स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते.
बालपण संपवून प्रौढ होताना आपल्या शरीरात विविध बदल होत असतात. या बदलांपैकी महत्त्वपूर्ण आणि प्रारंभिक बदल म्हणजे मासिक पाळी येणे. पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर बहुतांश मुली घाबरतात. यामागचे कारण असे की, त्यांना या विषयाची पूर्णपणे कल्पना नसते. मासिक पाळी हे तारुण्यात प्रवेश करण्याचे लक्षण असून ही अतिशय सामान्य बाब आहे. त्यामुळे मुलींनी अशा परिस्थितीत घाबरून न जाता आपल्या घरातील व्यक्तींसोबत मोकळेपणाने बोलायला हवे. शरीरात होणाऱ्या या बदलामुळे बरेचसे प्रश्नही मनात येऊ शकतात. मासिक पाळी म्हणजे काय? ती का येते? त्यामुळे काही त्रास होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक मुलीला असते. या लेखात अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. तुम्ही अनुभव असलेली सर्व परिस्थिती, त्याची कारणे आणि तिच्याशी सामना कसा करावा याची माहिती तुम्हाला या लेखात मिळणार आहे. यामध्ये मासिक पाळीवेळी होत असलेला शारीरिक बदल कसा हाताळावा याचे मार्गदर्शन केले आहे.
मासिक पाळी म्हणजे काय त्याचे थोडक्यात वर्णन करा?