ये प्रेग्नेंट राहण्याची शक्यता फार कमी असते. महिलांची मासिक पाळी मागे-पुढे येत राहते. यादरम्यान सेक्स केल्या गर्भवती राहण्याची शक्यता नाकारू शकत नाही. म्हणून असुरक्षित पद्धतीने सेक्स करणं टाळा. कोणता काळ योग्य?मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पुढील महिन्याच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत मासिक पाळीचं चक्र गणलं जातं. सामान्यतः २८ दिवसांचा हा काळ असतो. आणि १४व्या दिवशी ओव्युलेशन असतं. यादरम्यान प्रेग्नेंसीची शक्यता अधिक असते. महिलांच्या शरीरामध्ये स्पर्म ३ ते ४ दिवस राहतात. म्हणूनच ओव्युलेशनच्या पाच दिवस आधी आणि ओव्युलेशनच्या दिवशी सेक्स केल्यामुळे प्रेग्नेंट राहण्याची शक्यता अधिक असते.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp