रक्त वाढविण्यासाठी काय खावे?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 14:31

बऱ्याचदा आपल्या शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं प्रमाण योग्य असलं तरीही रक्त कमी असतं. असा रुग्ण अॅनिमिया आजाराने ग्रस्त असतो. या रुग्णांमध्ये शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकतात. यासाठी योग्य आहारासोबत काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत.

रोजच्या आहारात या काही गोष्टींचा समावेश केल्यानं तुम्ही सुदृढ आणि सशक्त रहा.

अंडी

रोज सकाळी नाश्त्यामध्ये दोन उकडलेल्या अंड्यांचा समावेश करावा. अंड्यामध्ये एंटीऑक्सिडेंट, प्रोटीन आणि आयनचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे शरीरातील विटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी अंड्याची मदत होते. एका अंड्यामध्ये साधारण 1 एमजीपर्यंत आयनचं प्रमाण असतं.

डाळींब

डाळींब हे रोज खाल्ल तरीही शरीरासाठी उत्तम आहे. थंड गुणधर्म असणाऱ्या डाळींबामुळे शरीरातील रक्त वाढण्यासोबतच हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते. डाळींबामध्ये विटॅमिन ए, सी आणि ई असतं. डोकेदुखी, उदासिनता, आळस दूर करण्यासाठी डाळींबाचे रोज दाणे खाण्यावेत त्यामुळे प्रकृती सुधारण्यास मदत होते. फलाहार शक्यतो सकाळच्या वेळेत केला तर अधिक उत्तम. तुमची प्रकृती नाजूक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं करायला हवा.

वाचा-सावधान! रंग गोरा होण्यासाठी क्रीम वापरणं घातक, आजारांना देताय निमंत्रण

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयन आणि विटॅमिन सी असतं. त्यामुळे पालकाची भाजी किंवा सॅलडमध्ये पालकाचा वापर करावा. त्यातून शरीरात ए, बी-9 आणि ई विटामिन मिळतं. यासोबत कॅल्शियम आणि फायबरही पालेभाज्यांमधून मिळत असल्याचं आहारात रोज एकतरी पालेभाजीचा समावेश करायला हवा.

बीट

बीटापासून कोशिंबीर, कच्च किंवा उकडलेलं बीट अथवा बीट ज्यूस काहीही तुम्ही घेऊ शकता. बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं यासोबत रक्त वाढण्यासाठी मदत होते. शक्य असेल तर रोज सकाळी दूध, चहा घेण्याऐवजी बीटाचा ज्यूस घेतला तर उत्तम

सोयाबिन

सोयाबिनमध्ये प्रथिन, लोह आणि फॅट असतं. त्यामुळे ताकद, वजन वाढवण्यासाठी भीजवलेलं सोयाबिन खावं. सोयाबिनची भाजी किंवा उकडलेलं सोयाबिनही खाल्ल तरीही फायदा होतो.

कोबी

कोबी, फ्लावर, कांद्याची पात अशा भाज्यांचा आहारात समावेश करावा. कोबीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असल्यानं शरीरातील हाडांना मजबूती देण्याचं काम करतं. कोबी हा कच्चा, सॅलडमध्ये किंवा कोशिंबीर करून खावा. त्यामुळे जास्त लाभ मिळू शकतो.

एनिमिया किंवा आयनचं प्रमाण शरीरात बऱ्याचदा कमी असल्यानं थकवा जाणवतो. डोकं आणि शरीर दुखतं. काही वेळा अति अशक्तपणामुळे तुमची इम्युनिटी पावरही संपत जाते अथवा कमी होते. त्यामुळे शरीरात रक्ताचं प्रमाण कमी होऊ न देण्यासाठी या काही गोष्टी कटाक्षानं पाळणं आवश्यक आहे.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info