लहान मुलांना लवकर झोप येण्यासाठी काय करावे?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 15:22

लहान मुलांचं आरोग्य निरोगी (Child Care) राहण्यासाठी त्यांना पुरेशा प्रमाणात झोप मिळणं अतिशय गरजेचं आहे. पण लहान मुलांना रात्री वेळेवर झोपवणे म्हणजे सर्वात कठीण काम. मुलांना पुरेशा प्रमाणात झोप मिळल्यास त्यांची चिडचिड होणार नाही आणि महत्त्वाचे म्हणजे आईवडिलांची दिवसभरातील कामे नीट आणि सहजरित्या पूर्ण होण्यास मदत होईल. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांची शारीरिक ऊर्जा प्रचंड असते. यामुळे दिवसभर भरपूर खेळल्यानंतरही त्यांना थकवा जाणवत नाही आणि रात्री लवकर झोप देखील येत नाही. तर काही मुलांचा दिवसातील बहुतांश वेळ झोपण्यातच जातो, म्हणून रात्री अंथरुणात पडल्या-पडल्या त्यांना झोप येत नाही. काही ठिकाणी जॉब करणारी आई घरी उशिरानं येते, अशा वेळेस बाळ तिची वाट पाहत जागे राहते. अशा कित्येक कारणांमुळे लहान मुलांचे सकाळी उठण्याचे आणि रात्री वेळेत झोपण्याचे वेळापत्रक बिघडते. तुमची मुलेही रात्री वेळेत झोपत नाही का? मुलांना रात्री वेळेत झोपण्याचे उपाय जाणून घेऊया
​झोप येण्यासाठी वातावरण निर्मिती
दिवसभर खेळून जास्त थकल्यानं लहान मुलांना रात्री वेळेत झोप येण्यास समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे त्यांची चिडचिडही वाढते. मुलांची सकाळी उठण्याची आणि झोपण्याची वेळ निश्चित केल्यास त्यांची झोप अपूर्ण राहणार नाही. बेड टाइम रुटीनची मुलांना सवय झाल्यानं आई-वडील जवळ नसतानाही मुले स्वतःहून वेळेवर झोपतील. मुलांनी वेळेवर झोपण्यासाठी काही तासांपूर्वी त्यांना जेवण भरवले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे जेवताना टीव्ही बंद करा, शिवाय कम्प्युटर, व्हिडीओ गेम किंवा हातामध्ये मोबाइल देऊ नका. मुलांना चांगली झोप मिळावी, यासाठी रूममध्ये केवळ नाइट लॅम्प असावा. यानंतर मुलांना गोष्ट सांगत त्यांना झोपवण्याचा प्रयत्न करा.
​शारीरिक हालचाली होणे गरजेचं
हल्ली व्हिडीओ गेम, मोबाइल, कम्प्युटरच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांचं घराबाहेर पडणं तुलनेनं कमी झालं आहे. आभासी छंदांमुळे मुले मैदानी खेळ विसरत आहेत. मैदानी खेळांमुळे शरीराची संपूर्ण हालचाल होते. यामुळे शरीर निरोगी राहतं. याउलट मोबाइल किंवा व्हिडीओ गेम एकाच ठिकाणी बसून खेळत राहिल्यानं मुलांची शारीरिक हालचाल अजिबात होत नाही. यामुळे त्यांना थकवा जाणवत नाही आणि रात्री लवकर झोप येत नाही. शक्य असल्यास झोपण्यापूर्वी मुलांकडून सोपा व्यायाम करून घ्यावा. जेणे करून शारीरिक व्यायाम होईल आणि रात्री चांगली झोपही येईल.
​प्रार्थना करून झोपण्याची सवय
काही मुलांना गोष्ट किंवा अंगाई गीत ऐकत झोपण्याची सवय असते. त्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. यावर उपाय म्हणून मुलांना झोपण्यापूर्वी प्रार्थना करण्याची सवय लावा. रूममधील लाइट करून प्रार्थना केल्यास आसपासचे वातावरण सकारत्मक होते आणि मुलांना चांगली झोपही मिळते. दुसरीकडे, मुलांना झोपताना अंगाई गीत ऐकवणे किंवा गोष्टी सांगणे, हा उपाय जुना आणि लाभदायक आहे. अंगाई किंवा गोष्ट ऐकत राहिल्यानं मुलांना हळूहळू झोप येण्यास मदत होते.
​चहा किंवा कॉफी मुलांपासून ठेवा दूर
संध्याकाळी किंवा रात्री मुलांना चहा किंवा कॉफी प्यायला देऊ नका. चहा आणि कॉफीमधील घटक मुलांच्या झोपेमध्ये अडचणी निर्माण करतात. यामुळे मुलांना लवकर झोप येत नाही. रात्री झोपण्यापूर्वी मुलांना कोमट दूध प्यायला द्यावं. झोप येण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी या सर्वात चांगला पर्याय आहे. यामुळे मुलांना झोपही लवकर येईल. दुधात कार्बोहायड्रेट्स, फॅट्सबरोबरच ए, बी-1, बी-2, बी-3, बी-5, बी-6, बी-12, सी, इ, के, डी ही व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. दुधामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढण्यास मदत होते.
​झोपण्यापूर्वी मुलांना गरम पाण्यानं आंघोळ घाला
रात्रीची गाढ झोप यावी, यासाठी बहुतांश जण झोपण्यापूर्वी गरम किंवा कोमट पाण्यानं आंघोळ करतो. गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचेच्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि संपूर्ण शरीराला आरामही मिळतो. झोपण्यापूर्वी लहान मुलांनाही गरम पाण्यानं आंघोळ घातल्यास त्यांच्याही शरीराला आराम मिळेल. शरीर तणावमुक्त झाल्यानं मुलांना चांगली झोप येईल. पण काही मुलांना आंघोळ करणं अजिबात आवडत नाही. त्यामुळे आराम मिळण्याऐवजी मुलांची चिडचिड अधिक होते. तुमच्याही मुलाला आंघोळ करणं आवडत नसल्यास तिला/त्याला झोपवण्यासाठी ही पद्धत वापरू नका.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info