लहान बाळाला गॅस झाल्यावर काय करावे?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 15:30

पोटातील गॅसच्या वेदनेने बाळ रडत असेल तर | या | अवयवांची मालिश करा व काही मिनिटांत दूर करा वेदना!
लहान मुलांना कायमच पोटात गॅस होण्याची समस्या भेडसावते. ज्यामुळे ते तासन्तास रडत असते. मुलांना पोटातील गॅसच्या त्रासदायक समस्येमुळे होणा-या वेदनांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी अनेक रामबाण घरगुती उपाय उपलब्ध आहेत. या असंख्य उपायांमध्ये पोटाची मालिश याचा देखील समावेश आहे.
बाळाचा जन्म झाल्यावर कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचा बहार येतो. दोघेही आई वडील सर्व दु:ख त्रास विसरून नव्या जीवासाठी झटू लागतात. त्याच्या काळजीसाठी हे शक्य होईल ते सर्व करतात. लहान बाळ त्याला होणारा त्रास बोलून दाखवू शकत नाही कारण त्याच्यात तशी क्षमता निर्माण झालेली नसते. त्याला काय हवे, काय होते आहे ते तो सांगू शकत नाही. त्याच्याकडे केवळ एकच माध्यम असते ते म्हणजे रडणे! बाळ रडायला लागले की समजावे त्याला काहीतरी त्रास होतो आहे. पण नेमका काय त्रास होतो आहे हे सर्वच पालकांना ओळखता येत नाही. बाळाला होणाऱ्या समस्यांपैकी पोटात गॅस निर्माण होणे ही एक सामान्य समस्या आहे. अशा वेळी बाळाला मालिश करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक जाणकार देखील हाच सल्ला देतात. गॅसमुळे बाळाला खूप वेदना होतात आणि त्यामुळे बाळ झोपू सुद्धा शकत नाही. जर तुम्हाला वाटते की तुमच्या बाळाची या समस्येमधून सुटका व्हावी आणि त्याला आराम मिळावा तर तुम्ही देखील मालिश करण्याचा हा उपाय वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला या लेखातून याच उपायाबद्दल सर्व माहिती देणार आहोत.
कशी करावी बाळाची मालिश?

मालिश केल्याने केवळ पोटात असलेला गॅस बाहेरच पडत नाही तर यामुळे बाळाच्या विकासात देखील मदत मिळते. मालिश करताना तुम्हाला अशा प्रकारे पोट दाबायचं आहे की पोटात अडकलेला सर्व गॅस बाहेर पडेल. सामान्यत: पोटाची मालिश करताना बाळाच्या पोटाच्या डाव्या बाजूच्या खालील भागापासून दाबायला सुरुवात करा आणि हळूहळू दाबत उजव्या बाजूला या. अशामुळे बाळाची मालिश योग्य पद्धतीने होईल आणि त्याला पोटातील गॅसच्या समस्येपासून लवकर आराम मिळेल. अनेकांना ही योग्य पद्धत माहित नसते. कशाही पद्धतीने मालिश केल्यास त्याचा बाळाला त्रास होऊ शकतो.
मालिश करण्याची योग्य पद्धत

आपल्या तर्जनीने बाळाच्या गुडघ्यांना आधार द्या आणि दोन्ही गुडघे दुमडून पोटावर घ्या. गॅसबाहेर काढण्याचा हा सर्वात सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे. बाळाचे पोट म्हणजे एखादे घड्याळ आहे असे समजा. 7 वाजताच्या काट्याच्या जागी हलक्या हाताने प्रेस करा आणि उजव्या बाजूने डाव्या बाजूपर्यंत हात फिरवा. दुसऱ्या हाताने सुद्धा हेच मोशन रिपीट करा. याशिवाय तुम्ही बाळाला गॅस पासून आराम मिळवून देण्यासाठी हलक्याने दोन्ही हातांच्या अंगठ्यांना बाळाच्या पोटाच्या वर नाभीपासून अगदी वर ठेवा. आता हलक्या हाताने अंगठे गोल गोल फिरवा. हाताच्या बोटांनी बाळाच्या पोटावर गोल गोल वर्तुळ तयार करा. अशावेळी बाळ रडत असेल तर अंगाई गाऊन त्याला शांत करा.
या गोष्टींची घ्या काळजी

घरच्या घरी बाळाची मालिश करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी. सर्वात प्रथम मालिश करण्याआधी आपल्या पीडियाट्रिशियनशी नक्की बोलून घ्या. मालिश करताना बाळाचा मूड शांत असणे गरजेचे आहे. सकाळच्या वेळेस किंवा रात्री झोपण्या अगोदर मालिश करणे फायदेशीर असते. बाळाची मालिश करताना त्याच्या सह आय कॉन्टॅक्ट ठेवावा. दूध पाजल्यानंतर जवळपास एक तासाने मालिश करावी अन्यथा बाळाला उलटी वा अपचन होऊ शकते. बाळाची मालिश नेहमी शांत जागीच करावी.
बेबी फुट रिफ्लेक्‍सोलॉजी मसाज

पोटाच्या मालिश व्यतिरिक्त तुम्ही गॅस दूर करण्यासाठी बाळाच्या पायांची मालिश करू शकता. फुट रिफ्लेक्‍सोलॉजीचा संबंध गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या स्थितीमध्ये होणाऱ्या सुधारणेशी आहे. परंतु याबाबतीत वैज्ञानिक प्रमाण अजून सापडलेले नाहीत. ना एखाद्या संशोधना मधून याचे फायदे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे सावधानी म्हणून एकदा आपल्या डॉक्टरांशी आवर्जून चर्चा करावी. पोट आणि आतड्यांसाठी प्रेशर पॉइंट हे पायाच्या वरच्या भागात असतात. या जागेवर हाताने हळुवारपणे स्ट्रोक लावावेत.
संत्री ठरू शकतात फायदेशीर

बाळाला सतावणाऱ्या गॅस आणि अपचनाच्या समस्येवर संत्री फायदेशीर ठरू शकतात. बाळाला संत्री खाऊ घालण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बाळाला होणारी गॅस व अपचनाची समस्या दूर होते. बाळाची पचन यंत्रणा पूर्णपणे विकसित होण्यासाठी आणि सक्षम होण्यासाठी वेळ लागतो आणि याच कारणामुळे बाळाला गॅस व अपचनाचा त्रास सतावू शकतो. अशावेळी संत्री बाळाला फायदेशीर ठरू शकतात. संत्र्यामध्ये असलेले घटक बाळाची पचन क्रिया उत्तेजित करतात. ज्याचा फायदा बाळाला होऊन त्याची गॅस व अपचनाची समस्या दूर होते. यामुळे बाळाला मोठ्या प्रमाणावर आराम मिळतो. मात्र यासाठी बाळाच्या पोटात नेहमी संत्रे जाणे आवश्यक आहे.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info