लहान मुलांना कफ झाल्यावर काय करावे?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 15:00

हिवाळा ऋतू आणि कडाक्याची थंडी सुरु झाली की मोठ्या माणसांना तो सर्दी-पडस्याचा त्रास सुरु होतो तिथे लहान मुलांची तर गोष्टच वेगळी! लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्यामुळे त्यांना अतिशय वेगाने सर्दी-पडसं व ताप या आजारांचा विळखा पडतो. या आजारांवर रामबाण उपाय हवा असेल तर वाचा हा लेख.
आता थंडीचा काळ (winter season) सुरु झाला आहे. या काळात लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती (kids immunity power) अतिशय कमजोर पडते आणि त्यांना सर्दी (cold), खोकला (cough), ताप (flu) यासारख्या व्याधी ग्रासतात. म्हणून थंडीच्या दिवसांत लहान बाळांची जास्तीत जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. खासकरून नवजात बालक वा 6 महिने वयाचे बाळ यांची अधिकाधिक काळजी घ्यावी. जर थंडीच्या दिवसांत लहान बाळाला सर्दी, खोकला वा ताप येऊ लागला तर अशावेळी घरगुती उपाय कामी येतात.

जर घरातील एखाद्या व्यक्तीला सर्दी, ताप व खोकला येत असेल आणि बाळ त्या व्यक्तीच्या संपर्कात आले तर त्यामार्गे विषाणू संक्रमित होऊन बाळाला सुद्धा सर्दी, ताप होऊ शकतो. ज्या व्यक्तीला सर्दी झाली आहे त्या व्यक्तीला बाळाचा स्पर्श झाल्यास सुद्धा बाळाला व्हायरस पकडू शकतो. आजारी व्यक्ती मार्फत बाळाचे डोळे, नाक किंवा तोंड यांना स्पर्श झाल्यास देखील बाळाला इन्फेक्शन होऊ शकते. काही विषाणू जमीन, पडदे, खेळणी यांवर जास्त काळ जिवंत राहतात. त्यामुळे बाळ या गोष्टींच्या संपर्कात आल्यास सुद्धा सर्दी, ताप, खोकला यांसारखे आजार बाळाला विळखा घालू शकतात.
ओवा ठरतो रामबाण

बाळाला सर्दी, ताप वा खोकला झाल्यास ओवा या समस्येवर अतिशय गुणकारी ठरतो. बाळ आजारी असल्यास ओव्याचा वापर कसा करावा हे आज आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम गॅस वर तवा ठेवा आणि थोडा ओवा घ्या. सोबत 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घ्या. हे लसूण सुद्धा ओव्यावर टाका. ओवा आणि लसून दोन्ही खरपूस भाजून घ्या. जेव्हा ओवा भाजू लागेल तेव्हा त्यातून चट चट आवाज येऊ लागेल. ओवा एकदा का नीट भाजला की गॅस बंद करून घ्या. एक प्लेट घ्या. त्यावर सुती कपडा पसरा आणि मग त्यात हे मिश्रण टाकून तो कपडा घट्ट बांधून घ्या.
0 ते 6 महिने वयाच्या बाळासाठी उपयोगी

जर नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सर्दी झाली असेल किंवा त्याच्या छातीत कफ जमू लागला असेल तर मोहरी वा नारळाचे तेल हलकेसे तापवून घ्या. या तेलाने बाळाची मालिश करा आणि ओव्याचा बांधलेला कपडा घेऊन बाळाच्या छातीवर शेक द्या. याचा प्रभाव बाळाच्या शरीरावर लगेच येऊन त्याला आराम मिळेल. मात्र तेल वा ओव्याचा कपडा जास्त गरम करू नये. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला त्यामुळे त्रास होऊ शकतो.
ओव्याची पुरचुंडी तयार करण्याआधी काय करावे?

महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ओवा आणि लसणाचे मिश्रण जास्त गरम करू नये. जर तुम्ही जास्त गरम केले तर बाळ त्या कपड्याचा शेक सहन करू शकणार नाही. बाळाचे नाक गळत असेल वा सर्दी जास्त प्रमाणात असेल तर अतिशय कोमट पद्धतीने ओवा आणि लसणाचे मिश्रण गरम करून त्याचा कपडा बांधून तो बाळच्या डोक्याखाली ठेवावा. ओव्यातून येणाऱ्या वासामुळे बाळाचे बंद नाक खुलेल आणि सर्दी सुद्धा ठीक होऊन जाईल.
ओव्याची पुरचुंडी कशी वापरावी?

सर्दी वा खोकल्यामुळे बाळाच्या नाकातून पाणी येत असेल वा छातीत कफ जमा होत असेल तर बाळाची पाठ, छाती आणि पोटावर या कपड्याने शेक द्या. जर यामुळे सुद्धा काही फरक पडत नसेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना बाळाला होणारा त्रास सांगावा. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अन्य घरगुती उपचार करून पाहावेत. जर त्या उपचारांनी सुद्धा काही फरक पडला नाही तर मात्र जास्त वेळ न दवडता वैद्यकीय उपचार बाळाला देणे सुरु करावे.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info