लहान बाळाला गुटी कधी द्यावी?

Language: Marathi | Published: 12 Oct 2022 | Views: 17
लहान बाळाला गुटी कधी द्यावी?
बाळगुटी कशी
द्यावी

१) बाळाची छाती कफाने भरत असल्यास वेखंड वापरावे. स्वच्छ दगडा वर मध एक चमचा टाकून वेखंडाची कांडी त्यात उगाळून तयार करावे. हे चाटण बाळास चाटवल्यास बाळाला चिकट फेसकर उलटी होऊन छाती तील फेसकट पणा कमी होतो.

२) छाती भरत असेल तर वेखंड व काकडिंग उगाळणे ‍किंचिंत वाढवावे. कधीकधी बाळाला शी होताना खडा झाल्याने कुंथावे लागते. यासाठी रोजच्या उगाळण्यामध्ये बाहिरडा अधीक उगाळावा व चिंचोका उगाळू नये.

३) बाळाला पातळ शी होत असल्यास खारीक, बदाम बाळहिरडा कमी करून किंवा वगळून जायफळ, चिंचोका, यांचे गाहणे अधीक करून चाटण द्यावे.

४) बाळाच्या जर पोटात दुखण्यामुळे बाळ रडत असेल, तर मुरूड शेंग अधीक उगळावी, जायफळ, चिचोंका, बदाम हे उगाळू नयेत.

५) लहान मुलांना जुलाब, शी चे खडे, छाती भरणे, यांसारखे अनेक त्रास होत असतात. यासाठी सूक्ष्म प्रमाणात दिलेल्या औषधांनी वेळीच सुधारणा घडवता येते.

६) बाजारात २ प्रकारची बाळगुटी मिळते. एक असते ती ‍सिरप स्वरूपात, व एक असते ती मूळ वनस्पतीं च्या भागांच्या संग्रह स्वरूपात. सिरप स्वरूपा तील ही बालगुटी सिरप ही ध्यायला अतिशय सोपी असते. बाळाच्या रोजच्या सदृढ वाढी साठी त्याचा चांगला उपयोग होतो.

७) जी बाळ गुटी उगळून दिली जाते त्यामध्ये जवळ जवळ २०-३० औषधे, त्यांच्या मुळ किंवा काष्ठ स्वरूपात दिले जातात. त्यामधील आपल्याला हवी असलेली औषधी उगाळून ही बाळ गुटी बनवली जाते.

८) हया बाळ गुटीचा फायदा हा की बाळाच्या छोटया आजारां वर घरगुती स्वरूपात हे उपचार केले जाऊ शकतात. परंतु उगळून दिल्या जाणार्‍या गुटी बाबत स्वच्छते ची अतिशय काळजी घ्यायला लागते. बाळाला सांभाळणे हे जणू तेलाने भरलेल्या भांडयाला घेऊन जाण्या इतके कठीण असते. त्यामुळे कुठून ही जराही जंतूचा शीरकाव जर बाळाच्या शरीरात झाला तर मोठी समस्या उभी राहू शकते.
बाळगुटी कशी द्यावी
वरील लेख वाचणर्‍या वाचकांनी हे मात्र जरूर लक्षात ठेवावे की बाळ गुटी हे पूर्ण औषध असेलच असे नाही. बाळामध्ये आजाराची काही वेगळी अशी लक्षणे दिसल्यास बाळासाठी ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. रोजची बाळगुटी सर्वानीच आपल्या बाळाला दयायला हरकत नाही. परंतु औषधोपचार करताना आपल्या आयुर्वेदिक वैदयाचा मार्गदर्शना खाली केलेले केव्हाही उत्तम.
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp